Gay Gotha Yojana : गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत आता मिळणार गायींच्या संवर्धनासाठी तसेच गोठा बांधण्यासाठी 2,40,000 पर्यंत अनुदान ; असा करा अर्ज ..!!!

Gay Gotha Yojana : भारत हा कृषी प्रधान देश आहे . भारताची अर्थव्यवस्था हि बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे . या शेतीवर आधारित अनेक जोडधंदे केले जातात. या जोड धंद्यांमध्ये सर्वात मोठा जोड धंदा म्हणजे पशुपालन होय . यामध्ये गाय ,म्हैस , शेळी इ. पालन केले जाते . गायीला भारतामध्ये विशेष महत्व आहे .गायीला मातेसमान मानले जाते .

गायीपासून आपल्याला दुध ,शेण ,गोमुत्र मिळते .हे सर्व शेतकऱ्याला उत्पन्न मिळून देतात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावण्यास मदत करतात .त्यामुळे गायींचे खूप महत्व आहे . परंतु ज्या पद्धतीने शहरीकरण वाढत आहे आणि त्याप्रमाणे जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. गायींना चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे गायींचे पालन करणे अवघड होत आहे .या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना गायी पालनास प्रोत्साहित करण्यासाठी गाय गोठा अनुदान योजना राबवली आहे .

या योजनेचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना गायी पालनास प्रोत्साहित करण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे . Gay Gotha Yojana काय आहे , पात्रता काय असेल , या योजनेचे फायदे काय आहेत , ऑनलाईन अर्ज कसा करायचा इ . सर्व गोष्टींविषयी माहिती आज आपण या लेखामध्ये घेणार आहोत .

Whatsapp Group Link

Table of Contents

गाय गोठा अनुदान योजना काय आहे ?

गाय गोठा अनुदान हि एक सरकारी योजना आहे . या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना गायींचा गोठा बांधण्यासाठी तसेच त्यांचे पालन आणि संगोपन करण्यासाठी काही प्रमाणात सरकार कडून अनुदान दिले जाते .यामुळे शेतकऱ्याला गायींचे पालन करणे ,गोठा बांधणे , गोठा स्वच्छ ठेवणे या गोष्टींसाठी आर्थिक मदत होते .

Gay Gotha Yojana Overview

योजनेचे नाव Gay Gotha Yojana
योजना सुरु होण्याची तारीख 3 फेब्रुवारी 2023
योजना कुणी सुरु केली महाराष्ट्र सरकार
योजना कोणत्या विभागाने सुरु केली कृषी विभाग , महाराष्ट्र .
उद्देश 1 ) अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेड किंवा गोठा बांधण्यासाठी अनुदान देणे .
2 ) शेतकऱ्याचे उत्पन्नाचा आवाका वाढवणे .
लाभार्थी महाराष्ट्रातील अल्पभूधारक ग्रामीण शेतकरी .
लाभ गायींसाठी शेड किंवा गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळेल .
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन / ऑफलाईन .
अनुदान अनुदान गायींच्या संख्येनुसार रु. 70,000 ते 2,40,000 /-
गाय गोठा योजना toll free numberToll free number : 1800-223-839

गाय गोठा अनुदान योजनेची उद्दिष्टे

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत आहे . हे अनुदान देण्यामागे काही उद्दिष्टे आहेत . ती उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत .

1 ) गायींना गोठा बांधण्यासाठी अनुदान देणे .

2 ) गायींचे पाऊस ,वारा ,कडकडाटी थंडी आणि ऊन यापासून संरक्षण व्हावे .

3 ) शेतकऱ्यांना शेती बरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे .

4 ) महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या इतर शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी आकर्षित करणे .

5 ) शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी कर्ज घ्यायला लागू नये म्हणून शेतकऱ्यांना मदत करणे .

6 ) जे कोणी पशुपालक किंवा शेतकरी आहेत त्यांना गायी पालनासाठी कोणावरही विसंबून राहावे लागू नये म्हणून शेतकऱ्यांना मदत करणे .

7 ) शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या साधनांत वाढ करण्यास मदत करणे.

8 ) एकंदरीत राष्ट्राच्या उन्नतीत भर घालणे .

9 ) या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधने .

