Kishori Shakti Yojana : नमस्कार मंडळी , आजच्या लेखात आपण Kishori Shakti Yojana याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत . आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळ जवळ 76 वर्षांचा काल उलटला . स्वातंत्र्याच्या अगोदर महिलांची परिस्थिती खूप बिकट होती पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर यावर मात करण्यासाठी बरेच उपाय करण्यात आले . केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी यावर अनेक योजना आणल्या ज्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करता यावे .
आज आपणास बर्याच महिला मोठमोठ्या पदावर काम करताना दिसतात . महिला डॉक्टर , शिक्षक , वकील , इंजिनीअर , कंपनीचे CEO अशा विविध पदांवर कार्यरत असलेल्या आपणास दिसून येतात . बऱ्याच महिला स्वतःचा व्यवसाय काढतात . महिला अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे करताना आपणास दिसून येतात . या स्त्रिया स्वत:चे कुटुंब स्वतः धाडसाने सांभाळतात . पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करतात .
एवढ सगळं असताना सुद्धा दुसरी बाजू म्हणजे आजही स्त्रियांना गरिबीमुळे तसेच अनेक सामाजिक कारणामुळे शिक्षण घेता येत नाही , त्यांना त्यांचे शिक्षण मधेच सोडावे लागते , गरिबीमुळे मुलींची लवकर लग्न करावी लागतात , बऱ्याच मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही इत्यादी अशा विविध समस्यांना मुलींना तोंड द्यावे लागते .
वरील सर्व मुलींच्या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने किशोरी शक्ती योजना सुरु केली आहे . सदर योजने अंतर्गत मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे . किशोरी शक्ती योजना काय आहे , त्याची पात्रता काय आहे , त्याचे फायदे काय आहेत , यासाठी अर्ज कसा करायचा , सादर योजना कोणी सुरु केली इत्यादी सर्व माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत .तरी हा लेख शेवट पर्यंत वाचावा हि वाचकांना विनंती .
किशोरी शक्ती योजना काय आहे ? | kishori shakti yojana definition
किशोरी शक्ती योजनेच्या अंतर्गत किशोर वयीन मुलींना त्यांच्या क्षमते पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जातो . तसेच किशोर वयीन मुलींचे जीवन सुधारण्याचा तसेच त्यांच्या सर्वांगीण वाढीचा सर्वसमावेशक कार्यक्रम राबवला जातो . किशोर वयीन मुलींना त्यां स्वावलंबी होण्यासाठी विविध साधनांची पूर्तता करणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे .
केंद्र सरकार द्वारा राबवली जाणारी योजाना ज्याचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा या केंद्र सरकार द्वारा राबवली जाणारी योजनेची पुनर्रचना आहे . Kishori Shakti Yojana या योजनेला केंद्र सरकारचा पाठींबा आहे . सदर योजनेने पूर्वीची योजना खूप विस्तृत केली आहे .
आपण आजही बघतो कि घरातील गरीब परिस्थितीमुळे बऱ्याच मुलींना शिक्षण घेता येत नाही . गरिब परिस्थिती असल्यामुळे आई आणि वडील दोन्ही काम करण्यासाठी घराच्या बाहेर जातात आणि त्यामुळे संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी हि घरात असलेल्या मुलीवर येऊन पडते . त्यामुळे मुली बाहेर जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत .त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते .
अशा मुली ज्या शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्या आहेत अशा मुलींना म्हणजेच वय वर्षे 11 ते 18 वयोगटातील मुलींना त्यांच्या हक्काची माहिती मिळावी , अशा मुलींनी निरोगी राहावे तसेच त्यांच्या स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी सदर योजना किशोर वयीन मुलींना पाठींबा देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे .
Kishori Shakti Yojana योजने अंतर्गत 11 ते 18 वयोगटातील मुलींना जवळच्या अंगणवाडी केंद्रात प्रशिक्षण दिले जाते . या प्रशिक्षणामध्ये मुलींना बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात . यामध्ये मुलींना स्वतःचे आरोग्य विषयक ज्ञान ,चौरस आहार घेणे , घराचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी प्रशिक्षण , किशोरवयीन मुलींची वैयक्तिक स्वच्छता , मासिक पाळीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी इत्यादी गोष्टींचे किशोरवयीन मुलींना शिक्षण दिले जाते .
