Mofat Silai Machine Yojana | फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र ; ग्रामीण भागातील गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन मिळवण्याची उत्तम संधी..!!!

Mofat silai Machine Yojana : नमस्कार मित्रांनो , आजच्या लेखात आपण केंद्र सरकारच्या एका नवीन योजने संदर्भात माहिती घेणार आहोत . आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ 76 वर्षांचा काळ लोटून गेला . तरी सुद्धा अजूनही आपल्या भारतातील दारिद्र्य संपलेले नाही . अजूनही काही लोक दारीद्र्यामध्ये आयुष्य जगात आहेत . आणि यातच आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत .

ग्रामीण भागात गरीब घरातील स्त्रिया काहीही छोटे मोठे काम करतात आणि आपल्या घराला हातभार लावतात . यामध्ये प्रामुख्याने शेतीकाम करणे प्रमुख आहे . तसेच बऱ्याच स्त्रिया घर सांभाळत छोटे छोटे व्यवसाय करतात आणि कुटुंबाला हातभार लावतात . त्यामध्ये प्रामुख्याने शिलाई काम होय . पण बऱ्याच स्त्रीयांना शिलाई मशीन विकत घेणे पण अवघड आहे . तेवढा पैसा शिलाई मशीन घेण्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध नसतो .

याच गोष्टीचा विचार करून केंद्र सरकारने मोफत शिलाई मशीन योजना सुरु केली आहे . या योजनेच्या माध्यमातून गरीब घरातील स्त्रीयांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे . स्त्रियांना कपडे शिवून पैसे मिळतील त्यामुळे स्त्रियांना आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे . सदर योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील गरीब घरातील स्त्रियांबरोबर शहरी भागातील गरीब स्त्रियांना देखील होणार आहे .

मोफत शिलाई मशीन योजना नेमकी काय आहे , त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे , योजनेचा उद्देश काय आहे , कोणकोणती कागदपत्रे लागतात , अर्ज कसा करावा , या योजनेचे लाभार्थी कोण असतील , सदर योजना कोणी सुरू केली , सदर योजना कोणकोणत्या राज्यात लागू केली आहे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .

Whatsapp Group Link

मोफत शिलाई मशीन योजना काय आहे ? | Mofat Silai Machine Yojana

मोफत शिलाई मशीन योजना हि केंद्र सरकारची एक योजना आहे . या योजनेच्या माध्यमातून आता सरकार ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे . या योजनेच्या माध्यमातून भारतातील सर्व राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे . प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन भेटणार आहे .

सध्या हि योजना भारतातील काही राज्यांमध्ये लागू केली आहे . यामध्ये महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्र प्रदेश , हरियाणा , गुजरात , तेलंगणा , तामिळनाडू इत्यादी राज्यांचा समावेश होतो . हळूहळू हि योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल . आणि या योजनेचा लाभ देशातील सर्व गरीब महिलांना घेतां येईल .

Mofat silai Machine Yojana

Mofat silai Machine Yojana थोडक्यात माहिती

योजनेचे नावमोफत शिलाई मशीन योजना
योजना कोणी सुरु केलीकेंद्र सरकार
योजना कधीपासून सुरु झालीसन 2019
योजना सुरु करण्याचा उद्देशगरीब महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे .
योजनेचे फायदेमहिलांचा कौशल्य विकास करून त्यांच्या आर्थिक विकासास हातभार लावणे .
लाभार्थीगरीब महिला
अर्ज कसा करायला हवाऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://pmvishwakarma.gov.in/

Free Silai Machine Yojana 2024 उद्दिष्टे

मोफत शिलाई मशीन योजना सुरु करण्याची उद्दिष्टे आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील :

1 ) गरीब घरातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे .

2 ) गरीब महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे .

3 ) महिलांच्या आत्मविश्वासात वाढ करणे .

4 ) महिलांच्या कौशल्य विकासात वाढ करणे .

5 ) महिलांना त्याच्या स्वताच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे .

6 ) महिलांना आत्मनिर्भर बनवणे .

