Berojgari Bhatta Yojana | Berojgari Bhatta Yojana Maharashtra In Marathi – महाराष्ट्र सरकार बेरोजगार तरुणांना देणार महिना 5000 रुपये ; असा करा अर्ज..!!

Berojgari Bhatta Yojana : नमस्कार मंडळी , आजच्या लेखात आपण महाराष्ट्र सरकारने राबवलेली Berojgari Bhatta Yojana विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत . आज आपण पाहतो कि महागाई हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे . पण माणसाचा पगार काही त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही . याही पुढे जाऊन आपण पाहतो कि काही लोकांकडे तर रोजगार सुद्धा नसतो . त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो .

आयुष्य हे पुढे जातच असते पण ते व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसा पैसा नसतो . किंवा आयुष्य किमान जगता तरी यावे यासाठी तरी पैशाची खूप गरज असते .परंतु तेही बऱ्याच लोकांना ते पैशाच्या अभावी जगता येत नाही . यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात . जसे कि शिक्षण कमी असणे , कोणतेही कौशल्य हाती नसणे , पैसे नसणे इत्यादी .

परंतु याही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर अजूनही काही असे लोक आहेत कि ज्यांचे शिक्षण चांगले झालेले असते परंतु ते बेरोजगार असतात . त्यांच्या हाती कोणतेही काम नसते .आणि अशा लोकांना आपले जीवन जगणे कठीण होते . खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना कोणताही रोजगार मिळत नाही .

महाराष्ट्र शासनाने याच सर्व गोष्टींचा विचार करून Berojgari Bhatta Yojana सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे . या योजने अंतर्गत आता महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारी भत्ता मिळणार आहे . सदर योजना कुणी सुरु केली , या योजनेची वैशिष्टे काय आहेत , पात्रता काय आहे , अर्ज कसा केला पाहिजे , कोणकोणते लाभ मिळतील या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी हा लेका शेवटपर्यंत वाचा .

Whatsapp Group Link

Table of Contents

Pradhan Mantri Berojgari Bhatta Yojana Maharashtra

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र काय आहे ?

Berojgari Bhatta Yojana महाराष्ट्र अंतर्गत आता महाराष्ट्रातील जे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत . अशा तरुणांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला रुपये 5000 त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे . आणि त्यामुळे अशा तरुणांना त्यांच्या कुटुंबाला संभाळणे आणि त्यांचे पालन पोषण करणे शक्य होणार आहे.

परंतु यासाठी महाराष्ट्र सरकारने यासाठी काही निकष ठरवलेले आहेत . महाराष्ट्रातील जो तरुण या निकषात बसेल तो तरुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल . आणि अशा तरुणाला महाराष्ट्र सरकार तर्फे आर्थिक मदत मिळेल . त्याचबरोबर तरुणांना नोकरी शोधणे पण सोपे होईल .

Pradhan Mantri Berojgari Bhatta Yojana

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र थोडक्यात माहिती

योजनेचे संपूर्ण नांव महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता
योजना कधी सुरु झाली सन 2023
योजना कोणी सुरु केली महाराष्ट्र सरकार
कोणत्या विभागामार्फत सुरु केली कौशल्य विकास ,रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
योजनेचा उद्देश काय आहे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे .
लाभार्थी कोण असेल महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण
अधिकृत वेबसाईट rojgar.mahaswayam.in

लोक हेही वाचतात – केंद्र सरकारच्या विविध योजना

Pm Berojgari Bhatta Yojana

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा उद्देश

1 ) महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी कमी करणे .

2 ) ज्या तरुणांना नोकरी मिळत नाही अशा तरुणांना नोकरी मिळेपर्यंत आर्थिक सहाय्य करणे .

3 ) महाराष्ट्रातील तरुणांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे .

4 ) बेरोजगारीच्या दरीत लोटलेल्या तरुणांचा कौशल्य विकास करणे . आणि रोजगार निर्मितीला चालना देणे .

5 ) तरुणांच्या रोजच्या किमान गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे .

6 ) बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करून मदत करणे ज्याने करून त्यांना व्यसनापासून दूर ठेवता येईल .

7 ) महाराष्ट्रामध्ये बेकारीची जी समस्या वाढत चालली आहे त्यापासून मुक्ती मिळवणे .

Berojgari Bhatta Yojana
Berojgari Bhatta Yojana

Berojgari Bhatta Yojana Maharashtra

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची वैशिष्टे / फायदे

1 ) Berojgari Bhatta Yojana महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगारीचा टक्का कमी करणे .

2 ) महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भर बनवणे .

3 ) Berojgari Bhatta Yojana योजने अंतर्गत पात्र तरुणांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाईल .

4 ) सादर योजने अंतर्गत पात्र तरुणांना त्यांच्या बँक खात्यात थेट रुपये रक्कम 5000 दरमहा जमा केले जातील .

5 ) महाराष्ट्रातील तरुणांना कोणावरही अवलंबून न राहता आता आपल्या कुटुंबाला सांभाळता येणार आहे .

लोक हेही वाचतात – महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना

Pradhan Mantri Berojgari Bhatta Yojana Maharashtra पात्रता

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता

Berojgari Bhatta Yojana अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील तरुण आता या योजनेचा लाभ घेऊ शकतील . सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या तरुणाने खालील पात्रता धारण केलेली असावी .

1 ) सादर योजनेसाठी अर्ज करणारा तरुण किंवा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा .

2 ) अर्जदार तरुणाचे वय हे कमीत कमी 21 ते 35 च्या दरम्यान असावे .

3 ) अर्ज करणार्या व्यक्तीच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी येणारे उत्पन्न हे रुपये 3 लाखांपेक्षा जास्त नसावे .

4 ) जी व्यक्ती अर्ज करत आहे त्या व्यक्तीचा उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा तरच त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल .

5 ) जर अर्ज करणारी व्यक्ती हि कोणत्याही प्रकारे जर सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरीत रुजू असेल तर त्या व्यक्तीस सादर योजनेचा लाभ घेता येणार नाही .

6 ) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा किमान 12 वी पास असावा .

7 ) अर्जदाराने नोकरी भिमुख कोणताही कोर्स केलेला नसावा नाहीतर टी व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसेल .

8 ) अर्जदाराचे शिक्षण हे किमान 12 वी ते पदवी पर्यंत ( 12 वी ते B.A., B.com., Bsc. ) झालेले असावे .

9 ) अर्जदार हा कोणत्याही प्रकारे व्यवसायाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंधित नसावा .

Berojgari Bhatta Yojana
Berojgari Bhatta Yojana

Berojgari Bhatta Yojana Maharashtra Documents

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जेव्हा ऑनलाईन अर्ज भरतो तेव्हा काही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात . ती कागदपत्रे खालीलप्रमाणे :

1 ) अर्जदाराचा महाराष्ट्राचा रहिवासी दाखला .

2 ) अर्जदाराचे आधारकार्ड .

3 ) अर्जदाराचे जन्माचे प्रमाणपत्र .

4 ) अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला .

5 ) अर्जदाराचे 12 वी चे मार्कशीट .

6 ) अर्जदाराचा चालू असलेला मोबाईल नंबर .

7) अर्जदाराचे बँक खात्याचे पासबुक .

8 ) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो .

Berojgari Bhatta Yojana Maharashtra Apply Online

Berojgari Bhatta Yojana अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Berojgari Bhatta yojana साठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या पायार्यांनुसार भरावा :

1 ) सर्वात प्रथम जे उमेदवार Berojgari Bhatta yojana साठी पात्र आहेत त्यांनी अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे . ( अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे .)

2 ) अधिकृत वेबसाईटवर लॉगिन केल्यावर आता तुम्हाला तिथे ‘नोकरी इच्छुक लॉगिन ‘ हा पर्याय दिसेल यात तुम्हाला ‘ नोंदणी ‘ या पर्यायावर क्लिक करायचे आहे .

3 ) आता ‘ नोंदणी ‘ या पर्यायावर क्लिक केल्यावर आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल .

4 ) हा फॉर्म तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे . यात तुम्हाला तुमचे नांव , पता , तुमचे वार्षिक उत्पन्न , तुमची जन्म तारीख , तुमचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरायची आहे .

5 ) संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर आता तुम्हाला ‘ NEXT ‘ या बटनावर क्लिक करायचे आहे .

6 ) ‘ NEXT ‘ या बटनावर क्लिक केल्यावर लगेच तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल .

7 ) आलेला OTP भरून झाल्यावर ‘ SUBMIT ‘ या बटनावर क्लिक करा .

8 ) अशा प्रकारे तुमचा अर्ज भरून झालेला असेल .

Berojgari Bhatta Yojana Maharashtra Apply Online
Berojgari Bhatta Yojana Maharashtra Apply Online

Berojgari Bhatta Yojana Maharashtra Official Website

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता महाराष्ट्रची ऑफिशिअल वेबसाईट खाली दिली आहे :

ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट

Berojgari Bhatta yojana हेल्पलाईन नंबर

सदर योजनेचा हेल्पलाईन नंबर आणि Email Id खाली दिलेला आहे .

हेल्पलाईन नंबर – 022 22625651/53

Email Id – helpdesk@sded.in

Pradhan Mantri Berojgari Bhatta Yojana Maharashtra Online Registration

बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आजच अर्ज करू शकता .

ऑनलाईन अर्ज करा

Whatsapp Group Link

FAQ – Berojgari Bhatta Yojana In Marathi Questions

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे ?

Berojgari Bhatta Yojana हि महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न हे वार्षिक 3 लाखापेक्षा कमी आहे आणि व्यक्ती बेरोजगार आहे अशा तरुणांना आता महाराष्ट्र सरकार दरमहा रुपये 5000 बेरोजगार भत्ता देणार आहे .आणि जोपर्यंत त्या तरुणाला नोकरी भेटत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला बेरोजगार भत्ता दिला जाईल .


महाराष्ट्रात बेरोजगारी भट्ट योजना उपलब्ध आहे का?

होय , महाराष्ट्रात Berojgari Bhatta Yojana Maharashtra उपलब्ध आहे . या योजने अंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा रुपये 5000 एवढी रक्कम बेरोजगारी भत्ता म्हणून दिली जाते .

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला , आर्थिक उत्पन्न रुपये 3 लाख वार्षिक , शिक्षण 12 वी ते पदवी आणि कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित नसलेला तरुण हा या योजनेचा लाभार्थी असेल .

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत किती भत्ता दिला जातो ?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत लाभार्थी तरुणास दरमहा रुपये 5000 त्याला नोकरी मिळेपर्यंत त्याच्या बँक खात्यात जमा केले जातात .

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने अंतर्गत अर्ज भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असलेला तरुण ज्याचे शिक्षा किमान 12 वी झालेले आहे आणि कोणताही व्यवसायाभिमुख कोर्स झालेला नाही असा तारू या योजनेस पात्र आहे .

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना साठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो . यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करावे .

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी किती वय असलेले उमेदवार पात्र असतील ?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे 21 ते 35 या वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पत्र राहतील .

अन्य महत्वाच्या योजना

किशोरी शक्ती योजना

प्रधानमंत्री सुर्य घर योजना

फ्री शिलाई मशीन योजना

Leave a Comment