Kishori Shakti Yojana Overview
योजनेचे नांव | किशोरी शक्ती योजना |
योजना सुरु कधी झाली | 8 मार्च 2015 |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे | महिला व बालविकास मंत्रालय |
योजना सुरु करण्याचा उद्देश | किशोर वयातील मुलींचा संपूर्ण विकास करणे . |
लाभार्थी कोण | महाराष्ट्रातील 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोवायीन मुली . |
लाभ काय मिळेल | किशोर वयीन मुलींचा सर्वांगीण विकास . |
किशोरी शक्ती योजनेचे उद्दिष्ट | kishori shakti yojana objectives
किशोरी शक्ती योजना सुरु करण्याचे काही उद्दिष्टे आहेत . ते पुढीलप्रमाणे :
1 ) महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील वय वर्षे 11 ते 18 वर्षाखालील मुली ज्यांनी शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण सोडले आहे अशा मुलींना स्वतःचे आरोग्य , निरोगी अन्न खाणे , घराचे व्यवस्थापन करणे , वैयक्तिक स्वच्छता घेणे , मासिक पाळीत काळाजी घेणे इत्यादी बाबतचे प्रशिक्षण जवळच्या अंगणवाडीत देणे .
2 ) किशोर वयीन मुलींचा शारीरिक , सामाजिक आणि मानसिक विकास करणे .
3 ) किशोर वयीन मुलींची निर्णय क्षमता सुधारवणे .
4 ) 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान सकस आणि पौष्टिक आहार देणे .
5 ) किशोर वयीन मुलींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूक करणे .
6 ) किशोवायीन मुलींचा सर्वांगीण विकास करणे .
किशोरी शक्ती योजनेतील काही महत्वाचे मुद्दे
1 ) सदर योजना महाराष्ट्रातील काही जिल्यांमध्ये लागू केली आहे . यामध्ये वाशीम , वर्धा ,अकोला , अहमदनगर , ठाणे , सोलापूर , भंडारा , औरंगाबाद , सिंधुदुर्ग , सांगली , धुळे , चंद्रपूर , सांगली , रत्नागिरी , जालना , जळगाव , हिंगोली , रायगड , पुणे , परभणी , लातूर , उस्मानाबाद , नंदुरबार या राज्यांचा समावेश होतो .
2 ) राज्य सरकार आता दरवर्षी Kishori Shakti Yojana अंतर्गत 3.8 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे .
3 ) ज्या किशोरवयीन मुलींनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे अशा मुलींच्या आरोग्याचे मूल्यमापन दर 3 महिन्यांनी अंगणवाडी मध्ये केले जाईल . आणि अशा मुलींना आरोग्या कार्ड दिले जाईल . या आरोग्य कार्ड मध्ये मुलीच्या आरोग्य विषयक बाबींची नोंद केलेली असेल . जसे कि – मुलीचे वजन , उंची , BMI यासंदर्भात माहिती असेल .
4 ) Kishori Shakti Yojana संपूर्णपणे अंगणवाडी सुविधांवर आधारिक चालवली जाईल . आणि त्यावर लक्ष आणि देखरेख महिला व बालविकास विभाग विभाग करेल .
5 ) सादर योजनेचा मुख्य उद्देश किशोर वयीन मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भक्कम बनवणे हा असेल .
Kishori shakti yojana ची वैशिष्टे | Kishori Shakti Yojana Benefits
किशोरी शक्ती योजनेची वैशिष्टे पुढीलप्रमाणे सांगता येतील :
1 ) किशोरी शक्ती योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुली ज्यांनी शाळा किंवां महाविद्यालयीन शिक्षण सोडले आहे अशा मुली सदर योजनेच्या लाभार्थी आहेत .
2 ) सदर योजने अंतर्गत किशोरवयीन मुलींना शिक्षण , आरोग्य आणि स्वच्छता याबाबत जागरूक करून त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाईल .
3 ) Kishori Shakti Yojana अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मधील 18 मुलींची निवड केली जाते आणि त्यांना विभागीय कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांच्या देखरेखीमध्ये प्रशिक्षण दिले जाते .
