Sauchalay Anudan Yojana : महाराष्ट्र राज्य हे एक प्रगत राज्य मानले जाते . गेल्या काही दशकात महाराष्ट्राची प्रगती खूपच जोमात झाली आहे . तरीही आज देखील महाराष्ट्रातील जवळपास 16.8 % लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य भोगत आहे . आजही ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो . तेव्हा कुठे त्यांना दोन वेळचे अन्न मिळते .
ग्रामीण भागातील लोकांचे हालाखीचे जीवन आणि त्यांचा रोजचा संघर्ष बघून केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात राहणार्या दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी खूप प्रकारच्या योजना आणल्या आहेत . आणि या योजनांचा फायदा ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना होतो . त्यातीलच एक योजना म्हणजे Sauchalay Anudan Yojana होय .
Sauchalay Anudan yojana काय आहे ? , या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ? , फायदे काय आहेत ? , पात्रता काय आहे ? , या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज कसा करावा ? इत्यादी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र काय आहे ?
Sauchalay Anudan yojana ही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची संयुक्त युती असलेली एक योजना आहे . या योजने अंतर्गत ग्रामीण भागात राहणार्या आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमानाने शौचालाय बांधण्यासाठी रुपये 12,000 एवढे अनुदान देण्यात येते . हे अनुदान पात्र कुटुंबाला 2 टप्प्यांमध्ये दिले जाते . यामध्ये केंद्र सरकारचा जवळ जवळ 75% वाटा आहे म्हणजेच केंद्र सरकार रुपये 9,000 देते तर महाराष्ट्र सरकारचा वाटा 25% आहे . म्हणजेच महाराष्ट्र सरकार यासाठी रुपये 3,000 एवढे अनुदान देते .
ग्रामीण भागातील काही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाकडे आजही शौचालय उपलब्ध नाही . त्यामुळे त्यांना बाहेर उघड्यावर शौचासाठी जावे लागते . शौचालय बांधण्याइतके त्यांच्याकडे पैसे नसतात . त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरते आणि रोगराई पसरते . लोक आजारी पडतात . अशा कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने घोषणा केली आहे .
Sauchalay Anudan Yojana In Marathi
योजनेचे नांव | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र |
योजना कोणी सुरू केली ? | केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमानाने या योजनेची सुरुवात झाली . |
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवण्यात येते ? | ग्राम विकास विभाग |
लाभार्थी | ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे |
लाभ | रुपये 12,000 अनुदान |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल . |
Sauchalay Anudan yojana : उद्दिष्टे
‘ Sauchalay Anudan yojana ‘ सुरु करण्याच्या मागे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची काही उद्दिष्टे आहेत . ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे :
1 ) देशाला स्वच्छ बनवणे हा या योजनेच्या सुरू करण्याच्या मागील उद्देश आहे .
2 ) उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करणे हा या योजनेचा उद्देश आहे .
3 ) केंद्र सरकार आहे महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण भागातील लोकांना स्वतःचे शौचालाय बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे .
4 ) शौचालयाचा वापर करून परिसर स्वच्छ ठेवणे .
5 ) विविध प्रकारच्या रोगराई पासून ग्रामीण भागातील लोकांचे संरक्षण करणे हा या योजनेच्या मागील उद्देश आहे .
6 ) नागरिकांना शौचालय बांधण्यास प्रोत्साहित करणे हा Sauchalay Anudan Yojana या योजनेचा उद्देश आहे .
7 ) शौचालयाच्या महत्वा विषयी समाजात जागरूकता निर्माण करणे .
Sauchalay Anudan yojana : फायदे
Sauchalay Anudan yojana ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजनेचे फायदे पुढील प्रमाणे :
1 ) रुपये 12,000 स्वत:चे शौचालय बांधण्यासाठी शासनातर्फे अनुदान मिळते .
2 ) परिसर स्वच्छता राखता येते .
3 ) रोगराई पासून मुक्ती मिळते .
4 ) गरीब कुटुंबांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे .
5 ) दुर्गंधी पासून मुक्तता मिळते .
6 ) उघड्यावर शौचास जावे लागत नसल्यामुळे महिलांचा आत्मसन्मान जपला जातो .
7 ) ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास ही योजना सहाय्यक आहे .
8 ) अर्ज भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे .
Sauchalay Anudan Yojana Eligibility : पात्रता आणि अटी
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरु केलेल्या ‘ Sauchalay Anudan Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता पूर्ण करावी लागते . त्या पात्रता पुढील प्रमाणे :
1 ) अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी .
2 ) अर्ज करणारी व्यक्ती बाहेरची राज्यातील रहिवासी असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
3 ) ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील व्यक्तींनाच म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येईल .
4 ) ज्या ग्रामीण घरांमध्ये शौचालय नाही फक्त अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल .
5 ) ग्रामीण भागातील एका कुटुंबाला Sauchalay Anudan Yojana या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल .
