Ayushman Bharat Yojana : नमस्कार मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर नेऊन ठेवली आहे . जगाच्या तुलनेत आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे . तरी पण अजूनही आपल्या देशात गरिबांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते .
दारिद्र्य रेषेखालील गरिबांना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना रोज तोंड द्यावे लागते . गरिबांना घर नसते , रोजगार नसतो , पैसे नसतात , तसेच कधी जर कुणी आजारी पडले तरी संपूर्ण कुटुंबावर संकट येते . अशा परिस्थितीत जर काही मोठा असाध्य असा रोग झाला किंवा उपचार करण्यासाठी एखादी शस्त्रक्रिया करावी लागली तरी गरिबीमुळे काहीही करणे त्या कुटुंबाला शक्य होत नाही .
सरकारच्या काही योजनांचा काही प्रमाणात लाभ घेता येतो पण तो लाभ सर्वांनाच घेता येईल असे नाही . याच गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक योजना आणली आहे . या योजने अंतर्गत भारतातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत अशा व्यक्तींना आता भारत सरकारने 5 लाखांपर्यंतचा आरोग्य सेवा तेही अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहे .
Ayushman Bharat Yojana या योजने अंतर्गत आता गरीब आणि आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत अशा लोकांना कोणत्याही दवाखान्यात आता 5 लाखांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळणार आहे . त्यामुळे आता गरीबानाही त्यांच्या आरोग्य सेवा वापरून मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणार आहेत .
Ayushman Bharat Yojana Card जे भारत सरकार कडून जारी केले जाते याचा वापर करून 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत घेता येतात . या सर्व सुविधा घेण्यासाठी पात्रता काय आहे , या योजनेचे फायदे काय आहेत , अर्ज कसा करावा , Ayushman Bharat Yojana Card कसे काढावे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .
आयुष्मान भारत विमा योजना काय आहे? | What Is Ayushman Bharat Yojana
आयुष्मान भारत विमा योजना हि योजना संपूर्ण भारतात राबवली जाते . महाराष्ट्रात हि योजना ‘ महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना ‘ या नावाने राबवली जाते . Ayushman Bharat Yojana Scheme अंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी Ayushman Bharat Yojana Card काढावे लागते . या कार्ड अंतर्गत 5 लाखांचे आरोग्य सेवा मोफत दिली जाते .
Ayushman Bharat Yojana Maharashtra थोडक्यात
योजनेचे नांव | आयुष्मान भारत योजना |
योजना कधी सुरु झाली | 23 सप्टेंबर 2018 |
योजना कोणी सुरु केली | पंतप्रधान नरेंद्र मोदि |
योजनेचा उद्देश | गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे . |
योजनेचा फायदा | गरिबांना मोफत आरोग्य सेवा कवच प्रदान करणे . |
लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंब / व्यक्ती . |
आयुष्मान भारत योजनेची उद्दिष्टे
आयुष्मान भारत योजने अंतर्गत शासनाने काही उद्दिष्टे समोर ठेऊन सदर योजना सुरु केली आहे . ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे :
आरोग्यविषयक सुरक्षितता
आयुष्मान भारत योजने अंतर्गत गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना आरोग्य विषयक सुविधा प्रदान करणे . यामध्ये पात्र कुटुंबाला रुपये 5 लाखांपर्यंतचा वार्षिक आरोग्य विमा देण्यात येतो . यामध्ये रुग्णालयात दाखल करणे , रुग्णाची शस्त्रक्रिया करणे , औषधे घेणे तसेच इतर आरोग्य सुविधांचा समावेश करण्यात येतो .
आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता
Ayushman Bharat Yojana अंतर्गत आता गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे .
उपचारांमध्ये समानता
श्रीमंत व्यक्ती उपचार घेऊ शकतात पण गरिबांना ते उपचार परवडत नाहीत म्हणून गरीब आणि श्रीमंत यांच्या उपचारात समानता आणणे .
आरोग्य सुविधांची हमी
Ayushman Bharat Yojana अंतर्गत पात्र रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे , औषधोपचार घेणे , शस्त्रक्रिया करणे तसेच इतर सोई मोफत उपलब्ध करून देणे .
Ayushman Bharat Yojana चे फायदे
Ayushman Bharat Yojana चे अनेक फायदे आहेत ते पुढे दिले आहेत :
भारतात कोठेही वापर
आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आपणास संपूर्ण भारतात कुठेही वापरता येते . त्यामुळे तुम्ही संपूर्ण भारतात कुठेही असाल तरी या कार्डचा वापर तुम्ही करू शकता .
वार्षिक 5 लाखांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण
सदर योजने अंतर्गत भारतातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना भारत सरकार तब्बल 5 लाखांचा वार्षिक विमा संरक्षण मिळतो .
सुरक्षित
सदर योजने अंतर्गत पात्र कुटुंबास 5 लाखांचा वार्षिक आरोग्य संरक्षण विमा मिळतो . त्यामुळे गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना आरोग्य कवच मिळते आणि ते पण मोफत .
गोपनीयता
सदर योजने अंतर्गत रुग्णाची सर्व माहिती हि गोपनीय ठेवली जाते . या माहितीला साठवले जाते आणि संरक्षण दिले जाते .
वापरण्यास सोपे आणि सोयीस्कर
Ayushman Bharat Yojana Card हे वापरण्यास अतिशय सोपे आहे . त्यामुले ते कार्ड कोणीही वापरू शकते .
