Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र व्यक्तीला दर महिन्याला मिळतील रुपये 1000 ..!!!

Sanjay Gandhi Niradhar Yojana : आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय इतिहास आहे . पूर्वीपासून महाराष्ट्रातील लोकानी ही परंपरा फार जपली आहे . मुख्यत: ही परंपरा खेड्यांमध्ये जपली जाते . एखादा व्यक्ती खूप गरीब असेल तरी तो या गोष्टी काही ना काही करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो .

पूर्वीपासून राजे महाराजे देखील गरीबांना मदत करायचे . महाराष्ट्र सरकार सुद्धा गरीबांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करत असते . त्यामुळे गरीब जनता सुखावत असते . महाराष्ट्र सरकारने जे लोक निराधार आहेत . ज्यांना कुणी नाही अशा लोकांसाठी बऱ्याच योजना आणल्या आहेत . आणि महाराष्ट्राची जनता या योजनांचा फायदा घेत आहे .

महाराष्ट्र सरकार विधवा , घटस्फोटीत महिला , निराधार महिला , अपंग , अनाथ , गरजू लोक , ट्रान्सजेन्डर , अत्याचारित महिला इत्यादींच्या कल्याणासाठी Sanjay Gandhi Niradhar Yojana सुरू केली . या योजनेसाठी कोण पात्र आहे ? , Sanjay Gandhi Niradhar Yojana काय आहे ? , काय लाभ मिळेल ? इत्यादी सर्व माहिती सविस्तरपणे मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .

संजय गांधी निराधार योजना काय आहे ?

महाराष्ट्र हे राज्य प्रगत राज्यांमध्ये जरी मोडत असेल तरी अजूनही बरेच लोक महाराष्ट्रात निराधार आहेत ज्यांना कुणाचाही जगण्यासाठी सहारा नाही . अशा लोकांना आपल्या रोजच्या गरजाही पूर्ण करता येत नाहीत . अशा लोकांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने 1995 साली ‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ सुरू केली .

या योजनेच्या माध्यमातून विधवा , घटस्फोटीत महिला , अनाथ , अपंग , निराधार महिला , ट्रान्सजेन्डर , गरजू लोक यांना दर महिना 1000 एवढी रक्कम मिळते . एकाच कुटुंबात अशा 2 व्यक्ती असतील तर अशा कुटुंबाला रुपये 1200 एवढी रक्कम दर महिन्याला दिली जाते . यातून टी व्यक्ती तिच्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकते .

संजय गांधी निराधार योजना माहिती

योजनेचे नांव संजय गांधी निराधार योजना
योजना कधी सुरू झाली ? सन 1995
योजना कोणी सुरू केली ?महाराष्ट्र शासन
योजनेचे लाभार्थी कोण ?महाराष्ट्रातील अपंग , निराधार , विधवा , घटस्फोटीत महिला , अनाथ , ट्रान्सजेन्डर , गरजू लोक इत्यादी .
काय लाभ मिळेल ?महिना 1000 रुपये पेन्शन .
अर्जप्रक्रिया ऑनलाईन

Sanjay Gandhi Niradhar Yojana उद्दिष्टे

महाराष्ट्र सरकारने Sanjay Gandhi Niradhar Yojana सुरू करण्याच्या मागे काही उद्दिष्टे आहेत . ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे :

1 ) स्वावलंबन

निराधार असणार्‍या व्यक्तीला स्वावलंबनाने जगण्यासाठी ही योजना लाभार्थ्यांना मदत करते .या योजने अंतर्गत दर महिन्याला काही रक्कम मिळत असल्यामुळे अर्जदार व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतात .

2 ) निराधारांचा उदरनिर्वाह

Sanjay Gandhi Niradhar Yojana ही निराधार लोकांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे .यामुळे निराधार लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात . आणि त्यांचा उदरनिर्वाह चालतो .

3 ) जीवनाची नवी अशा

निराधार असलेल्या लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवता येत असल्याने त्यांना त्यांच्या जीवनाची एक नवी दिशा मिळते . जीवन जगणे त्यांना सोपे वाटायला लागते .

4 ) मूलभूत गोष्टींची पूर्तता

Sanjay Gandhi Niradhar Yojana या योजने अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभातून लाभार्थ्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता हा या योजनेचा एक उद्देश आहे .

5 ) सर्वांगीण विकास

‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेच्या माध्यमातून निराधार लोकांचा आर्थिक , सामाजिक विकास करणे हा उद्देश हि योजना सुरु करण्याच्या मागे आहे . आणि यातूनच पुढे त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा उद्देश आहे .

6 ) निराधारांना आर्थिक मदत

Sanjay Gandhi Niradhar Yojana ही निराधारांना आर्थिक मदत करणारी योजना आहे . त्यामुळे अपंग , अनाथ मुले , विधवा , घटस्फोटीत , ट्रान्सजेन्डर , असाध्य आजाराने ग्रासलेले लोक इत्यादि साठी ही योजना एक वरदान आहे . कारण या योजने अंतर्गत या लोकांना आर्थिक मदत केली जाईल . ज्याने त्यांना आपले आयुष्य जगणे सोपे होईल .

Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana फायदे

Sanjay Gandhi Niradhar Yojana महाराष्ट्र शासनाने निराधार लोकांची मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे . या योजनेचे अनेक फायदे आहेत . ते फायदे पुढील प्रमाणे :

1 ) मासिक 1000 रुपये स्टायपेंड

महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेचा लाभ निराधार लोकांना घेता येईल . अशा लोकांना मासिक रुपये 1000 एवढा आर्थिक लाभ घेता येणार आहे .

