Tractor Anudan Yojana : नमस्कार मंडळी , आज आपण केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने चालू केलेल्या ट्रॅक्टर अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत . शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे कि शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा महत्वाचा घटक आहे . शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे .
आपल्या भारत देशातील रोजगारात जवळपास 55 % लोक हे रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत . आपल्या देशाची अर्थव्यवस्था हि देखील शेतीवर अवलंबून आहे . जर अवढया प्रमाणात आपण शेतीवर अवलंबून आहे तर त्या क्षेत्राचा विकास हा खूप आधुनिक पद्धतीने होणे गरजेचे आहे . ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला आपणास मजबूत करता येईल .
शेती जर आधुनिक पद्धतीने केली तर शेतीतील उत्पन्न आपणास वाढवता येईल . आपल्या देशातील शेतकरी हा साधन बनेल . गरीब शेतकऱ्याचे दु:ख आणि दारिद्र्य आपणास दूर करता येईल . शेतकऱ्याला कर्ज काढावे लागणार नाही . आणि पर्यायाने शेतकरी आत्महत्या होणार नाहीत . आपल्या देशातील शेतकरी देखील सुखी आणि आनंदी राहील .
या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून एक भव्य योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे . या योजने अंतर्गत आता सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना 8 ते 70 HP च्या ट्रक्टर खरेदीसाठी तब्बल 1.5 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा बर्याच अंशी गरीब आहे तसेच अल्पभूधारक शेतकरी आहे . त्यामुळे शेतीमध्ये पारंपारिक पद्धतीचा वापर करून वर्षानुवर्षे शेती करतो . त्याला यासाठी बरीच अंगमेहनत करावी लागते . तसेच यासाठी बराच वेळ वाया जातो .यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ,त्यांना मदत करण्यासाठी सरकारने हि योजना राबवली आहे .
ट्रक्टर अनुदान योजनेचा लाभ शेतकरी कसा घेऊ शकतो , त्यासाठी पात्रता काय आहे , सदर योजनेचे फायदे काय आहेत , अति आणि नियम काय आहेत , अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात , अर्ज कसा करावा याविषयीची माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत .
ट्रक्टर अनुदान योजना काय आहे ?
Tractor Anudan Yojana हि केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यान्वित योजना आहे . सदर योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ट्रक्टर खरेदीसाठी 1.5 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते . त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती आधुनिक पद्धतीने करता येते . त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते . शेतकऱ्याचे अंगमेहनतीचे काम कमी होते . शेतकऱ्याचे जीवनमान देखील सुधारते आणि शेतकर्याचा सर्वांगीण विकास होतो .
ट्रक्टर अनुदान योजना थोडक्यात
योजनेचे नांव | ट्रक्टर अनुदान योजना |
योजना कधी सुरु झाली | 2023 |
योजना कोणी सुरु केली | केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरु |
विभाग | कृषी विभाग , महाराष्ट्र |
लाभार्थी कोण | सर्व प्रवर्गातील शेतकरी |
लाभ | 1.5 लाखांपर्यंत लाभ |
योजना सुरु करण्याचा उद्देश | ट्रक्टर खरेदीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे . |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन किंवा ऑफलाईन |
Tractor Anudan Yojana Maharashtra 2024 ची उद्दिष्टे
ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेची बरीच उद्दिष्टे आहेत .ती आपणास पुढीलप्रमाणे सांगता येतील :
शेतकऱ्याचे जीवनमान सुधारणे
महाराष्ट्रातील गरीब आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवणे . आणि त्यातून त्यांचे जीवनमान सुधारणे .
जमिनीची उत्पादकता वाढवणे
सदर योजनेच्या माध्यमातून ट्रक्टरचा वापर करून शेतकऱ्याच्या जमिनीची उत्पादकता वाढवणे हे उद्दिष्टे आणि सहाजिकच यातून शेतकऱ्याची उन्नती साधणे .
शेतीचे यांत्रिकीकरण करण्यास प्रोत्साहन देणे
भारतात कमी भूधारक शेतकरी सहसा पारंपारिक पद्धतीने शेती करतात . भांडवलाच्या कमतरतेमुळे ते शेतीमध्ये यंत्रांचा वापर करणे टाळतात . सरकार द्वारे आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना यंत्रांच्या सहाय्याने शेती करण्यास प्रोत्साहित करणे .
