Yashwantrao Chavan Gharkul Yojana : नमस्कार मंडळी, आजच्या लेखात आपण यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या भारत देशात विविध प्रकारच्या जाती आणि धर्माचे लोक एकत्र राहतात. यामध्ये बऱ्याच अशा जाती आणि प्रजाती आहेत कि ज्या आजही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत . यामध्ये विशेषतः भटक्या आणि विमुक्त जमातींचा समावेश होतो .
भटक्या आणि विमुक्त जमाती सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांचे जीवन खूप कठीण होऊन बसले आहे . तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचा चांगला मार्ग नसल्यामुळे ते मागास राहिले आहेत . एक चांगल्या दर्जाचे घरही त्यांच्याकडे नाही . जिथे ते आपल्या परिवारासोबत राहू शकतात .
महाराष्ट्र सरकारने या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि भटके आणि विमुक्त जातीतील लोकांना स्वतःचे घर असणे खूप गरजेचे आहे . आणि यातून महाराष्ट्र सरकारने यशवंतराव चव्हाण मोफत वसाहत योजना सुरु केली . या योजनेला मुक्त वसाहत योजना असेही म्हणतात . या योजने अंतर्गत त्यांना एक कायमस्वरूपी घर देले जाते .
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना काय आहे ?
महाराष्ट्रातील भटक्या आणि विमुक्त जातीतील निवडक कुटुंबांना या योजने अंतर्गत 5 गुंठे जमीन देण्यात येणार आहे . तसेच त्या जमिनीवर 269 चौरस फुटाचे घर देखील बांधून मिळणार आहे . भटक्या ( NT ) आणि विमुक्त जातीतील ( VJNT ) लोकांना त्यांचे हक्काचे घर देऊन त्यांचे राहणीमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .
Yashwantrao Chavan Gharkul Yojana In Brief
योजनेचे नांव | यशवंतराव चव्हाण घरकुल योजना |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | भटक्या आणि विमुक्त जातीतील स्थिरता देणे , त्यांचे राहणीमान उंचावणे तसेच त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे . |
लाभार्थी | महाराष्ट्रातील भटक्या आणि विमुक्त जमाती |
Yashwantrao Chavhan Gharkul Yojana 2024 उद्दिष्टे
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरु करण्यामागे अनेक उद्दिष्टे आहेत . ती उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :
1 ) स्वतंत्र घर
Yashwantrao Chavan Gharkul Yojana अंतर्गत पात्र असलेल्या कुटुंबांना महाराष्ट्र सरकार तर्फे 5 गुंठे जमीन देणे . तसेच त्या जमिनीवर 269 चौरस फुट घर बांधून देणे .
2 ) राहणीमानाचा दर्जा सुधारणे
वर्षानुवर्षे भटक्या आणि विमुक्त जाती घर नसल्याने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी स्थलांतर करत आलेल्या आहेत . अशा कुटुंबांना घर देऊन त्यांच्या आयुष्याला स्थिरता देणे. आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे .
3 ) सामाजिक एकत्रीकरण
भटक्या आणि विमुक्त जमातीतील लोकांचे जीवन भटके आणि विना पक्क्या घराचे असल्यामुळे ते कधी एकाच ठिकाणी वस्ती करून राहत नाहीत . किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसते . तर अशा लोकांचा सामाजिक संपर्क फार कमी होतो . आणि ते समाजापासून तोडले जातात . हाच सामाजिक संपर्क वाढण्यासाठी त्यांना एकाच ठिकाणी पक्के घर देणे .
4 ) महसूल निर्मितीस प्रोत्साहन
भटक्या आणि विमुक्त जमाती जर एकाच ठिकाणी घर करून राहिल्या तर त्या रोजगार निर्मितीस सक्षम होतील आणि परिणामी महसूल निर्मितीचा रस्ता मोकळा होईल .
5 ) स्थिरता देणे
पूर्वीपासून भटक्या आणि विमुक्त जमाती भटकंती करत रोजगाराच्या शोधात फिरतात . त्यांची भटकंती बंद व्हावी आणि त्यांच्या जीवनाला कुठेतरी स्थिरता यासाठी त्यांना जमीन आणि घर या योजनेच्या माध्यमातून देणे .
