Pm Surya Ghar Yojana : मित्रानो ,आपण काही दिवसांपूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या एका भाषणामध्ये लोकांना मोफत वीज देण्याची घोषणा केल्याचे ऐकले आहे . या योजनेचे नाव पीएम सुर्य घर मुफ्त बिजली योजना आहे. या घोषणे संबंधात आता 13 फेब्रुवारी 2024 पासून या योजनेची घोषणा केली आहे . याची घोषणा स्वतः पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर वरून दिली आहे . सदर योजनेंतर्गत भारतातील कोणत्याही व्यक्तीला आत्ता 300 युनिट पर्यंत वीज मोफत वापरता येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत आता लोकांना त्यांच्या घरांच्या छतावर सोलर पैनल बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे .
Pm Surya Ghar Yojana या योजनेअंतर्गत आता आपल्या देशातील ज्या लोकांना विजेचे बिल जास्त येते अशा लोकांना दिलासा मिळणार आहे. सदर योजने अंतर्गत आता देशातील जवळ जवळ 1 कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे . या सर्व लोकांना आता या योजने अंतर्गत दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत वापरता येणार आहे. 1 करोड लोकांची जवळ जवळ 1800 कोटी रुपये पर्यंत बचत होणार आहे .
मित्रांनो ,जर तुम्ही Pm Surya Ghar Yojana या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला अगोदर या योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे . सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे , उद्देश काय आहे ,आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ,या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या पद्धतीने आपण अर्ज करू शकतो , अर्ज कसा करावा इत्यादी सर्व माहिती आपण आज या लेखात घेणार आहोत .
Pm Surya Ghar yojana काय आहे ?
काही दिवसांपूर्वी माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी Pm Surya Ghar Muft Bijli Yojana ची घोषणा केली आहे . या योजने अंतर्गत लोकांनी आपल्या घरातील छतावर जर सौर उर्जा युनिट जर बसवले तर शासनाकडून 40% अनुदान मिळणार आहे . तसेच तयार होणारी वीज घरात वापरून जर शिल्लक राहत असेल तर ती शिल्लक राहिलेली वीज आता स्थानिक वीज मंडळांना विकता येणार आहे . त्यामुळे आता नागरिकांना वीज भरण्याची गरज सुद्धा आता राहणार नाही .
या योजनेच्या लाभाच्या स्वरुपात भारत सरकार आता 1 कोटी कुटुंबाना मोफत वीज देणार आहे. यामुळे भारत सरकारची 50 लाख रुपयांची बचत सुद्धा होणार आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करावा तसेच या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ .
Pm Surya Ghar Yojana Overview
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सुर्यघर योजना |
योजना सुरु होण्याची दिनांक | 15 /02 /2024 |
योजना कुणी सुरु केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
योजना कोणत्या ठिकाणी जाहीर केली | आयोध्या राम मंदिर ,उत्तर प्रदेश |
लाभार्थी कोण असेल ? | गरीब कुटुंब तसेच मध्यम वर्गीय कुटुंब |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
किती अनुदान मिळेल | वीज वापरानुसार रु. 30 ,000 ते रु. 78 ,000 पर्यंत |
पीएम सूर्य घर योजना ऑफिसियल वेबसाइट | pmsuryaghar.gov.in |
Pm Surya Ghar Muft Bijli Yojana Eligibility | पीएम सूर्य घर योजना पात्रता
Pm Surya Ghar Yojana साठी लागणारी पात्रता खाली देण्यात आली आहे .
1) अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी .
2 ) अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व मार्गांनी येणारे उत्पन्न वार्षिक रुपये 2,00,000/- पेक्षा जास्त नसावे .
3 ) अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घरातील कोणताही व्यक्ती हा सरकारी कर्मचारी नसावा .
4 )अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घराची छत हि कमीत कमी 300 चौरस फुट असावी.
५ ) अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घरातील विजेचा वापर हा 300 युनिट प्रती महिना यापेक्षा जास्त नसावा .
6 ) अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घरात वीज जोडणी ( electricity connection ) तसेच वीज बिल असावे .
7 ) अर्जदाराने यापूर्वी घरावर सोलर युनिट बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा .
Pm Surya Ghar Yojana Document
Pm Surya Ghar Yojana साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे .
1 ) उमेदवाराचे स्वतःचे घर असल्याचा पुरावा .
2 ) आधार कार्ड .
3 ) चालू विजेचे बिल .
4 ) रेशन कार्ड .
5 ) मतदान कार्ड .
6 ) रहिवाशी दाखला .
7 ) बँक खात्याचे पासबुक .
Pm Surya Ghar Yojana Online Apply
नवीन आणि नवीकरण मंत्रालयाने Pm Surya Ghar Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट जारी केली आहे . या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो .पीएम सुर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात . तसेच अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
Pm Surya Ghar Yojana Official Website – Apply Online
Pm Surya Ghar Yojana फायदे
पीएम सुर्य घर मोफत वीज योजने अंतर्गत देशातील लोकांनी जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करावा यावर भर देण्यात येणार आहे .या योजनेच्या माध्यमातून देशातील 1 कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे देशातील जनतेला खूप फायदा होणार आहे .या योजनेमुळे होणारे फायदे आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील .
1 ) या योजने अंतर्गत देशातील जवळ जवळ १ कोटी लोकांना / घरांना या योजनेच्या अंतर्गत मोफत वीज मिळणार आहे .
2 ) या योजनेमुळे सरकारची 50 लाखांची बचत होणार आहे .
3 ) लोक सौर उर्जेचा वापर करत असल्यामुळे दगडी कोळशाची बचत होणार आहे .
