Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana : महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे असे म्हटले जाते . महाराष्ट्रात अनेक सोई सुविधा महाराष्ट्र शासनाने शिक्षणासाठी करून दिल्या आहेत . आणि सर्वजण या शैक्षणिक सोयींचा फायदा देखील घेत आहेत परंतु सर्वच विद्यार्थ्यांना या सोयींचा फायदा घेता येत नाही . त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते .
भारतात लहान मुलांना वयाच्या 14 वर्षापर्यंत शिक्षण अगदी मोफत आहे . परंतु जेव्हा उच्च शिक्षण घेण्याची वेळ येते तेव्हा उच्च शिक्षणासाठी खूप पैसे भरावे लागतात . आणि पैसे भाराने सर्व पालकांना शक्य होत नाही . पर्यायाने त्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते . आणि त्यांना पर्यांनी शिक्षण घ्यावे लागते . आणि रोजगार शोधावा लागतो .
महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक योजना आहेत . परंतु या योजनांचा फायदा सर्व गटातील विद्यार्थ्यांना घेता येत नाही . हीच गोष्ट महाराष्ट्र सरकारने लक्षात घेऊन महाराष्ट्रातील ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे . या योजनेच्या माध्यमातून ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाते .
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 ही योजना काय आहे ? , या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ? , या योजनेचे फायदे काय आहेत ? , या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे ? , या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत . त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे ?
‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे . ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आजही उच्च शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच आर्थिक बाबींचा सामना करावा लागतो . त्यामुळे महाराष्ट्र शासन ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana या योजने अंतर्गत रुपये 60,000 आर्थिक मदत देणार आहे .
ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खर्चाची चिंता न करता विद्यार्थ्यांचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे यासाठी Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana हि योजना महाराष्ट्र शासनाने आणली आहे . या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम DBT द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात पाठवले जातात .
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024
योजनेचे नांव | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |
योजना कधी सुरु झाली ? | सन 2024 |
योजना कोणी सुरु केली ? | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महाराष्ट्राचे रहिवासी असणारे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी |
लाभ | रुपये 60,000 /- |
अर्जप्रक्रिया | ऑफलाईन |
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana : उद्दिष्टे
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana या योजनेची काही उद्दिष्टे आहेत . ती पुढीलप्रमाणे :
1 ) ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे
आर्थिक परिस्थिती अभावी उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने बहुतांशी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण घेता येत नाही . शिक्षणापासून वंचित राहावे लागते . असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने ‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ अंतर्गत अशा विद्यार्थ्यांना रुपये 60,000 अर्थसहाय्य दिले जाते .
2 ) उच्च शिक्षणाचा लाभ
ओबीसी समाजातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि त्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये . म्हणून या योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे .
3 ) सन्मान
या योजने अंतर्गत भारताला शिक्षणाचा वारसा दिलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना सन्मान देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे .
4 ) आर्थिक विकास
या योजनेच्या माध्यमातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रोत्साहित करणे .
5 ) सर्वांगीण विकास
या योजनेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे .
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana : फायदे
‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ ही योजना महाराष्ट्र शासनाने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सुरू केलेली एक योजना आहे . या योजने अंतर्गत पुढील फायदे होतात :
1 ) आर्थिक मदत
ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्यासाठी रुपये 60,000 वार्षिक आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते . त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे आता सुकर होणार आहे .
2 ) उच्च शिक्षणाची संधी
या योजनेचा लाभ आर्थिक स्वरूपात होत असल्यामुळे याचा उपयोग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी होतो . त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते .
3 ) पालकांवर कमी आर्थिक भार
या योजनेमुळे महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना रुपये 60,000 आर्थिक मदत करणार आहे . यामुळे पालकांवरील शिक्षणाचा आर्थिक भार कमी होणार आहे .
4 ) सामाजिक प्रगती
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फायदा मिळाल्यामुळे ओबीसी समाजाची देखील सामाजिक प्रगती होईल .
5 ) विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित
महाराष्ट्र सरकार ‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ अंतर्गत आर्थिक मदत मिळत असल्यामुळे विद्यार्थी आर्थिक चिंता सोडून निश्चिंत होऊन आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात .
