Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana : नमस्कार मंडळी ,आजच्या लेखात आपण प्रधान मंत्री किसान मानधन योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत . Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana ची सुरुवात सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी सप्टेंबर 2023 मध्ये केली . सदर योजने द्वारे आता राज्यातील शेतकऱ्याला आता त्याच्या वयाच्या 60 वर्षानंतर निवृत्ती पेन्शन भेटणार आहे .
शेतकरी हा आपल्या शेतात दिवसभर राबतो . आणि संपूर्ण देशाला धान्याचा पुरवठा करत असतो . परंतु हे सर्व करत असताना त्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत असतो . जसे कि भांडवल अपुरे असणे , शेतीमध्ये शारीरिक कष्ट जास्त करावे लागणे , अपुरा पाऊस , शेती अवजारांची कमतरता इत्यादी . काही वेळेस पाऊस जास्त पडतो त्यामुळे संपूर्ण पिकाच खराब होऊन जाते .
काही वेळेस खूप जास्त दुष्काळ पडतो . त्यामुळे शेती करणे अवघड होऊन जाते . पाण्याच्या अभावी शेतकऱ्यास काही करता येत नाही . शेती करणे शक्य होत नाही . परिणामी शेतकऱ्याला आपले घर चालवणे देखील अवघड होऊन जाते . बऱ्याच वेळा शेतकऱ्याला आपले घरातील गरजा भागवण्यासाठी कर्ज देखील काढावे लागते .
शेतकऱ्याने काढलेले कर्ज तो शेतीत काही न पिकाल्यामुळे पुन्हा फेडू शकत नाही . आणि परिणामी शेतकरी आत्महत्तेस प्रवृत्त होतो . हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana सुरु केली . हि योजना काय आहे , या योजनेची उद्दिष्टे काय आहेत , फायदे काय आहेत , पात्रता काय आहे , आवश्यक कागदपत्रे कोणती , अर्ज कसा करावा इत्यादी विषयी माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत .
प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे ? | What Is Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana हा सरकारचा शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धात्वामध्ये सुरक्षा प्रदान करण्याचा एक कार्यक्रम आहे . ज्याद्वारे ज्या शेतकऱ्यांची नावे हि 1 ऑगस्ट 2019 पर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाच्या भूमी नोंदणी मध्ये आहेत तसेच ज्या शेतकर्यांकडे 2 हेक्टर पर्यंत लागवड करण्यायोग्य जमीन आहे . अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
जे शेतकरी वय वर्षे 18 ते 40 दरम्यान आहेत .असे सर्व लहान आणि सीमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात . जे शेतकरी 60 वर्षे वयापर्यंत पोचले आहेत आणि त्याने जर Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana चा लाभ घेतला असेल तर तर त्या शेतकऱ्याला किमान रुपये 3000 पेन्शन खात्रीशीर मिळेल .
जर एखाद्या केस मध्ये शेतकरी पती किंवा पत्नीचा मृत्यू झालेला असेल तर त्या केस मध्ये जोडीदार पती किंवा पत्नीला 50 % निवृत्ती पेन्शन मिळेल . सदर योजनेअंतर्गत फक्त पती किंवा पत्नी कौटुंबिक पेन्शन साठी पात्र असतील . प्रधानमंत्री किसान मानधन योजना ची मुदत पूर्ती झाल्यावर त्या व्यक्तीस रुपये 3000 निवृत्ती पेन्शन मिळेल .
ज्या शेतकऱ्याचे वय 18 ते 40 आहे अशा शेतकऱ्यांना ते 60 वर्षांचे होईपर्यंत दर महिन्याला 55 ते 200 रुपये मिळतील . ज्या शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतला आहे असा शेतकरी पेन्शनची रक्कम प्राप्त करण्यास पात्र आहे . सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दर महिन्याला पूर्व निर्धारित अशी पेन्शनची रक्कम ठेवली जाते .
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana थोडक्यात
योजनेचे नांव | प्रधानमंत्री किसान मानधन योजना |
योजना कधी सुरु झाली | सन 2019 |
योजना कोणी सुरु केली ( pradhan mantri kisan mandhan yojana launch date ) | केंद्र सरकार |
योजनेचा उद्देश | अर्जदार शेतकऱ्याला त्याच्या वृद्धापकाळात पेन्शन देणे . |
योजनेचा फायदा | वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्याला पेन्शन मिळते . |
पात्रता | वय वर्षे 18 ते 40 असलेले शेतकरी ज्यांच्याकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे . |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
लाभ कधी मिळेल | वयाच्या 60 वर्षानंतर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://labour.gov.in/pmsym |
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana उद्दिष्टे
Pradhaan Mantri Kisan Mandhan Yojana अंतर्गत सरकारने खालील उद्दिष्टे ठेवली आहेत .
1 ) अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे .
2 ) देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात स्वावलंबी होण्यास मदत करणे .
3 ) लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विकास करणे .
4 ) सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करणे .
5 ) शेतकऱ्यांना समाजात आत्मसन्मानाने जगण्यास मदत करणे .
6 ) शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे .
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana फायदे
Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana चे शेतकऱ्यांना होणारे फायदे आपणास पुढीप्रमाणे सांगता येतील :
1 ) सदर योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी घेतला आहे अशा शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर खात्रीशीर रीत्या रुपये 3000 निवृत्ती पेन्शन मिळेल .
2 ) सदर पेन्शन योजना कौटुंबिक परिवर्तनीय आहे . म्हणजेच जर शेतकर्याचा मृत्यू झाला तर पती किंवा पत्नीस 50 % निवृत्ती पेन्शन मिळेल .
3 ) प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दर महिन्याला पूर्वनिर्धारित पेन्शन रक्कम ठेवली जाईल .
4 ) योजनेत प्रवेश केल्यावर जर एखाद्या शेतकर्याने जर 10 वर्षाच्या आत मधेच जर योजना लाभ घेणे सोडले तर बचत बँकेच्या व्याजासह त्याला परत दिली जाईल .
5 ) जर एखाद्या केस मध्ये योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी किंवा पती टी योजना आवश्यक ते योगदान देऊन पुढे चालू ठेऊ शकतो .
6 ) एखाद्या केस मध्ये जर लाभार्थी शेतकरी आणि त्याचा जोदादार या दोघांचा मृत्यू झाला तर संपूर्ण निधी हा पुन्हा निधीमध्ये जमा होईल .
7 ) वय वर्षे 18 ते 40 मधील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना रुपये 55 ते 200 एवढे योगदान दर महिन्याला द्यावे लागेल . वयाच्या 60 वर्षानंतर त्या शेतकर्याला दर महिन्याला रुपये 3000 खात्रीशीर मिळतील .
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana पात्रता
प्रधानमंत्री किसान मानधन योजना चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे .
1 ) सदर योजनेसाठी लहान व अल्पभूधारक शेतकरी पात्र असतील .
2 ) लाभार्थ्याचे वय 18 ते 40 च्या दरम्यान असावे .
3 ) लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान 2 हेक्टर जमीन असावी .
4 ) राज्य किंवा केंद्रशाषित प्रदेशाच्या भूमी नोंदणी मध्ये शेतकऱ्याची जमीन नोंदणी असावी.
योजनेसाठी अपात्रता
1 ) ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना तसेच प्रधानमंत्री व्यापारी मानधन योजनेचा लाभ घेतला आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतील .
2 ) जे शेतकरी संवैधानिक पदावर आहेत तसेच जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष ( वर्तमान तसेच पूर्वीचे ) , महानगरपालिकेचे वर्तमान आणि पूर्वीचे महापौर , राज्यसभा , लोकसभा , विधानसभा आणि विधानपरिषद यांचे आजी आणि माझी सदस्य हे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत .
3 ) सेवा निवृत्त अधिकारी , केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रालय आणि कार्यालयाचे कर्मचारी , केंद्र व राज्य सरकार अंतर्गत येणारी कार्यालये / स्वायत्त संस्था सदस्य , तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी ( गट – ड वगळता ) हे सार्वजन या योजनेसाठी अपात्र आहेत .
4 ) व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत असणारे व्यावसायिक , अभियंता , वकील , डॉक्टर वास्तुविशारद तसेच लेखापाल जे स्वताचा व्यवसाय सक्रियपणे करत आहेत ते या योजनेस पात्र नाहीत .
आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असताना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत :
1 ) अर्जदाराचे आधारकार्ड .
2 ) अर्जदाराचे ओळखपत्र .
3 ) अर्जदाराच्या वयाचे प्रमाणपत्र .
4 ) अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला .
5 ) अर्जदाराच्या बँक खात्याचे पासबुक .
6 ) अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो .
7 ) अर्जदाराचा मोबाईल नंबर .
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana Registration | ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
1 ) Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana अंतर्गत नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जावे .
2 ) शेतकऱ्याने जमिनीची कागदपत्रे आणि स्वताचे आणि कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला सदर केंद्रात सादर करावा .
3 ) केंद्रामध्ये शेतकऱ्याने आपल्या बँक खात्याची संपूर्ण माहिती द्यावी .
4 ) शेतकऱ्याचा अर्ज आधारकार्डशी जोडला जाईल आणि शेतकऱ्याला पेन्शन खाते क्रमांक दिला जाईल .
Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana In Marathi Apply Online | ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
1 ) प्रधानमंत्री किसान मानधन योजना अंतर्गत शेतकऱ्याने सर्वात प्रथम https://labour.gov.in/pmsym या वेबसाईट वर लॉगिन करावे .
2 ) आता तुम्ही या वेबसाईटच्या होमपेजवर याल . इथे तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण भरायचा आहे .
3 ) त्यानंतर एक OTP जाणारेत करायचा आहे .
4 ) तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल . तो OTP तुम्हाला टाकायचा आहे .
5 ) सर्वात शेवटी तुम्हाला आता ‘ Submit ‘ या बटनावर क्लिक करायचे आहे .
प्रधानमंत्री किसान मानधन योजना अंतर्गत भरावे लागणारे हप्ते
वय ( वर्षामध्ये ) | 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 |
हप्ता ( रुपये ) | 55 | 58 | 61 | 64 | 68 | 72 | 76 | 80 | 85 | 90 |
वय ( वर्षामध्ये ) | 28 | 29 | 30 | 31 | 32 | 33 | 34 | 35 | 36 | 37 | 38 | 39 | 40 |
हप्ता ( रुपये ) | 95 | 100 | 105 | 110 | 120 | 130 | 140 | 150 | 160 | 170 | 180 | 190 | 200 |
FAQ – Pradhan Mantri Mandhan yojana
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे ?
महाराष्ट्रातील शेतकरी ज्यांचे वय 18 ते 40 दरम्यान आहे आणि ज्यांच्याकडे 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत .
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचा 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला ?
जर शेतकऱ्याचा मृत्यू वय वर्षे 60 पूर्वी झाला तर त्याच्या पती / पत्नीला पेन्शन दिली जाईल .
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा उद्देश काय आहे ?
शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन देणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा उद्देश आहे .
प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत 40 वर्षाच्या वरील शेतकरी नोंदणी करू शकतात का ?
40 वर्षापेक्षा जास्त वय असलेले शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत नोंदणी करू शकत नाहीत . कारण या योजनेचे पात्रता वय 18 ते 40 आहे .