6 ) शौचालय देखभालीचा खर्च कुटुंबाला स्वतः करावा लागेल .
7 ) याअगोदर कुटुंबाने अशा प्रकारच्या योजनेचा लाभ केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून मिळवला असेल तर असे कुटुंब या योजनेसाठी पात्र नसेल .
8 ) ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांनी घरकुल योजना किंवा शबरी घरकुल योजना या योजनांचा लाभ घेतला आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल . त्यांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाईल .
9 ) कुटुंबातील कुणी सरकारी नोकरीत असेल तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
Sauchalay Anudan Yojana : कागदपत्रे
Sauchalay Anudan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे :
1 ) अर्जदाराचे आधारकार्ड
2 ) अर्जदाराचा पत्त्याचा पुरावा
3 ) अर्जादाचा उत्पन्नाचा दाखला
4 ) अर्जदाराच्या वयाचा पुरावा ( जन्माचे प्रमाणपत्र / 10 चे मार्कलिस्ट / वाहन परवाना / पासपोर्ट )
5 ) अर्जदाराचे रेशन कार्ड
6 ) अर्जदाराचा रहिवासी दाखला
7 ) अर्जदाराच्या बँक खात्याचे पासबुक
8 ) अर्जदाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो
9 ) घोषणा पत्र
10 ) अर्जदाराचा मोबाईल नंबर
11 ) अर्जदाराचा ईमेल आयडी
How To Apply For Toilet Subsidy In Maharashtra
शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कसा अर्ज करू शकता ?
‘ Sauchalay Anudan Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता . ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा यासाठीची प्रक्रिया खाली सविस्तरपणे दिली आहे . त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून तुम्ही Sauchalay Anudan yojana या योजनेसाठी अर्ज भरू शकता .
Sauchalay Anudan Yojana Online Registration
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?
शौचालय योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पायर्यांचा वापर करून अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला 2 पायर्यांमध्ये अर्ज भरावा लागतो :
पहिली पायरी
1 ) सर्वात प्रथम शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ( शौचालय पोर्टल ) ला लॉगिन करा .
2 ) आता लॉगिन केल्यावर तुम्ही होमपेजवर याल . आता इथे Citizen Registration असे लिहिलेले दिसेल .
3 ) इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे . आणि ‘ Get OTP ‘ बटनावर क्लिक करायचे आहे .
4 ) आता तुमच्या मोबाईलवर एक OTP नंबर येईल . तो नंबर Enter OTP लिहिलेल्या ठिकाणी टाकायचा आहे .
5 ) आता खाली दिलेल्या ‘ Login ‘ या बटनावर क्लिक करा .
6 ) आता तुमचे Citizen Registration पूर्ण झाले आहे . तसा स्क्रीनवर तुम्हाला Successful असा मेसेज देखील येईल . त्याला ‘ OK ‘ करा
दुसरी पायरी
1 ) आता Registration पूर्ण झाल्यावर तुम्हाला Login ID आणि Passward टाकून ‘ Sign in ‘ करायचे आहे .
2 ) आता इथे तुम्हाला ‘ New Application ‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे . मग तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल .
3 ) आता इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे . आणि सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत .
4 ) त्यानंतर ‘Apply ‘ या बटनावर क्लिक करा .
5 ) अशा प्रकारे तुमचा शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेचा अर्ज भरून झालेला आहे .
Sauchalay Anudan Yojana : ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
‘ Sauchalay Anudan yojana ‘ या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे :
1 ) सर्वात प्रथम आपल्या गावातील ग्रामपंचायतीत जा . आता तिथे ‘ Sauchalay Anudan yojana ‘ या योजनेसाठीचा अर्ज मागा .
2 ) आता संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरा आणि त्याच्या सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा .
3 ) आता ‘ Sauchalay Anudan yojana ‘ या योजनेचा अर्ज ग्रामपंचायतीमध्ये जमा करा .
निष्कर्ष
‘ Sauchalay Anudan yojana ‘ ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवली जाणारी योजना आहे . या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी रुपये 12,000 अनुदान दिले जाते . त्यामुळे ग्रामीण भागातील लोक आपले आरोग्य चांगले ठेऊ शकतात , आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरणार नाही , रोगराई पसरणार नाही . पर्यायाने याचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी होईल .
मित्रांनो , आम्ही आशा करतो कि हा लेख तुम्हाला आवडला असेल . या लेखाबद्दल तुमच्या मनात काही शंका असेल तर या लेखाच्या खाली कमेंट करून विचारू शकता . आम्ही तुमचे शंका समाधान करण्यासाठी तत्पर आहोत . तसेच हा लेख तुमच्या गरजू मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा आणि त्यांनाही या योजनेचा फायदा मिळावा यासाठी मदत करा . आणि अशीच माहिती रोज मिळवण्यासाठी mahajobyojana.in ला व्हीजीट करा .