Pm Matru Vandana Yojana | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना दिला जाईल रुपये 6000 लाभ…!!!

Pm Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि केंद्र सरकारने सुरु केलेली आणि गरोदर मातांसाठी असलेली एक योजना आहे . पूर्वीपासूनच महिलांना चूल आणि मुल या चौकटीतच ठेवण्याचे काम समाजाने केले आहे . यातून महिलांना बाहेर काढण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले गेले .

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील महिलांसाठी अनेक योजना आणल्या गेल्या . आणि त्या माध्यमातून महिलांचा विकास करण्याचा प्रयत्न केला गेला . पण आजही आपण बघतो कि महिलांना समाजात पाहिजे तसे स्थान दिले जात नाही . आजही घर संभाळणे , घरातली सर्व कामे करणे हे काम महिलांनाच करावे लागते .

गरीब महिलांना गरोदर असताना गरातली कामे करणे शक्य होत नाही . आणि त्यातच त्यांना बाहेर देखील काम करावे लागते . पण गरोदर असताना काम करता येत नाही . आणि काम न केल्यामुळे त्यांना गरोदरपणात आर्थिक चणचण भासते . हीच गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने गरोदर मातांसाठी ‘ Pm Matru Vandana Yojana ‘ आणली आहे .

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे ? , या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ? , फायदे काय आहेत ? , या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असणे आवश्यक आहे ? , या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? ही सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .

Table of Contents

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे ?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही एक केंद्र सरकारी योजना आहे . जानेवारी 2017 मध्ये भारत सरकारने ही योजना सुरू केली . या योजने अंतर्गत गरोदर मातांना केंद्र सरकार रुपये 6,000 आर्थिक मदत करते . ही रक्कम महिलांना 3 टप्प्यात प्रदान केली जाते . ही सर्व रक्कम महिलेच्या बँक खात्यात सरकार द्वारे पाठवली जाते .

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर मातांसाठी केंद्र सरकारने आणलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे . स्त्रियांना समाजात सन्मानाने जगता यावे , स्तनदा मातांना आरोग्यदायी पोषक आहार घेता यावा . यासाठी हि योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे . यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहील आणि त्या आपल्या लहान बाळांची देखील चांगली काळजी घेऊ शकतील .

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

योजनेचे नांव प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
योजना कधी सुरू झाली ?1 जानेवारी 2017
योजना कोणी सुरु केली ?भारत सरकार
कोणत्या विभागांतर्गत सुरु केली ? महिला व बाल कल्याण विभाग , भारत सरकार .
योजनेचा उद्देश गरोदर मातांना आर्थिक लाभ देणे .
लाभार्थी भारतातील गरोदर माता .
लाभ 6000 रुपये आर्थिक लाभ
अर्जप्रक्रिया ऑनलाईन / ऑफलाईन

Pm Matru Vandana Yojana उद्दिष्टे

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु करण्याच्या मागे केंद्र सरकारचे अनेक उद्दिष्टे आहेत . ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे :

1 ) गरोदर मातांना आर्थिक मदत

गरोदर कामकरी मातांना गरोदरपणात काम करावे लागू नये तसेच त्यांना आराम मिळावा आणि आर्थिक मदत व्हावी हे उद्दिष्ट ही योजना सुरू करण्याच्या पाठीमागे आहे .

2 ) मातांना आणि महिलांना कुपोषणापासून वाचवणे

गरोदर कामकरी मातांना आर्थिक मदत करून त्यांना कुपोषणापासून वाचवणे हे उद्दिष्ट हि योजना सुरु करण्याच्या पाठीमागे आहे .

3 ) गर्भधारणे दरम्यान तसेच स्तनदा मातांना काम करण्यापासून संरक्षण देणे

स्तनदा मातांना आराम मिळावा , बाळांची काळजी करता यावी आणि काम करण्यापासून संरक्षण मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे .

4 ) विश्रांती

‘ Pm Matru Vandana Yojana ‘ या योजनेच्या माध्यमातून कामकरी महिलांना विश्रांती मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे . आणि बाळाचे आणि आईचे आरोग्य चांगले राहावे हा उद्देश आहे .

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फायदे

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्र सरकारने सुरु केली . Pm Matru Vandana Yojana या योजनेचे अनेक फायदे आहेत . ते फायदे पुढील प्रमाणे :

1 ) रोख मदत थेट बँक खात्यात

Pm Matru Vandana Yojana या योजने अंतर्गत मिळणारा लाभ थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केला जातो .

2 ) गरोदर मातांना रुपये 6000 चा थेट लाभ

Pm Matru Vandana Yojana या योजने अंतर्गत मिळणारा लाभ रुपये 6,000 थेट लाभ धारकाच्या खात्यात जमा केला जातो .

3 ) गरोदरपणात गरजा पूर्ण करता येतात

महिलांना काम न करता येत असल्यामुळे Pm Matru Vandana Yojana या योजने अंतर्गत महिला त्यांच्या गरजा पूर्ण करु शकतात .

4 ) बाळाची काळजी घेण्यास माता सक्षम

या काळात माता सक्षम असतील तर त्या बाळाची काळजी घेऊ शकतात .

5 ) माता मृत्यू प्रमाणात घट

Pm Matru Vandana Yojana या योजनेचा लाभ घेतल्यामुळे माता आपले आरोग्य चांगले ठेऊ शकतात आणि त्यामुळे माता मृत्यू प्रमाण कमी होईल .

