Gopinath Munde Shetkari Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत शेतकर्‍याचा नैसर्गिक अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर मिळेल रुपये 2 लाखांपर्यंत मदत…!!!

Gopinath Munde Shetkari Vima Yojana : भारतात शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे . आपल्या भारताची अर्थव्यवस्था जवळ जवळ 70 % शेतीवर अवलंबून आहे . शेती बऱ्याच अंशी पावसावर अवलंबून आहे . त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पादनही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे .

शेतकरी दिवसभर शेतीमध्ये राबतो . आणि त्यातून आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रयत्न करतो . शेतीमध्ये नांगरणी , पेरणी , कोळपणी , शेतीला पाणी देणे , खुरपणी करणे अशा विविध पद्धतीचे काम शेतकर्‍याला शेतीमध्ये करावे लागते . तेव्हा कुठे शेतकर्‍याला शेतीतून उत्पन्न मिळत असते . परंतु प्रत्येक वेळेस शेतकर्‍याला शेतीतून फायदा होईल असे नाही .

शेतीमध्ये बऱ्याच वेळा दुष्काळ परिस्थिती , पाऊस न पडणे , भांडवलाची कमतरता इत्यादी कारणांमुळे शेतकर्‍याला शेतीतून समाधान कारक उत्पन्न घेणे शक्य होत नाही . त्यामुळे शेतकर्‍याला त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करणे शक्य होत नाही . त्याला कर्ज काढावे लागते आणि आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात .

शेतीतील कामे करत असताना बऱ्याच वेळा शेतकर्‍याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते . सर्पदंश , विंचूदंश , वीज पडणे , खून होणे , पाण्यात बुडून मृत्यू होणे इत्यादी कारणांमुळे शेतकर्‍याला जीवाला मुकावे लागते . परंतु त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो . शेतकर्‍याचे कुटुंब उघड्यावर पडते . कुटुंबीयांची काळजी करणारे कुणीही नसते .

शेतकऱ्याची हीच परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Gopinath Munde Shetkari Vima Yojana सुरू केली आहे . आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत केली जाते . ही Gopinath Munde Shetkari Vima Yojana काय आहे ? , या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ? पात्रता काय आहेत ? अर्ज कसा करावा ? इत्यादी सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत .

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे ?

Gopinath Munde Shetkari Vima Yojana ही महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजने अंतर्गत एखाद्या शेतकर्‍याचा अपघात झाला असेल तर अशा शेतकर्‍याला महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करणार आहे . शेतकर्‍याला दिली जाणारी आर्थिक मदत ही रुपये 2 लाखांपर्यंत असेल . शेतकर्‍याचा अपघात झाला असेल तर 30 दिवसांच्या आत आपल्या तालुक्यातील कृषी अधिकार्‍यांकडे अर्ज करावा लागेल . आणि शेतकर्‍याचा अपघात ज्या श्रेणीमध्ये असेल त्याप्रमाणे त्या शेतकर्‍याला पैशांच्या स्वरुपात या योजनेचा मोबदला दिला जातो .

गोपीनाथ मुंडे अपघात विमा माहिती

योजनेचे नांव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
योजना कधी सुरु झाली ?डिसेंबर 2019
योजना कोणी सुरु केली ? महाराष्ट्र सरकार
योजनेचा उद्देश अपघात झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
लाभ 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना उद्दिष्टे

Gopinath Munde Shetkari Vima Yojana सुरू करण्यामागे अनेक उद्देश आहेत . ते उद्देश पुढील प्रमाणे :

1 ) आर्थिक मदत

‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजने अंतर्गत अपघात किंवा मृत्यू झालेल्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे .

2 ) शेतकर्‍याच्या सुरक्षेविषयी जागरूकता वाढवणे

शेतकऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेविषयी जागरूक असले पाहिजे . त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे .

3 ) शेतकर्‍याचा विकास

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देऊन शेतकर्‍याचा विकास साध्या करणे हा या योजनेचा उद्देश आहे .

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे फायदे

Gopinath Munde Shetkari Vima Yojana ही योजना सुरू करण्यामुळे शेतकर्‍यांना अनेक फायदे होणार आहेत . ते फायदे पुढील प्रमाणे :

1 ) कुटुंबाला आर्थिक मदत होते .

2 ) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढते .

3 ) शेतकऱ्यांच्या रहाणीमानाचा दर्जा सुधारतो .

4 ) आर्थिक संरक्षण दिल्यामुळे कठीण काळात शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत होते .

5 ) शेतकर्‍याच्या कुटुंबाला जगण्यासाठी आधार या योजनेमुळे होतो .

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पात्रता

Gopinath Munde Shetkari Vima Yojana या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकर्‍याने काही पात्रता धारण करणे आवश्यक आहे . ती पात्रता पुढील प्रमाणे :

1 ) ‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकर्याचे वय 10 ते 75 वर्षाच्या दरम्यान असावे .

2 ) अर्जदार शेतकर्‍याची महाराष्ट्रात 7 / 12 उतार्‍यानुसार शेतकरी म्हणून नोंदणी झालेली असावी . म्हणजेच शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे .

3 ) व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे परंतु त्याचे 7/12 वर नांव नाही अशा कुटुंबातील एक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र आहे .

खालील अपघात प्रकार असतील असा शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे

1 ) दंगलीमध्ये शेतकर्‍याचा अपघात किंवा मृत्यू झाला असेल तर असा शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल .

2 ) स्त्री शेतकर्‍याचा बाळंतपणात मृत्यू झाला असेल तर टी स्त्री या योजनेसाठी पात्र असेल .

3 ) एखाद्या शेतकर्‍याचा विंचूदंश किंवा सर्पदंश यामुळे अपघात किंवा मृत्यू झाला असेल तर असा शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल .

4 ) जर एखाद्या शेतकर्‍याचा उंचावरून पडून अपघात झालेला असेल तर असा शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल .

5 ) एखाद्या शेतकऱ्याची नक्षलवाद्याकडून हत्या झाली असेल तर असा शेतकरी या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असेल .

6 ) एखाद्या शेतकऱ्याचा खून झाला असेल तर या योजनेच्या अंतर्गत त्याला लाभ मिळू शकेल .

7 ) रेल्वे किंवा रस्ता अपघात झाला असेल तर तो शेताकारी या योजनेचा लाभ घेऊ शकतो .

8 ) पाण्यात बुडून शेतकर्याचा मृत्यू झाला असेल तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळेल .

9 ) जंतुनाशक हाताळताना जर विषबाधा झाली असेल तर त्या शेतकर्‍याला या योजनेचा लाभ घेता येईल .

10 ) जनावरांच्या चाव्यामुळे किंवा खाल्ल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर असा शेतकरी या योजनेस पात्र असेल .

gopinath munde yojana
Gopinath Munde Yojana

खालील बाबतीत शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरेल

1 ) शेतकर्‍याचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही .

2 ) शेतकर्‍याने जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेतले असेल किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरेल .

3 ) शेतकर्‍याने आमली पदार्थांचे सेवन केलेले असताना जर अपघात झाला असेल तर या ‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजनेचा लाभ शेतकर्‍याला घेता येणार नाही .

4 ) मोटारीची शर्यत , भ्रमिष्टपणा , युद्ध इत्यादी परिस्थिती मध्ये अपघात झाला असेल तर तो शेतकरी ‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असेल .

5 ) कायद्याचे उल्लंघन करताना जर शेतकर्याचा अपघात झाला असेल तर ‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजनेचा लाभ घेता येणार नाही .

6 ) शेतकरी जर सैन्याच्या नोकरीत असेल तर ‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजनेचा लाभ घेता येणार नाही .

7 ) ‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ सुरू होण्यापूर्वी शेतकरी शेतकरी अपंग झाला असेल तर तो शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असेल .

Gopinath Munde Apghat Vima Yojana अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ

शेतकर्याला ‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजनेचा लाभ आर्थिक स्वरूपात दिला जातो . तो पुढील प्रमाणे :

शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख
शेतकर्‍यास अपंगत्व आलेले असल्यास रुपये 1 लाख ते 2 लाख

Gopinath Munde Yojana Document

‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत पुढी कागदपत्रे जोडावी लागतात :

1 ) शेतकऱ्याचा 7/12 उतारा .

2 ) शेतकऱ्याच्या मृत्यूचा दाखला .

3 ) बँक खात्याचे पासबुक .

4 ) शेतकर्‍याचे वारस आहे म्हणून गावाच्या तलाठी कडून घेतलेला गाव नमुना नंबर 6 क यानुसार वारसा नोंदणीचा दाखला .

5 ) शेतकर्‍याचे आधार कार्ड .

6 ) शेतकर्‍याच्या मृत्यूचा पोलीस पाटलाचा अहवाल , मृत्यूची FIR किंवा स्थळाचा पंचनामा .

7 ) वारसदाराचे आधारकार्ड .

Gopinath Munde Apghat Vima Yojana Application Form

Gopinath Munde Shetkari Vima Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकर्‍याच्या अपघात किंवा मृत्यूचा अहवाल अपघात किंवा मृत्यू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आपल्या तालुका कृषी अधिकार्‍याकडे जमा करायचा आहे . यामध्ये साध्या कागदावर अपघात किंवा मृत्यू विषयी सविस्तर माहिती लिहायची आहे . तेसच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज करत आहे असे त्यात नमूद करायचे आहे . सोबत सर्व कागदपत्रे जोडायची आहेत . आणि तो अर्ज जमा करायचा आहे .

यानंतर कृषी अधिकार्यांचा एक पथक चौकशी करण्यासाठी येईल . आणि भेट देऊन चौकशी करेल . यानंतर कृषी अधिकारी याबाबतचा अहवाल 8 दिवसांमध्ये तहसीलदारांना देतील . यानंतर तहसीलदार 30 दिवसांमध्ये शेतकरी कुटुंबाला मदत करण्याच्या बाबतचा निर्णय घेतील .

Gopinath Munde Apghat Vima Yojana Application Form
Gopinath Munde Apghat Vima Yojana Application Form

निष्कर्ष

‘ Gopinath Munde Shetkari Vima Yojana ‘ हि शेतकऱ्यांसाठी एक अमृत योजना आहे . या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे . त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाला संरक्षण मिळते . त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे .

मित्रांनो , आम्ही आशा करतो हा लेख तुम्हाला आवडला असेल . या योजने बाबत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट करून आम्ही तुम्हाला नक्की मदत करू . आणि तुमच्या जवळ असे कुणी गरजू असतील ज्यांना या योजनेची गरज आहे अशा लोकांना हा लेख शेअर करा आणि त्यांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करा . आणि अशीच माहिती रोज मिळवण्यासाठी mahajobyojana.in ला दररोज भेट द्या .

इतर महत्त्वाच्या योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

मोफत शिक्षण योजना

लाडका भाऊ योजना