7 ) महिलांना कुटुंब सांभाळण्यास सक्षम बनवणे .

8 ) भारत देशातील प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल .

9 ) सदर योजनेचा लाभ घेऊन महिला घरीच बसून पैसे कामु शकतात .

Silai Machine Yojana Maharashtra वैशिष्टे

मोफत शिलाई मशीनचे वैशिष्टे आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील :

1 ) मोफत शिलाई मशीन योजना केंद्र सरकार द्वारा सुरु करण्यात आली आहे .

2 ) या योजने अंतर्गत गरीब , होतकरू महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे .

3 ) या योजनेचा लाभ ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना घेता येईल .

4 ) सदर योजना आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीस हातभार लावेल .

5 ) महिलांचा कौशल्य विकास होण्यास मदत होईल .

6 ) महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल .

7 ) महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल .

8 ) महिलांना घरात बसून रोजगार उपलब्ध होईल .

9 ) महिला साबलीकारानास हातभार लागेल .

Silai Machine Yojana Maharashtra
Silai Machine Yojana Maharashtra

Mofat silai Machine Yojana पात्रता

Mofat silai Machine Yojana अंतर्गत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विशिष्ट पात्रता धारक असावा . या योजनेसाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे .

1 ) या योजनेसाठी शहर आणि ग्रामीण भागातील गरीब महिला पात्र असतील .

2 ) सदर योजनेचा लाभ विधवा महिला घेऊ शकतील .

3 ) सदर योजनेचा लाभ अपंग महिला देखील घेऊ शकतील .

4 ) सदर योजनेचा लाभ वय वर्षे 20 ते 40 वयोगटातील महिला घेऊ शकतील .

5 ) अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख पेक्षा जास्त नसावे .

6 ) परिवारातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी .

Free Silai Machine Yojana Online Registration

1 ) Mofat silai Machine Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करून घ्यायचा आहे . नोंदणी करण्यासाठी खालील पायऱ्याचा वापर करा :

2 ) सर्वात प्रथम https://pmvishwakarma.gov.in/ या वेबसाईटवर लॉगिन करून घ्या .

3 ) आता तुमच्या समोर वेबसाईटचे होमपेज ओपन होईल .

4 ) आता इथे मोफत सिलाई मशीनचा अर्ज डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल .

5 ) या पर्यायावर क्लिक करून अर्जाची pdf डाउनलोड करून घ्या .

6 ) आता सदर अर्जाची प्रिंट काढून घ्या .

7 ) प्रिंट काढल्यानंतर अर्ज पूर्ण भरून घ्या .

8 ) अर्ज भरल्यानंतर त्या अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे ( झेरोक्स ) जोडून घ्या .

9 ) आता हा अर्ज आपल्या जवळच्या तालुका पंचायत समितीमध्ये सादर करा .

10 ) अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसांनी अर्जाची छाननी केल्यावर अर्ज मंजूर होईल .

11 ) अर्ज मंजूर झाल्यावर काही दिवसांनी अर्जदार महिलेला शिलाई मशीन दिली जाईल .

Free Silai Machine Yojana Online Registration
Free Silai Machine Yojana Online Registration

Mofat silai Machine Yojana Training and Certificate

Mofat silai Machine Yojana अंतर्गत ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे . अशा महिलांना शिलाई मशीन शासनातर्फे देण्यात येते . त्याचप्रमाणे या योजने अंतर्गत शिलाई मशीनचे ट्रेनिंग दिले जाते . यासाठी जवळच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये जावे लागते . हे सर्व ट्रेनिंग एकदम मोफत दिले जाते . यासोबतच हे ट्रेनिंग पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील दिले जाते .

Silai Machine Yojana कोणकोणत्या राज्यात सुरु केली आहे ?

