Mofat Pithachi Girani Yojana | मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी 100% अनुदान..!!

Mofat Pithachi Girani Yojana : महाराष्ट्रातील महिलांचे कल्याण व्हावे , त्यांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार नेहमी काही ना काही योजना आणत असते . आणि त्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असते . पुरुष प्रधान समाजात महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने काम करता यावे तसेच स्त्रियांना त्यांचे सर्व हक्क मिळावेत यासाठी बऱ्याच लोकांनी संघर्ष केला आहे .

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बऱ्याच योजना राबवल्या गेल्या आहेत . आणि त्या माध्यमातून स्त्रियांचा सर्वांगीण विकास साध्या करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तत्पर आहे . स्त्रियांनी त्याच्या स्वत:च्या पायावर उभे राहावे तसेच स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा आणि आत्मनिर्भर व्हावे यासाठी बऱ्याच योजना राबवल्या जातात .

आजच्या समाजात बराच बदल झालेला आहे . स्त्रिया बाहेर जाऊन नोकरी करून घरही सांभाळतात . पण प्रत्येक वेळी त्यांना नोकरी मिळेल असेही नाही . मग बेरोजगार राहावे लागते . स्वतःच्या कुटुंबाला हातभारही लावता येत नाही . त्यातच ती स्त्री ग्रामीण भागातील आणि अशिक्षित असेल तर तिला रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात .

महाराष्ट्र शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे . या योजनेचे नांव ‘ Mofat Pithachi Girani Yojana ‘ आहे . पि‍ठाची गिरणी योजना काय आहे ? , या योजने अंतर्गत काय लाभ मिळेल , पात्रता काय आहे , या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .

पिठाची गिरणी योजना म्हणजे काय ?

महाराष्ट्र सरकार ‘ पिठाची गिरणी योजना 2024 ‘ अंतर्गत महाराष्ट्रातील गरीब आणि होतकरू महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करणार आहे . महाराष्ट्र सरकार 100 % अनुदानावर ही गिरणी महाराष्ट्रातील पात्र महिलांना देणार आहे . या गिरणीच्या माध्यमातून महिलांना घरी बसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे . त्यासाठी महिलांना बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही . असे केले तर त्या आपल्या लहान बाळांना देखील सांभाळू शकतील आणि घरी बसून पैसे देखील कमवू शकतील . आणि आपल्या कुटुंबाला हातभार देखील लावू शकतील .

Free Flour Mill Scheme In Maharashtra

योजनेचे नांव मोफत पिठाची गिरणी योजना
राज्य महाराष्ट्र
योजना कोणी सुरू केली ?महाराष्ट्र शासन
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जाईल ?महिला व बाल कल्याण विभाग
लाभार्थी कोण ?आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिला
काय लाभ मिळेल ?मोफत पिठाची गिरणी
अर्जप्रक्रिया ऑफलाईन
पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र

Free Atta Chakki Yojana Maharashtra : उद्दिष्टे

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘Mofat Pithachi Girani Yojana ‘ ही महिलांना रोजगारक्षम बनवण्याचे काम करते . यातून महिलांना रोजगार मिळतो . याच योजनेची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे :

1 ) रोजगार उपलब्ध करून देणे

महाराष्ट्रातील महिलांना पिठाची गिरणी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हा ‘Mofat Pithachi Girani Yojana ‘ या योजनेचा मागील उद्देश आहे .

2 ) महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे

‘ Mofat Pithachi Girani Yojana ‘ या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यातून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेच्या पाठीमागील उद्देश आहे .

3 ) महिलांना स्वावलंबी बनवणे

महिला आपल्या दैनंदिन व्यवहारात छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुटुंबातील व्यक्तींवर अवलंबून असतात . ‘Mofat Pithachi Girani Yojana ‘ या योजनेच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल . आणि त्यातून त्या स्वावलंबी बनतील .

4 ) महिलांचा आर्थिक विकास

महाराष्ट्र सरकार कडून मोफत पिठाची गिरणी मिळाल्यामुळे रोजगार उपलब्ध होतो आणि त्या माध्यमातून महिलेचा आर्थिक विकास साध्या होतो .

5 ) महिलांच्या राहणीमानात सुधारणा करणे

रोज काही ना काही पैसे हातात येत असल्यामुळे महिलांच्या राहणीमानात सुधारणा होईल अशी ही योजना आहे .

6 ) गरीब कुटुंबांना आर्थिक हातभार देणे

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिलेला रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या कुटुंबाला हातभार लावणे हा या योजनेचा उद्देश आहे .

Free Atta Chakki Yojana Maharashtra
Free Atta Chakki Yojana Maharashtra

Mofat Pithachi Girani Yojana : फायदे

‘ Mofat Pithachi Girani Yojana ‘ या योजनेचा महाराष्ट्रातील पात्र महिलांनी लाभ घेतला तर याचे त्यांना खूप फायदे होतात . ते फायदे पुढील प्रमाणे :

1 ) आर्थिक लाभ

‘ Mofat Pithachi Girani Yojana ‘ या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलेला मोफत पिठाची गिरणी मिळते . आणि त्यातून महिला आपला आर्थिक लाभ करून घेऊ शकते .

2 ) रोजगार उपलब्ध होतो

Mofat Pithachi Girani Yojana ‘ योजनेच्या माध्यमातून पिठाची गिरणी मिळाल्यावर महिला लोकाचे पीठ दळून देऊ शकते आणि त्यातून त्या महिलेला रोजगार उपलब्ध होईल .

3 ) घरात बसून पैसे कमावता येतात

शेजारील तसेच आजूबाजूच्या लोकांचे दळण दळून महिला घरात बसून पैसे कमवू शकते .