6 ) कुपोषणाच्या प्रमाणात घट

Pm Matru Vandana Yojana या योजनेच्या माध्यमातून मातांना त्यांचे स्वत:चे आरोग्य चांगले ठेवता येत असल्यामुळे कुपोषणाच्या प्रमाणात घट होते .

Pm Matru Vandana Yojana Eligibility

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे . या पात्रता पुढील प्रमाणे :

1 ) अर्ज करणारी महिला ही भारताची रहिवासी असावी .

2 ) ‘ Pm Matru Vandana Yojana ‘ या योजनेचा लाभ गर्भवती मातेला फक्त एकदाच घेता येईल .

3 ) जर एखाद्या महिलेचा गर्भपात झाला किंवा मृत बाळ जन्माला आले तरी ती माता या योजनेच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल .

4 ) जर एखादी महिला राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मध्ये नोकरी करत असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र असणार नाही .

5 ) गर्भवती महिलेचे आधारकार्ड बँकेच्या खात्याशी जोडलेले असावे .

6 ) ‘ Pm Matru Vandana Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व पतीचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे .

Pm Matru Vandana Yojana Eligibility
Pm Matru Vandana Yojana Eligibility

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कागदपत्रे

‘ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ‘ या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते . ती कागदपत्रे पुढीप्रमाणे :

1 ) लाभार्थी पत्नी आणि तिच्या पतीचे आधारकार्ड .

2 ) बँक खात्याचे पासबुक .

3 ) माता व बाल संरक्षण कार्ड .

4 ) हमी पत्र .

5 ) लाभर्थीचा मोबाईल नंबर .

Pm Matru Vandana Yojana Apply

‘ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र ‘ अंतर्गत गरोदर महिलांना लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता . या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा हे पुढे दिले आहे .

ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

गरोदर माता ‘ Pm Matru Vandana Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज करू शकतात . यासाठी जवळच्या आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जावे . आणि त्यांच्याजवळ अर्ज भरावा . यासाठीचा अर्ज 3 वेळा 3 टप्प्यात भरावा लागतो . आणि प्रत्येक टप्प्यावर अर्ज भरल्यावर महिलांना पैसे त्यांच्या बँक खात्यावर दिले जातील .

Pm Matru Vandana Yojana Online Apply

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत पात्र महिला ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात :

1 ) Pm Matru Vandana Yojana Website वर सर्वात प्रथम लॉगिन करा .

2 ) आता तुम्ही अधिकृत वेबसाईटवर याल .

3 ) इथे लॉगिन अर्ज भरून घ्या आणि लॉगिन करा .

4 ) आता तुमचा अर्ज इथे भरून घ्या .

5 ) त्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे जोडा .

6 ) आता तुमचा अर्ज सबमिट करा

Pm Matru Vandana Yojana Online Apply
Pm Matru Vandana Yojana Online Apply

निष्कर्ष

‘ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ‘ हि केंद्र शासनाने सुरु केलेली एक योजना आहे . या योजने अंतर्गत गरोदर महिला अर्ज करू शकतात . या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम महिलाना 3 हप्त्यांमध्ये दिली जाते . त्यामुळे महिला आपले तसेच आपल्या बाळाचे पोषण करू शकतात . आणि आरोग्यदायी राहू शकतात . त्यामुळे पात्र गरोदर मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा .

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या गरजू मित्र – मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा . आणि त्यांनाही या योजनेचा लाभ घेण्यास सहाय्य करा . तसेच या योजनेबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर आम्हाला खाली कमेंट करून सूचित करा . आम्ही त्यामध्ये सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू .

FAQ – प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मराठी माहिती


प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी आहे?

ज्या महिला काम करतात त्या कामकरी महिलांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये तसेच त्यांचे आणि त्यांच्या बाळाचे पोषण व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे .


प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत लाभ कधी पासून दिला जातो?

पहिल्या जिवंत मुलाच्या जन्मानंतर 270 दिवसाच्या आत महिला अर्ज करू शकते . आणि या योजनेचा लाभ घेऊ शकते .



प्रधानमंत्री मातृ वंदना योजनांतर्गत लाभ किती अपत्यांपर्यंत मिळतो?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2 अपत्यांसाठी लागू होते . पहिल्या मुलासाठी रुपये 5,000 आर्थिक मदत तर दुसर्‍या मुलासाठी रुपये 6,000 आर्थिक मदत केली जाते परंतु दुसरे अपत्य मुलगी असणे आवश्यक आहे .


प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरुवात कधी झाली?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2010 साली सुरु झाली होती पण 2017 मध्ये या योजनेचे नांव बदलण्यात आले .



गर्भवती महिलांसाठी कोणत्या योजना आहेत?

गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि केंद्र सरकारची योजना आहे . या योजने अंतर्गत गरोदर महिलांना रुपये 6,000 दिले जातात .


गर्भवती महिलेसाठी 5000 रुपयांसाठी कोण पात्र आहे?

ज्या गर्भवती महिलांच्या घराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे . अशा महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत .

इतर महत्वाच्या योजना

मोफत शिक्षण योजना

लाडका भाऊ योजना

संजय गांधी निराधार योजना