6 ) शैक्षणिक प्रवाहात आणणे
संपूर्ण जीवन भटकंती तसेच सोबत पक्के घर नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही . परिणामी रोजगार नाही . म्हणून अशा समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे .
7 ) रोजगार निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे
Yashwantrao Chavan Gharkul Yojana अंतर्गत भटक्या आणि विमुक्य जातीतील कुटुंबाला जमीन आणि घर बांधून देणे . या जमिनीवर हे कुटुंब व्यवसाय सुरु करू शकते . त्यामुळे या कुटुंबाला रोजगाराचा पर्याय उपलब्ध होईल .
Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024 अंतर्गत मिळणारा लाभ
1 ) दरवर्षी मुंबई आणि बृहन्मुंबई वगळून 34 जिल्ह्यांमधील 20 कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
2 ) ग्रामीण घरातील पात्र आणि काही निवडक कुटुंबांना या योजने अंतर्गत 5 गुंठे जमीन आणि त्या जमिनीवर 269 चौरस फुट घर या योजने अंतर्गत बांधून मिळणार आहे . तसेच इतर कुटुंबे ये या योजने अंतर्गत पात्र झाले आहेत त्यांना वेगवेगळ्या सरकारी उपक्रमांच्या माध्यामातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे . .
3 ) Yashwantrao Chavan Gharkul Yojana या योजने अंतर्गत विधवा , अपंग असलेल्या व्यक्ती , दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे यांना प्राधान्य दिले जाते .
4 ) सदर योजने अंतर्गत मिळालेले घर किंवा जमीन हि कोणत्याही परिस्थितीत कुणालाही हस्तांतरित करता येत नाही . किंवा कोणत्याही परिस्थितीत परत करता येत नाही . तसेच घर किंवा जमीन कोणत्याही प्रकारे भाड्याने देता येत नाही .
5 ) जिल्हा तसेच तालुका स्तरावर Yashwantrao Chavan Gharkul Yojana ची अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे . या समितीचे अध्यक्ष त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी आहेत . या अधिकाऱ्यांनी ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा कुटुंबांना सरकारी जमीन देणे , त्यावर घर बांधून देणे , पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सरकारी योजनांमधून या कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे .
Yashwantrao Chavan Gharkul Yojana फायदे
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सरकारने सुरु करण्यामागे अनेक फायदे आहेत . ते फायदे पुढीप्रमाणे :
1 ) स्वत:च्या हकाचे घर
Yashwantrao Chavan Gharkul Yojana अंतर्गत जी कुटुंबे पात्र आहेत अशा कुटुंबांना स्वतःचे घर मिळते . आणि ते घर हे त्या कुटुंबाचे कायमस्वरूपी घर असल्यामुळे त्यांना एक सुंदर , सुरक्षित घर मिळते .
2 ) उत्तम आरोग्य
सदर योजने अंतर्गत पात्र कुटुंबाला घर मिळत असल्यामुळे घरातील सर्व व्यक्ती त्या घरामध्ये सुरक्षित राहतील . या घरात विविध सोई असल्यामुळे घरातील लोकांना स्वच्छ आणि आनंदी वातावरण मिळेल . आणि त्यामुळे तेथील व्यक्ती आजारी पडणार नाहीत आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहील .
3 ) शैक्षणिक सोई
लाभार्थी कुटुंब एका ठिकाणी स्थायिक झाल्यामुळे आता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी दाखले काढता येतात . आणि त्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा देखील लाभ घेता येतो . मुलांनाही शाळेत जाता येईल .
4 ) घरगुती उद्योगाची स्थापना
लाभार्थी कुटुंबांना जमीन आणि त्यावर घर बांधून मिळणार आहे . जी शिल्लक राहिलेली जागा आहे तिथे ते कुटुंब आखाडा छोटा व्यवसाय देखील करू शकते . जसे कि – किराणा मालाचे दुकान , फळ विक्री , भाजी विक्री इत्यादी .