2 ) महिलांना 1200 रुपये स्टायपेंड

‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या आयोजने अंतर्गत महिलांना रुपये 1200 पर्यंत दरमहा स्टायपेंड दिला जाईल .

3 ) एकाच कुटुंबातील 2 लोकांना 1200 रुपये स्टायपेंड

जर एकाच कुटुंबात जर 2 पात्र व्यक्ती असतील तर अशा कुटुंबात रुपये 1200 चा दरमहा लाभ घेता येईल .

4 ) असाध्य आजाराने ग्रस्त लोकांना आर्थिक लाभ

जे लोक एड्‍स , कॅन्सर ,टीबी इत्यादी सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत . अशा लोकांना ही योजना एक वरदान आहे . अशा लोकांना या योजने अंतर्गत लाभ मिळेल .

Sanjay Gandhi Niradhar Yojana Eligibility

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही पात्रता धारण करणे आवश्यक आहे . या पात्रता पुढील प्रमाणे :

1 ) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा .

2 ) ‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेचा लाभ अपंग व्यक्ती देखील घेऊ शकतात .

3 ) अनाथ मुले या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत .

4 ) घटस्फोटात महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत .

5 ) विधवा महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत .

6 ) गरजू लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

7 ) ट्रान्सजेन्डर व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत .

8 ) निराधार महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत .

9 ) गंभीर आजाराने ग्रस्त नागरिक जसे कि एड्‍स , कॅन्सर ,टीबी इत्यादी गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

10 ) 65 वय वर्षाच्या आतील कोणतीही निराधार व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते .

How To Apply Online For Sanjay Gandhi Niradhar Yojana
How To Apply Online For Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

महाराष्ट्र शासनाने राबवलेली ‘Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते . त्यासाठी खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे :

1 ) अर्जदाराचे आधारकार्ड

2 ) अर्जदाराचे पॅनकार्ड

3 ) अर्जदाराचा जातीचा दाखला

4 ) अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला

5 ) अर्जदाराचे मतदान कार्ड

6 ) अर्जदाराचा पत्त्याचा पुरावा

7 ) अर्जदाराचे अपंगत्व प्रमाणपत्र

8 ) अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो

9 ) अर्जदाराचा मोबाईल नंबर

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

How To Apply Online For Sanjay Gandhi Niradhar Yojana

‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेसाठी अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात . खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करून अर्जदार अर्ज करू शकतात :

1 ) सर्वात प्रथम अर्जदाराने या योजनेच्या संजय गांधी निराधार योजना ऑफिसियल वेबसाइट वर लॉगिन करावे .

2 ) या वेबसाईटवर लॉगिन केल्यावर आता तुम्ही होमपेजवर याल .

3 ) होमपेजवर आल्यावर ‘ New User ? Register Here ‘ या बटणावर क्लिक करा .

4 ) आता तुम्ही इथे 2 पर्याय असलेल्या पेजवर पोचाल . इथे ‘ option 2 ‘ निवडा .

5 ) दुसरा option निवडल्यावर आता तिथेच खाली तुमचा अर्ज Open होईल .

6 ) आता तुमची पूर्ण माहिती या अर्जात भरा .

7 ) नंतर तुमची आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा .

8 ) सर्वात शेवटी तुमचा अर्ज सबमिट करा .

9 ) अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता .

संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

 ‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ऑफलाईन अर्ज देखील करू शकतात . त्यासाठी तुम्ही खालील पायऱ्याचा वापर करून अर्ज करू शकता :

1 ) सर्वात प्रथम आपल्या जवळील CSC केंद्रात ( महा इ सेवा केंद्र ) जा .

2 ) इथे तुम्ही त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज मागा .

3 ) आता संपूर्ण आज भरा आणि त्याच्या सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा .

4 ) आता तो अर्ज तेथे जमा करा .

5 ) तुमचा अर्ज क्रमांक जपून ठेवा . यामुळे तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहता येईल .

संजय गांधी निराधार योजनेच्या अर्जाचा स्टेटस कसा चेक करावा ?

‘ Sanjay Gandhi Niradhar Yojana ‘ या योजनेचा तुम्ही अर्ज भरला असेल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीने चेक करू शकता .

1 ) सर्वात प्रथम Sanjay Gandhi Niradhar Yojana Official Website ला लॉगिन करा .

2 ) लॉगिन केल्यावर तुम्ही आता होमपेजवर याल .

3 ) आता इथे तुम्हाला ‘ Track Your Application ‘ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .

4 ) आता तुम्ही एका नवीन पेजवर याल . इथे तुमचा Application number टाका आणि Go या बटणावर क्लिक करा .

5 ) अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्जाचा स्टेटस चेक करू शकता .

निष्कर्ष

Sanjay Gandhi Niradhar Yojana ही निराधारांना मिळालेले एक जगण्याचे नवीन स्वप्न आहे . या माध्यमातून निराधार लोकांना मासिक आर्थिक मदत महाराष्ट्र शासन करते . आणि त्यामुळे निराधारांच्या जीवनात नवीन संजीवनी येते . आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची आशा उत्पन्न होते . त्यांचे जीवन आनंदाने फुलून जाते . या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील गरजूंनी घेऊन आपल्या आयुष्याला नव संजीवनी द्यावी ही आशा आहे .

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या गरजू मित्र – मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा . आणि त्यांना त्याच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात करण्यासाठी मदत करा . आणि या लेखाविषयी तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा .

इतर महत्त्वाच्या योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

Leave a Comment