शेतकरी आत्महत्या रोखणे
शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते . कधी कधी या अडचणींना तोंड देता देता त्याच्या नाकी नऊ येते . शेतकरी टोकाचे पाउल उचलतो . त्यामुळे शेतकऱ्याचे हे दुखः कमी करणे हा या योजने पाठीमागचा उद्देश आहे .
ट्रक्टर अनुदान योजनेचे फायदे
Tractor Subsidy In Maharashtra 2024 या योजने अंतर्गत शेतकऱ्याला ट्रक्टर अनुदान मिळते . आणि त्या माध्यमातून शेतकर्याला अनेक फायदे होतात . ते फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील .
1 ) कमी कष्ट –
Tractor Anudan Yojana योजने अंतर्गत जर ट्रक्टर चा वापर करून जर शेती केली तर शेतकऱ्याचे कष्ट कमी होतील .आणि शेतकरी अधिक चांगल्या पद्धतीने शेतात काम करू शकेल .
2 ) उत्पन्नात वाढ –
ट्रक्टरच्या सहाय्याने शेती केली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल . पर्यायाने त्याचे भविष्य सुधारेल .
3 ) शेतीचे आधुनिकीकरण –
शेतीमध्ये जर ट्रक्टर चा वापर केला तर शेतीतील कामे कमी वेळेत करता येतील . नांगरणी , पेरणी यासारखी कामे अतिशय सोपी होतात .
4 ) शेतकऱ्याची कार्यक्षमता वाढेल –
ट्रक्टर मुळे काम कमी कष्टात होते . त्यामुळे शेतकऱ्याची कार्यक्षमता वाढते . आणि शेतकरी त्याची कार्यक्षमता इतर कामांमध्ये खर्च करू शकतो . आणि आपली प्रगती साध्या करू शकतो .
5 ) धान्याच्या गरजेची पूर्तता –
आपल्या राज्यातील धान्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतीतून उत्पन्न जास्त मिळवणे गरजेचे आहे , ट्रक्टरच्या वापराने शेतीमधील धान्याचे उत्पन्न वाढेल आणि जनतेची धान्याची गरज पूर्ण होईल .
6 ) वेळेची बचत –
Tractor Anudan Yojana योजने अंतर्गत मिळालेल्या ट्रक्टरचा वापर करून जर शेती केली तर शेतकऱ्याच्या वेळेची बचत होईल . आणि शेतकरी तो वेळ दुसर्या कामात गुंतवू शकेल .आणि आपली स्वतःची आणखी प्रगती साधू शकेल .
7 ) ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा विकास –
शेतकऱ्याच्या विकासाबरोबर ग्रामीण विकास साधने शक्य होणार आहे . पर्यायाने आपणास देशाचा विकास साधता येईल .
Tractor Anudan Yojana अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या ट्रक्टरचे प्रकार
Tractor Anudan Yojana अंतर्गत काही ट्रक्टरच्या खरेदीवर सरकार आता अनुदान देणार आहे . सदर योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या काही ट्रक्टरचे प्रकार खाली दिले आहेत .
1 ) मिनी ट्रक्टर –
मिनी ट्रक्टर हे दिसायला लहान असतात आणि परवडणारेही असतात . या ट्रक्टरची क्षमता हि 12 ते 20 HP पर्यंत असते . जे अल्पभूधारक शेतकरी जे फळांची शेती करतात . त्यांच्यासाठी हे ट्रक्टर खूप उपयोगी आहेत .
2 ) पॉवर ट्रक्टर –
पॉवर ट्रक्टर हे 20 ते 50 HP चे असतात . हे पारंपारिक आहेत . या ट्रक्टरचा वापर हा नांगरणी , पेरणी , कापणी इत्यादी शेती कामे करण्यासाठी केला जातो .
Tractor Anudan Yojana अंतर्गत मिळणारे अनुदान
विविध प्रकारच्या ट्रक्टर साठी वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान दिले जाते . सरकार तर्फे विविध प्रकारच्या ट्रक्टरसाठी 50 % किंवा रुपये 1 लाख 25 हजार पर्यंत अनुदान दिले जाते . यामध्ये वेगवेगळ्या ट्रक्टरसाठी किती अनुदान दिले जाते ते आपण पुढे पाहू .
1 ) 40 ते 70 HP क्षमतेच्या ट्रक्टरला मिळणारे अनुदान –
जर खरेदी केलेला ट्रक्टर हा 40 ते 70 HP क्षमतेपेक्षा जास्त असल्यास अशा ट्रक्टर साठी 1 लाख 25 हजार एवढी प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल .
2 ) 20 ते 40 HP क्षमतेच्या ट्रक्टरसाठी मिळणारे अनुदान –
जर शेतकऱ्याने Tractor Anudan Yojana अंतर्गत जर 20 ते 40 HP क्षमतेचा ट्रक्टर खरेदी केला तर त्यावर सरकार 1 लाखांपर्यंत अनुदान देते .
3 ) 8 ते 20 HP क्षमतेच्या ट्रक्टरसाठी मिळणारे अनुदान –
अशा प्रकारच्या ट्रक्टरसाठी सरकार तर्फे 40 % किंवा रुपये 75,000 एवढे अनुदान शेतकऱ्यांना सरकार तर्फे मिळते .
Tractor Anudan Yojana पात्रता
Mini Tractor Subsidy In Maharashtra योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्याने खालील पात्रता धारण केलेली असावी :
1 ) अर्जदार हा कायमस्वरूपी महाराष्ट्राचा रहिवासी असावा .
2 ) अर्जदार शेतकऱ्याकडे लागवड करण्याच्या योग्यतेची जमीन असावी .
3 ) लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सादर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राधान्य दिले जाते .
4 ) अर्जदार शेतकर्याकडे जर पहिलाच ट्रक्टर असेल किंवा त्याच्या जवळच्या कुटुंबीयांकडे जर ट्रक्टर असेल तर काही प्रकरणांमध्ये या योजनेचा लाभ सदर शेतकरी घेऊ शकणार नाहीत .
Tractor Anudan Yojana आवश्यक कागदपत्रे
Tractor Anudan Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जासोबत काही कागदपत्रे सोबत जोडणे गरजेचे आहेत . टी कागदपत्रे खालीलप्रमाणे :
1 ) रहिवासी दाखला .
2 ) जातीचे प्रमाणपत्र .
3 ) जमीन मालकीची कागदपत्रे ( 8 A आणि 7/12 उतारा ).
4 ) बँकेचे पासबुक .
5 ) पासपोर्ट आकाराचे 2 फोटो .
How To Apply Tractor Subsidy
Tractor Anudan Yojana चा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या वापरून शेतकरी सादर योजनेचा लाभ घेऊ शकतात :
1 ) अर्जदार शेतकऱ्याने सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला लॉगिन करावे . ( अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिली आहे .)
2 ) आता वेबसाईटच्या होमपेजवर आल्यावर तिथे ‘ नवीन अजदार नोंदणी ‘ हा उजव्या कोपऱ्यात असणारा पर्याय निवडा .
3 ) आता तुम्ही एका नवीन पेजवर याल . इथे तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थित भरायचा आहे .
4 ) सर्व माहिती भरून झाल्यावर आता ‘ नोंदणी करा ‘ हा पर्याय निवडा .
5 ) आता तुमची अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे .
6 ) आता यानंतर अर्जदाराने युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे .
7 ) आता होमपेजवरील कृषी विभाग या पर्यायामधील ट्रक्टर अनुदान योजनेची लिंक निवडा .
8 ) आता तुमच्या समोर तुमच्या योजनेचा अर्ज उघडेल .
9 ) आता सदर अर्ज व्यवस्थित भरा आणि आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा .
10 ) आता ‘ नोंदणी ‘ या बटनावर क्लिक करा .
11 ) आता तुमच्या ट्रक्टर अनुदान योजनेची अर्जप्रक्रिया पूर्ण झालेली आहे .
Tractor Subsidy Apply Online
FAQ – Tractor Anudan Yojana
ट्रक्टर अनुदान योजना काय आहे ?
ट्रक्टर अनुदान योजना हि महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते .
ट्रॅक्टरवर 50 टक्के सबसिडी म्हणजे काय?
ट्रक्टर अनुदान योजनेअंतर्गत ट्रक्टर खरेदीवर 50 % सबसीडी दिली जाते . उदा -जर आखाडा शेतकरी जर 2 लाख 50 हजाराचा ट्रक्टर खरेदी करणार असेल तर त्याला शासनातर्फे 1 लाख 25 हजार सबसिडी दिली जाते . म्हणजेच शेतकऱ्याने फक्त 1 लाख 25 हजार रुपये भरायचे आहेत . असा त्याचा अर्थ होतो .
महाराष्ट्रात ट्रॅक्टरवर काही सबसिडी आहे का?
होय , महाराष्ट्रात ट्रक्टर खरेदीवर सरकारतर्फे 50 % सबसिडी दिली जाते .