सदर योजना सुरुवातीच्या टप्प्यात 10 राज्यांमध्ये सुरु केली आहे . प्रत्येक राज्यात 50,000 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल . सादर योजना ज्या राज्यात लागू केली आहे ती राज्ये पुढीलप्रमाणे आहेत :

1 ) महाराष्ट्र

2 ) तामिळनाडू

3 ) बिहार

4 ) मध्यप्रदेश

5 ) छत्तीसगड

6 ) राजस्थान

7 ) कर्नाटक

8 ) उत्तर प्रदेश

9 ) गुजरात

10 ) हरियाणा

Free Silai Machine Yojana Feedback

Mofat silai Machine Yojana चा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी अर्ज केला आहे अशा महिलांना जर त्यांचा फीडबॅक द्यायचा असेल तर असे लाभार्थी त्यांचा फीडबॅक देऊ शकतात . या फीडबॅक मधून लाभार्थी महिला त्यांना शिलाई मशीन चांगली आहे कि नाही याविषयी मत मांडू शकतात . त्याचप्रमाणे सदर योजना कशी आहे याविषयी मत मांडू शकता .

सदर योजने विषयी फीडबॅक आपण खालील पायऱ्या वापरून देऊ शकतो :

1 ) सर्वात प्रथम Mofat silai Machine Yojana च्या अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करा .

2 ) सदर वेबसाईट वर लॉगिन केल्यावर आता तुमच्या समोर होमपेज असेल .

3 ) होमपेजला तुम्हाला ‘ Give Feedback ‘ चा Option मिळेल . यावर Click करा .

4 ) या Option वर क्लिक केल्यावर आता तुम्ही एका नवीन पेजवर याल .

5 ) आता या पेज वर विचारलेली सर्व माहिती तुम्ही भरायची आहे .

6 ) सर्वात शेवटी तुम्ही ‘ Submit ‘ या बटनावर क्लिक करायचे आहे .

7 ) आता तुमच्या Feedback ची नोंद झाली आहे .

अधिकृत वेबसाईट

https://pmvishwakarma.gov.in/

निष्कर्ष

Mofat silai Machine Yojana हि महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे . कारण या योजनेच्या माध्यमातून कामगार आणि कष्टकरी महिला यांच्या आयुष्यात खूप बदल घडून येतील . शिलाई मशीन मिळाल्यावर महिला त्यांच्या स्वताच्या पायावर उभ्या राहतील .आणि त्या माध्यमातून त्या त्यांच्या कुटुंबाचा उदार निर्वाह करू शकतील . महिलांचा आत्मविश्वास वाढेल . महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील . सदर योजना महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे .

Whatsapp Group Link

FAQ – Silai Machine Yojana

फ्री शिलाई मशीन योजना काय आहे ?

Mofat silai Machine Yojana हि केंद्र सरकार द्वारा गरीब आणि कष्टकरी महिलांसाठी चालू लेलेली एक योजना आहे. या योजने अंतर्गत गरीब आणि कष्टकरी महिलांना शिलाई मशीन मोफत दिली जाते .

मोफत शिलाई मशीन योजना कधी सुरु झाली ?

मोफत शिलाई मशीन योजना सन 2019 साली सुरु झाली .

मोफत शिलाई मशीन योजना कोणी सुरु केली ?

मोफत शिलाई मशीन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली .

मोफत शिलाई मशीन योजना कोणकोणत्या राज्यात सुरु केली आहे ?

सुरुवातीच्या टप्प्यात हि योजना 10 राज्यात सुरु केली आहे . यामध्ये महाराष्ट्र , गुजरात , हरियाणा , तामिळनाडू , उत्तर प्रदेश , बिहार , मध्य प्रदेश , कर्नाटक , राजस्थान , छत्तीसगड या राज्यांचा समावेश होतो .

मोफत शिलाई मशीन योजनेची पात्रता काय आहे ?

शिलाई मशीन योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असून गरीब आणि कष्टकरी महिला असावी. तिच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी येणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000 पेक्षा जास्त नसावे .

शिलाई मशीन योजनेचा उद्देश काय आहे ?

Mofat silai Machine Yojana अंतर्गत गरीब आणि होतकरू महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे .

अन्य महत्वाच्या योजना

पीएम सुर्य घर योजना

किशोरी शक्ती योजना

बेरोजगारी भत्ता योजना

Leave a Comment