6 ) उच्च शिक्षण घेण्यात सुलभता
कुटुंबावरील शिक्षणाचे ओझे कमी होऊन या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात सुलभता येते .
7 ) सामाजिक विकास
ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत असल्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर सामाजिक विकास देखील होईल .
8 ) राहणीमानाचा दर्जा उंचावतो
‘Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ या योजनेच्या अंतर्गत कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतात . त्यामुळे याचा फायदा त्यांना भविष्यात त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी होतो .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुढील पात्रता धारण करणे गरजेचे आहे .
1 ) या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा .
2 ) अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न रुपये 2,50,000 पेक्षा कमी असावे .
3 ) अर्जदार हा ओबीसी या प्रवर्गातील असावा . तसेच त्याच्याजवळ जातीचा दाखला असणे आवश्यक आहे .
4 ) विद्यार्थी अपंग श्रेणीतून अर्ज करत असेल तर त्याच्याजवळ 40% अपंग असल्याचे प्रमाणपत्र असावे .
5 ) अनाथ श्रेणीतून अर्ज करणार्या विद्यार्थ्याकडे अनाथ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
6 ) जर एखादा विद्यार्थी बाहेरच्या शहरात शिकत असताना वसतिगृह किंवा भाड्याने राहत असेल तर असे विद्यार्थी देखील ‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ या योजनेसाठी अर्ज करू शकतात .
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana : अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
विभाग / क्षेत्र | पुणे , मुंबई तसेच इतर महानगरातील विद्यार्थी | महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे विद्यार्थी | जिल्हा तसेच तालुका मुख्यालयातील विद्यार्थी |
निर्वाह भत्ता | रु . 8,000 | रु . 15,000 | रु . 6,000 |
घर भत्ता | रु . 20,000 | रु . 8,000 | रु . 12,000 |
जेवण भत्ता | रु . 32,000 | रु . 28,000 | रु . 25,000 |
एकूण वार्षिक मिळणारी रक्कम | रु . 60,000 | रु . 51,000 | रु . 43,000 |
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना कागदपत्रे
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Documents
‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते . त्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात :
1 ) अर्जदाराचे आधारकार्ड
2 ) अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र
3 ) अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा
4 ) कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
5 ) कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा
6 ) 10 वी आणि 12 चे गुणपत्रक
7 ) अर्जदाराचे बँक खात्याचे पासबुक
8 ) अर्जदाराचा मोबाईल नंबर
9 ) अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana How To Apply
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो . ऑफलाईन पद्धतीने आर करण्याची पद्धत खाली दिली आहे . त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता .
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Apply Online
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकत नाही . यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरावा लागेल . खालील पायर्यांचा वापर करून तुम्ही अर्ज ऑफलाईन भरू शकता :
1 ) सर्वात प्रथम तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण ऑफिसमध्ये जा .
2 ) तिथे गेल्यावर ‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ या योजनेचा त्यांना अर्ज मागा .
3 ) अर्ज मिळाल्यावर तो अर्ज व्यवस्थित भरा . अर्जात चुकीची माहिती भरू नका .
4 ) त्यानंतर त्यासोबत योग्य ती कागदपत्रे जोडा .
5 ) त्यानंतर तो अर्ज तेथे जमा करा .
निष्कर्ष
‘ Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ‘ ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजनेतून महाराष्ट्र सरकार ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी वार्षिक रुपये 60,000 आर्थिक मदत करणार आहे . याचा उपयोग कोणतीही आर्थिक चिंता न करता फक्त अभ्यासावर विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करता येईल . आणि त्यामुळे त्याचा उपयोग त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी होईल . त्यामुळे या योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावा .
मित्रांनो , आम्ही आशा करतो कि हा लेख तुम्हाला आवडला असेल . तरीही या लेखासंदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट करून सांगू शकता . आम्ही तुमची मदत करण्यासाठी तत्पर आहोत . आणि अशीच माहिती रोज पाहण्यासाठी mahajobyojana.in या आमच्या वेबसाईटला व्हीजीट करा .