Gay Gotha Yojana
Gay Gotha Yojana

Gay Gotha Yojana पात्रता

गाय गोठा अनुदान योजनेची पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे .

1 ) अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी .

2 ) अर्ज करणारी व्यक्ती हि महाराष्ट्राची रहिवासी असावी .

3 ) या योजनेचा लाभ महाराष्ट्रा बाहेरील शेतकऱ्यांना घेता येणार नाही .

4 ) शेतकऱ्याला सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे .

5 ) जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत अशाच शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल .

6 ) एका शेतकरी कुटुंबाला या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल .

7 ) सदर योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागात राहाणाऱ्या शेतकऱ्यांनाच घेता येईल .

8 ) ज्या पात्र शेतकर्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपला स्वतंत्र करणे आवश्यक आहे .

Gay Gotha Yojana
Gay Gotha Yojana

Gay Gotha Yojana आवश्यक कागदपत्रे

जर तुम्ही गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत .

1 ) अर्जदाराचे रेशन कार्ड .

2 ) अर्जदाराचे आधार कार्ड .

3 ) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.

4 ) अर्जदाराचा मोबाइल नंबर .

5 ) मतदान कार्ड .

6 ) अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र .

7 ) अर्जदाराचे जन्माचे प्रमाणपत्र .

8 ) कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला .

9 ) अर्जदाराचे आदिवासी प्रमाणपत्र .

10 ) अर्जदाराचा रहिवासी दाखला .

11 ) ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र .

12 ) अर्जदाराचे अल्पभूधारक असल्याचा पुरावा .

13 ) अर्जदार ज्या जागेत शेड किंवा गोठा बांधणार आहे त्या जागेत जर हिस्सेदार असतील तर त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा संमतीपत्र .

14 ) उमेदवाराने याआधी शेड किंवा गोठा बांधण्यासाठी कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसल्याचे घोषणापत्र .

15 ) अर्जदार अल्पभूधारक असल्याचे प्रमाणपत्र .

16 ) कुटुंबाचे नारेगा प्रमाणपत्र .

17 ) कुटुंबाचे जॉब कार्ड .

18 ) गोठा किंवा शेड बांधणीचे अंदाजपत्रक .

19 ) ग्रामसेवक, सरपंच किंवा पशुधन पर्यवेक्षक यांचे पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र .

गाय गोठा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा

Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply

महाराष्ट्रातील काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .बाकी ठिकाणी अर्जदार ऑफलाईन अर्ज भरू शकतो . ज्या ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरायचा आहे . ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जदाराने खाली दिलेल्या पायऱ्यांनी अर्ज भरायचा आहे .

1 ) अर्जदाराने अर्ज सरपंच , ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यापैकी कुणाकडे करत आहे त्याच्या नावापुढे बरोबर खूण करावी .

2 ) त्याखाली तुमचा जिल्हा , तालुका आणि तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव टाका .

3 ) त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव ,पत्ता , जिल्हा , तालुका आणि अर्जदाराचा मोबाईल नंबर भरावा .

4 ) आता उमेदवार ज्या प्रकारच्या शेड किंवा गोठ्यासाठी अर्ज करणार आहे त्याच्यापुढे बरोबर अशी खुण करा .

5 ) त्यानंतर अर्जदाराने ज्या प्रकारच्या शेड किंवा गोठ्यासाठी अर्ज केला आहे त्याच्याशी संबंधित असलेली कागदपत्रे जोडावीत .

6 ) जमीन जर अर्जदाराच्या नावाने असेल तर त्यापुढे बरोबर अशी खुण करावी . आणि त्यासोबत ग्रामपंचायतीचा नमुना 9 तसेच 7 / 12 आणि 8 अ जोडा .

7 ) अर्जदार ज्या गावचां आहे त्या गावाचा रहिवासी पुरावा जोडायचा आहे .

8 ) सरपंच / ग्रामसेवक यांचे शिफारस पत्र सोबत जोडायचे आहे .

9 ) सर्वात अर्ज पंचायत समिती कार्यालयात सादर करायचा आहे .

Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply
Gay Gotha Yojana Maharashtra Online Apply

गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

how to apply offline for gay gothaa yojanaa

गाय गोठा अनुदान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून अर्ज घ्यावा . आणि अर्ज भरून पंचायत समितीमध्ये जमा करावा . अर्जदार खाली दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज pdf स्वरूपात डाउनलोड करू शकतात .आणि त्याची प्रिंट मारून तो फॉर्म पंचायत समितीमध्ये जमा करू शकतात .