4 ) सौर उर्जेचा वापर वाढल्यामुळे नैसर्गिक साधनांवरील तान कमी होईल .
5 ) प्रदूषण कमी होण्यास मदत होईल .
6 ) लाभार्थींना 40 % पर्यंत अनुदान मिळेल .
7 ) विजेच्या वापरात कोणताही खंड न पडता नागरिकांना वीज वापरता येईल .
8 ) लोकांमध्ये सौर उर्जेच्या वापरा संबंधी जाणीव जागृती होईल .
9 ) जास्त प्रमाणात वीज तयार झाली तर ती स्थानिक वीज निर्मिती कंपनीला विकून लोकांना पैसे कमावता येतील .
Pm Surya Ghar Yojana सोलर युनिट क्षमता
वीज वापर ( मासिक सरासरी ) | सोलर युनिटची क्षमता ( किलोवट ) | अनुदान |
0 ते 150 युनिट | 1 ते 2 | रु. 30,000 ते रु. 60,000 |
150 ते 300 युनिट | 2 ते 3 | रु. 60,000 ते रु. 78,000 |
300 युनिट पेक्षा जास्त | 3 पेक्षा जास्त | रु. 78,000 |
Pm Surya Ghar Yojana Online Registration | पीएम सूर्य घर योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन
उमेदवाराने प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या नुसार रजिस्ट्रेशन पूर्ण करावे .
1 ) रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम या लिंक वर क्लिक करा .
2 ) दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल .आता इथे ‘Apply for rooftop solar ‘ या पर्यायावर क्लिक करा .
3 ) नंतर ‘ Register here ‘ या पर्यायावर क्लिक करा .
4 ) इथे आता तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा तसेच तुमचा वीज ग्राहक खाते क्रमांक आणि सध्याची वीज वितरण कंपनी निवडा .
5 ) आता खाली ‘ Next ‘ बटन असेल त्यावर क्लिक करा .
6 ) आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवा . OTP नंबर आला कि तो इथे टाकून घ्या .तसेच संकेतांक टाका .
7 ) आता ‘ Submit ‘ बटनावर क्लिक करा .
8 ) अशा प्रकारे आता तुमची नाव नोंदणी झाली आहे .
How To Apply Pm Surya ghar yojana | अर्ज कसा करावा
Pm Surya Ghar Yojana साठी अर्ज कसा करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे .
1 ) सर्वात प्रथम नाव नोंदणी करून घ्या .त्यानंतर pmsuryaghar.gov.in या वेबसाईट लॉगीन करा .
2 ) त्यानंतर ‘ Login here ‘ या पर्यायावर क्लिक करा .
3 ) त्यानंतर ‘ Register mobile number ‘ आणि संकेतांक टाकून ‘ Next ‘ बटनावर क्लिक करा .
4 ) आता इथे तुम्ही संपूर्ण फॉर्म भरून घ्या . आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा .
5 ) आता तुमचा फॉर्म सबमिट करा .
6 ) त्यानंतर तुमचा फॉर्म तपासला जाईल आणि तो फॉर्म Approve झाला की तुम्हाला या योजानेचा लाभ दिला जाईल .
How To Check Status of Pm Surya Ghar Yojana
पीएम सूर्य घर योजनेसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि आता तुम्हाला त्याचे Status चेक करायचे असेल तर तुम्ही खालील पायऱ्याचा वापर करून Status Check करू शकता .
1 ) सर्वात प्रथम pmsuryaghar.gov.in या वेबसाईट वर लॉगीन करा .
2 ) त्यानंतर ‘ Login here ‘ या बटनावर क्लिक करा आणि मोबाईल नंबर टाकून लॉगीन करून घ्या .
3 ) आता ‘ Track Details ‘ या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती Check करू शकता .
Pm Surya Ghar Yojana Calculator
Pm Surya Ghar Yojana चा लाभ घेताना अर्जदाराला अंदाजे किती खर्च येईल याचे मापन करण्यासाठी हे Calculater तयार करण्यात आले आहे . या Calculater चा वापर कसा करावा याविषयी माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे .
1 ) उमेदवाराने pmsuryaghar.gov.in या वेबसाईट वर लॉगीन करून घ्यावे .
2 ) आता Home Screen वर तुम्हाला ‘ Know more about Rooftop Solar ‘ असा पर्याय दिसेल . या पर्यायाच्या खाली Calculater असे लिहिले असेल त्यावर क्लिक करा .
3 ) आता इथे त्या Calculater मध्ये तुम्ही जेवढी अचूक माहिती भराल तेवढे ते Calculater तुम्हाला अचूक माहिती देईल .
FAQ – Pm Surya Ghar Yojana
पीएम सूर्य घर योजनेमुळे सरकारची किती लाखांची बचत होईल ?
पीएम सूर्य घर योजनेमुळे सरकारची 50 लाख रुपयांची बचत होईल .
पीएम सुर्य घर योजनेची सुरुवात कधी झाली ?
पीएम सूर्य घर योजनेची सुरुवात हि 15 फेब्रुवारी 2024 रोजी झाली .
पीएम सूर्य घर योजनेसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ?
75 हजार कोटी एवढा निधी पीएम सूर्य घर योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे .
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत जास्तीत जास्त किती अनुदान मिळणार आहे ?
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत जास्तीत जास्त 78 हजार अनुदान मिळणार आहे .
पीएम सूर्य घर योजनेचा लाभ हा किती कुटुंबाना मिळणार आहे ?
या योजनेचा लाभ भारतातील जवळ जवळ 1 कोटी कुटुंबांना मिळणार आहे .