4 ) सदर योजने अंतर्गत ज्या मुलींनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा मुलींना राज्य सरकार कडून दर वर्षी 1 लाख रुपये मिळणार आहेत .
5 ) या योजने अंतर्गत किशोर वयीन मुलींना एका वर्षातील किमान 300 दिवस 18 ते 20 ग्रॅम प्रथिने तसेच इतर विविध पोषक तत्त्वे अशी एकूण 600 कैलरीज दिले जातील . त्यामुळे मुलींची शारीरिक वाढ चांगली होण्यास मदत होईल .
6 ) किशोर वयीन मुलींना या योजने अंतर्गत औपचारिक तसेच अनौपचारिक शिक्षण दिले जाते .
7 ) किशोर वयीन मुलींचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवण्यासाठी कौशल्ये शिकवली जातील .
8 ) सदर योजने अंतर्गत किशोर वयीन मुलींना ज्यांनी शाळा किंवा महाविद्यालय सोडले आहे अशा मुलींना उद्योग किंवा स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे .
किशोरी शक्ती योजनेची पात्रता
1 ) अर्ज करणारी मुलगी हि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी .
2 ) अर्जदार किशोरवयीन मुलीचे वय 11 ते 18 वर्षे च्या दरम्यान असावे .
3 ) अर्जदार किशोरवयीन मुलीने शाळा सोडलेली असावी .
4 ) Kishori Shakti Yojana अंतर्गत ज्या किशोरवयीन मुली वय वर्षे 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुली महाराष्ट्र सरकार मार्फत दिल्या जाणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणासाठी पात्र राहतील .
5 ) सदर योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील किशोर वयीन मुली ज्यांच्या जवळ BPL कार्ड आहे अशा मुली सदर योजनेसाठी पात्र आहेत .
Kishori Shakti Yojana : आवश्यक असणारी कागदपत्रे
Kishori Shakti Yojana चा अर्ज भरताना काही कागदपत्रे आवश्यक असतात . ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत :
1 ) अर्जदाराचा जन्माचा दाखला .
2 ) अर्जदाराचे आधार कार्ड .
3 ) अर्जदाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र .
4 ) अर्जदाराचे BPL रेशन कार्ड .
5 ) अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला.
6 ) अर्जदाराचे लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र .
7 ) अर्जदाराचा रहिवासी दाखला .
किशोरी शक्ती योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
kishori shakti yojana चा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका पात्र किशोरवयीन मुलीच्या वतीने अर्ज करतात . यासाठी खालील प्रक्रियांचा वापर केला जातो .
1 ) अंगणवाडी कर्मचारी आपल्या भागातील सर्व घरांचे सर्वेक्षण करतात . आणि या माध्यमातून आपल्या भागातील शालाबाह्य किशोर वयीन मुलींची ओळख होते .
2 ) अंगणवाडी कर्मचाऱ्याना सर्वेक्षणातून ज्या मुलींची नावे मिळतात ती नावे महिला व बालविकास विभागाकडे पाठवली जातात .
3 ) यानंतर ज्या मुलींची निवड महिला व बालविकास विभागामार्फत केली जाते त्या मुलींची तपासणी केली जाते . आणि नंतर ज्या मुलींना पात्र समजले जाते त्या मुलींना विभागाच्या अंतर्गत नोंदणीकृत करून घेतले जाते .
4 ) ज्या मुलींना या योजने अंतर्गत नोंदणीकृत करून घेतले आहे अशा मुलींना किशोरी कार्ड दिले जाते .
5 ) ज्या मुलींना किशोरी कार्ड मिळाले आहे अशा मुली आता या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
किशोरी शक्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
किशोरी शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतो . ऑनलाईन अर्जप्रक्रिया खालीलप्रमाणे :
1 ) Kishori Shakti Yojana साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला लॉगिन करा . ( वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे .)
2 ) अधिकृत वेबसाईटला लॉगिन केल्यावर आता या योजनेसाठी असलेला अर्ज भरायचा आहे .
3 ) अर्ज भरल्यावर आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत जोडा .
4 ) सर्वात शेवटी अर्ज सबमिट करा.
ऑनलाईन अर्ज | अधिकृत वेबसाईट |