Gay Gotha Yojana Form PDF

गाय गोठा अनुदान शासन निर्णय

गाय गोठा अनुदान योजना प्रक्रिया कशी काम करते ?

How Application Works For Gay Gotha Yojana Maharashtra

गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज भरल्यानंतर पुढील प्रमाणे कार्यवाही होते . ते आपण पुढील मुद्द्यांच्या माध्यमातून समजून घेऊ .

1 ) सर्वात प्रथम अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज भरून पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे .

2 ) अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्यात त्याच्या अर्जाची छाननी करून त्याच्या गोठ्याला मान्यता दिली जाते .

3 ) त्यानंतर अर्जदाराला प्रशासकीय अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याकडून गोठा बांधण्यासाठी सांगितले जाते .

4 ) प्रशासकीय अधिकारी ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीला गोठा बांधून घ्यावा लागतो .

5 ) योजनेचे पैसे हे खातेदाराच्या जॉब कार्ड खात्यावर जमा केले जातात .

6 ) या योजने अंतर्गत अर्जदाराला योजनेचा लाभ म्हणून 100 % रक्कम मिळते .

7 ) अर्जदाराला काही अडचण आली तर तो ग्रामसेवकाची मदत घेऊ शकतो .

Gay Gotha Yojana अर्ज रद्द होण्याची कारणे

अर्जदाराने Gay Gotha Yojana या योजनेसाठी अर्ज करून सुद्धा काही वेळेस अर्ज रद्द होऊ शकतो . त्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता

येतील .

1 ) जर अर्जदाराने अर्जामध्ये खोटी माहिती भरली तर अर्जदाराचा अर्ज रद्द होऊ शकतो .

2 ) जर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर त्या व्यक्तीचा अर्ज रद्द होऊ शकतो .

3 ) अर्ज करणारा शेतकरी ग्रामीण भागातील नसेल तर सादर केलेला अर्ज रद्द होऊ शकतो .

4 ) जर अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन नसेल तरी सुद्धा अर्जदाराचा अर्ज रद्द केला जातो .

5 ) जर अर्जदाराने गाय गोठ्यासाठी अर्ज केला आहे आणि जर त्याच्याकडे गायीच नसतील तर अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याचा अर्ज रद्द होऊ शकतो .

6 ) जर शेतकऱ्याकडे या योजनेसाठी अर्ज करताना पक्का गोठा असेल तरी त्या शेतकऱ्याचा अर्ज रद्द होऊ शकतो .

7 ) जर अर्जदाराने एकाच वेळी एकापेक्षा जास्त अर्ज केलेले असतील तर अशा वेळी त्याचा अर्ज रद्द केला जातो .

8 ) जर अर्जदाराने पूर्वी गाय गोठा बांधण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्याकडून अनुदान घेतलेले असेल तर अशा परिस्थितीत देखील अर्जदाराचा अर्ज रद्द होऊ शकतो .

Whatsapp Group Link

FAQ – Gay Gotha Yojana

गाय गोठा योजना कधी सुरु झाली ?

गाय गोठा अनुदान योजना 3 फेब्रुवारी 2023 ला सुरु झाली .

गाय गोठा अनुदान किती आहे ?

गाय गोठा अनुदान हे गायींच्या संख्येनुसार देण्यात येते .हे अनुदान साधारणतः रु. 70,00,000 /- ते रु. 2,40,000 /- देण्यात येते .

गाय गोठा अनुदान योजना कोणी सुरु केली ?

गाय गोठा अनुदान योजना कृषी विभाग महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे .

गाय गोठा अनुदान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज प्रत कोठून घ्यावी ?

गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज आपल्या गावातील सरपंच ,ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून घ्यावा .

गाय गोठा अनुदान योजना अर्ज कोठे सादर करावा ?

अर्जदाराने गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पंचायत समितीमध्ये सादर करावा .

अन्य महत्वाच्या योजना

बेरोजगारी भत्ता योजना

किशोरी शक्ती योजना

मोफत शिलाई मशीन योजना

Leave a Comment