5 ) सामाजिक समावेशन
वर्षानुवर्षे भटक्या आणि विमुक्त जातीतील कुटुंबे भटकंती करत होते . अजूनही ते चांगल्या टिकाऊ घरात राहत नाहीत . अशा कुटुंबाला एका एक चांगले टिकाऊ घर दिले तर ते त्या ठिकाणी स्थायी स्वरूपात राहू शकतात . आणि त्यांचा समाजाशी संबंध प्रस्थापित हिईल . आणि जास्त काल समाजाशी संबंध राहिल्यामुळे त्या कुटुंबाचे सामाजिक समावेशान होते .
6 ) सुरक्षिततेची भावना
पात्र कुटुंबाला एका ठिकाणी स्थायी घर मिळाल्यामुळे अशा कुटुंबात सुरक्षेची भावना निर्माण होईल . आणि ते कुटुंब आपली सामाजीक आणि शैक्षणिक प्रगती करण्यास बाध्य होईल .
7 ) जमीन
Yashwantrao Chavan Gharkul Yojana अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला स्वतःची जमीन मिळणार आहे . आणि त्यावर घर बांधून मिळणार आहे . तसेच काही कुटुंबांना घरालगत किंवा शेजारी भूखंड मिळणार आहे .
Yashwantrao Chavan Gharkul Yojana पात्रता
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी , शर्ती , पात्रता संबंधित कुटुंबाला पूर्ण कराव्या लागतात . त्या अति व शर्ती पुढीलप्रमाणे :
1 ) लाभार्थी कुटुंब हे भटक्या आणि विमुक्त जातीतील असावे तसेच ते गावोगावी भाताकानी करणारे असावे .
2 ) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे वार्षिक 1 लाखापेक्षा कमी असावे .
3 ) जे कुटुंब या योजनेचा लाभ घेणार आहे त्या कुटुंबाच्या नावे कोणतेही दुसरे मालकीचे घर नसावे .
4 ) जे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे ते कुटुंब सध्या झोपडी , पाल किंवा साध्या घरात राहत असावे .
5 ) लाभार्थी कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारची जमीन मालकी नसावी .
6 ) संबंधित कुटुंब हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे .
7 ) महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ या कुटुंबाने घेतलेला नसावा .
8 ) वर्षातील अर्ध्यापेक्षा कमी कालावधीसाठी लाभार्थी एका ठिकाणी राहिलेला असावा .
9 ) कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल .
Yashwantrao Chavan Gharkul Yojana : आवश्यक कागदपत्रे
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत .ती पुढीलप्रमाणे :
1 ) जातीचा दाखला .
2 ) भूमिहीन असल्याचा अधिकृत प्राधीकाऱ्याचा दाखला .
3 ) उत्पन्नाचा दाखला .
4 ) महाराष्ट्रातील कोणत्याही दुसऱ्या घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञा पत्र .
Yashwantrao Chavan Gharkul Yojana : अर्ज कसा करावा
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही दोन ठिकाणी जाऊ शकता .
1 ) ग्रामपंचायत
जे कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे . अशा कुटुंबाने आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संपर्क साधावा . आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे अर्जाची मागणी करावी . सदर ग्रामपंचायत या योजनेचा अर्ज तुम्हाला उपलब्ध करून देतील . तो संपूर्ण अर्ज भरून घ्यायचा आहे . आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत . आणि सर्वात शेवटी ग्रामपंचायत कार्यालयात तो अर्ज द्यायचा आहे .
2 ) समाज कल्याण अधिकारी
आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात तुम्हाला जावे लागेल . त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही अर्जाची मागणी करू शकता . त्यानंतर संबंधित अधिकारी तुम्हाला अर्ज उपलब्ध करून देतील . तो संपूर्ण अर्ज भरा आणि त्या अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडा . सर्वात शेवटी अर्ज तेथे जमा करा .
निष्कर्ष
आपण या लेखात Yashwantrao Chavan Gharkul Yojana विषयी सविस्तर माहिती पाहिली . भटक्या आणि विमुक्त जातीतील लोकांसाठी हि योजना एक वरदान आहे .या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना जमीन आणि त्यावर घर बांधून मिळते . तसेच सरकारी योजनांचा लाभ त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी होतो . त्यामुळे या योजनेचा उपयोग या लोकांना राहणीमान उंचावण्यासाठी होतो . तसेच त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास होतो .