How To Make Ayushman Card ?
ayushman bharat yojana card आपणास 2 प्रकारे मिळवता येते . एक तर ‘ ABHA ‘ या मोबाईल app वरून आणि दुसरे म्हणजे तुम्ही या योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता . नोंदणी कशी करावी आणि AABHA कार्ड कसे मिळवावे याविषयी माहिती पुढे देण्यात आली आहे .
1 ) ‘AABHA’ App
या प्रकारे Ayushman Bharat Yojana Card मिळवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर ‘AABHA’ हे अप्लिकेशन डाउनलोड करा . अप्लिकेशन फॉर्म मध्ये सर्व माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा . आणि अर्ज सबमिट करा . यानंतर तुम्हाला 14 अंकी AABHA कार्ड नंबर मिळेल .
2 ) Ayushman Bharat Yojana Apply Online
ऑनलाईन नोंदणी साठी तुम्हाला सर्वात प्रथम https://abha.abdm.gov.in/abha/v3/register या वेबसाईटवर लॉगिन करावे लागेल . लॉगिन केल्यावर येथे तुम्हाला तुमचा अर्ज संपूर्ण भरून घ्यायचा आहे . आणि सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत .आणि अर्ज सबमिट करायचा आहे . आता अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा 14 अंकी ABHA कार्ड नंबर मिळेल .
3 ) ऑफलाईन नोंदणी
ऑफलाईन नोंदणीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयाशी संपर्क साधा . तिथून नोंदणी अर्ज घ्या आणि त्यात संपूर्ण माहिती भरा . आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करा . त्यानंतर तेथील आरोग्य कार्माचार्याद्वारे तुम्हाला ABHA कार्ड जारी केले जाईल .
Ayushman Bharat Yojana Card आवश्यक कागदपत्रे
Ayushman Bharat Yojana अंतर्गत अर्ज भरताना खालील कागदपत्रांची गरज भासते .
1 ) कुटुंबाचे शिधा पत्रक .
2 ) संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड .
3 ) लाईट बिल पत्त्याच्या पुराव्यासाठी .
4 ) अर्जदाराचा मोबाईल नंबर .
आयुष्मान कार्ड हॉस्पिटलमध्ये कसे वापरावे?
आयुष्मान कार्ड हे सर्व दवाखान्यात चालत नाही . आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यात आयुष्मान भारत कार्ड चालते . यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे रुग्णालयात जमा करण्याची गरज नाही . सरकारी दवाखान्यात हे कार्ड दाखवले कि आरोग्य कर्मचारी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करतो . तेथे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही .
Ayushman Bharat Yojana Eligibility ( पात्रता )
1 ) अर्जदार व्यक्ती भारताची नागरिक असावी .
2 ) आर्थिक दृष्ट्या गरीब आणि कमकुवत कुटुंबे म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे .
3 ) घरामध्ये 16 वर्षावरील कोणतीही व्यक्ती कमावणारी नसावी .
4 ) अर्जदार SC / ST प्रवर्गातील असावा .
FAQ – Ayushman Bharat Yojana
आयुष्मान भारत कार्डसाठी कोण पात्र आहे?
SC / ST कुटुंबे ज्यांचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत .
आयुष्मान भारत विमा योजना काय आहे?
आयुष्मान भारत विमा हि केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजने अंतर्गत SC / ST कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे .अशी कुटुंबे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत .
आयुष्मान कार्ड मिळविण्यासाठी किती वेळ लागतो ?
लाभार्थ्याची ओळख पटल्यावर काही मिनिटातच आयुष्मान कार्ड मिळते .
5 लाख आयुष्मान कार्डची मर्यादा किती आहे?
प्रत्येक वर्षी प्रती व्यक्ती 5 लाखांपर्यंतच्या आरोग्य सेवा या पात्र कुटुंबास प्राप्त होतील .
आयुष्मानचे गोल्डन कार्ड काय आहे?
आयुष्मान भारत गोल्डन कार्ड अंतर्गत पात्र कुटुंबांना मोफत अखंड आणि पेपरलेस आरोग्य सेवा मिळते .
आयुष्मान भारत हेल्थ कार्ड कसे तयार करावे?
ऑनलाईन ABHA कार्ड काढत असताना ‘ABHA ‘ अप्लिकेशन किंवा अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही आयुष्मान भारत कार्ड तयार करू शकता . तसेच ऑफलाईन कार्ड काढण्यासाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र किंवा दवाखान्यात जाऊन अर्ज भरू शकता . तेथील आरोग्य सेवक तुम्हाला ABHA कार्ड प्रदान करतील .
आयुष्मान कार्डची शिल्लक कशी तपासायची?
आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी नांव हा पर्याय निवडा . त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल . तो OTP टाका . आणि लॉगिन करा .
आयुष्मान भारत कार्ड कसे वापरावे?
आयुष्मान भारत कार्ड हे संपूर्ण भारतात सरकारी विशिष्ट कोणत्याही रुग्णालयात कोठेही वापरता येते .
आयुष्मान कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड , आधाकार्ड , पत्य्याचा पुरावा एवढी कागदपत्रे काढण्यासाठी लागतात .
आयुष्मान कार्डमध्ये किती रोग समाविष्ट आहेत?
आयुष्मान भारत योजना कार्ड अंतर्गत एकूण 1760 रोगांचा समावेश आहे . तसेच 196 रोगांवर उपचार तसेच शस्त्रक्रिया टी पण मोफत उपलब्ध आहे .
आयुष्मान भारत कार्डसाठी KYC कसे करावे?
आयुष्मान भारत कार्डचे KYC पूर्ण करण्यासाठी
इतर महत्वाच्या योजना
प्रधानमंत्री किसान मानधन योजना