4 ) कुटुंबाच्या राहणीमानात बदल होतो

पिठाच्या गिरणीच्या माध्यमातून काही पैसे मिळायला लागल्यावर महिला आपल्या कुटुंबासाठी गरजेच्या वस्तू विकत घेऊ शकते यातून कुटुंबाचे राहणीमान उंचावेल .

5 ) कुटुंबाला हातभार लावता येतो

महिला लोकांचे दळण दळून येणार्‍या पैशातून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकते .

6 ) पिठाच्या गिरणीसाठी 100 % अनुदान

महिलेला पिठाची गिरणी घ्यायची असेल तर पिठाची गिरणी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 100 % अनुदान दिले जाते . म्हणजेच पात्र महिलेला एकही पैसा खर्च करावा लागत नाही .

7 ) सुलभ अर्जप्रक्रिया

‘ Mofat Pithachi Girani yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे . ग्रामपंचायत किंवा आपल्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात जायचे आहे आणि तिथे अर्जाची मागणी करून तो अर्ज भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत आणि तो अर्ज तेथे जमा करायचा आहे .

8 ) दैनंदिन गरजांची पूर्तता

दळण दळून जे काही उत्पन्न मिळेल त्यातून त्या महिलेच्या दैनंदिन गरजांची पूर्तता होणार आहे .

9 ) आर्थिक उत्पन्नात वाढ

कुटुंबातील महिला कमवायला लागली कि आपसूकच त्या कुटुंबाचे उत्पन्न वाढणार आहे .

पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र : पात्रता

पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुढील पात्रता धारण करणे आवश्यक आहे :

1 ) अर्ज करणारी व्यक्ती महिला असावी .

2 ) अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी .

3 ) फक्त ग्रामीण भागातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

4 ) ज्या महिला शहरात राहतात अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .

5 ) एका कुटुंबात असलेल्या महिलांपैकी फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल .

6 ) कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल तर अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही .

7 ) अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे .

8 ) आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या फक्त महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

9 ) या योजनेचा लाभ घेण्याच्या अगोदर जर अर्जदार महिलेने केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यापैकी कोणाकडूनही पिठाची गिरणीचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा लाभ त्या महिलेला घेता येणार नाही .

10 ) 18 ते 60 वर्षे या वयोगटातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

Free Flour Mill Scheme In Maharashtra
Free Flour Mill Scheme In Maharashtra

Mofat Pithachi Girani Yojana : आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र सरकार कडून राबवल्या जाणार्‍या ‘ Mofat Pithachi Girani Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहेत :

1 ) अर्जदाराचे रेशन कार्ड

2 ) अर्जदाराचे आधार कार्ड

3 ) 1 लाख 20 हजार पेक्षा कमी उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला

4 ) महिला 12 वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

5 ) राहत असलेल्या घराच्या लाईट बिलाची झेरोक्स

6 ) अर्जदाराचा जातीचा दाखला

7 ) अर्जदाराचा रहिवासी दाखला

8 ) अर्जदाराच्या बँकेच्या खात्याचे पासबुक

9 ) अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो

10 ) अर्जदाराचा सध्याचा मोबाईल नंबर

11 ) अर्जदाराचा ईमेल आयडी

12 ) पिठाची गिरणी किंमत असलेले गिरणीचे कोटेशन

Free Flour Mill Scheme Online Apply

‘ Mofat Pithachi Girani Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकत नाही . कारण महाराष्ट्र शासनाने यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही . Free flour mill scheme in maharashtra online registration तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकत नाही . या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता . ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत खाली दिलेली आहे .

Free Flour Mill Scheme Online Apply
Free Flour Mill Scheme Online Apply

Free Flour Mill Machine Apply

मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र शासनाच्या ‘ मोफत पिठाची गिरणी ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल . यासाठी खालील पायर्‍यांचा वापर करून तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता :

1 ) सर्वात प्रथम आपल्या ग्रामपंचायतमध्ये जा किंवा आपल्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात जा .

2 ) याठिकाणी ‘ मोफत पिठाची गिरणी योजना ‘ या योजनेचा अर्ज मागा .

3 ) अर्ज घेतल्यावर त्या अर्जात तुमची संपूर्ण माहिती नमूद करा .

4 ) आता त्या अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा .

5 ) आता तुमचा अर्ज तेथे जमा करा .

निष्कर्ष

‘ Pithachi Girani Yojana ‘ ही महाराष्ट्र शासनाची एक रोजगार निर्मितीक्षम योजना आहे . Mofat Pithachi Girani Yojana या योजने अंतर्गत पात्र महिलेला मोफत 100 % महाराष्ट्र शासन अनुदानावर पि‍ठाची गिरणी दिली जाते . आणि यातून महाराष्ट्रातील महिलांना सक्षम , स्वावलंबी , आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केला जातो . यामुळे पात्र महिलेला आर्थिक लाभ पात्र होतो . घरी बसून रोजगार उपलब्ध होतो . महिला आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेऊ शकते . त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र महिलांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यायला हवा .

मित्रांनो , आम्ही आशा करतो या लेखाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवलेली माहिती तुम्हाला आवडली असेल . आणि या योजनेचा तुम्हाला नक्की फायदा होईल . हा लेख तुमचा जवळच्या गरजू मित्र -मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा . आणि त्यांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करा . तुम्हाला या लेखासंदर्भात काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा . आम्ही तुमची मदत करण्यासाठी तत्पर आहोत . आणि अशीच माहिती रोज पाहण्यासाठी mahajobyojana.in भेट द्या .

इतर महत्वाच्या योजना

आंतरजातीय विवाह योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना