Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मंडळी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी नुकतीच 29 जून 2024 रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली आहे . आपला भारत देश म्हणजे संतांची भूमी ! आणि या संतांच्या भूमीत अनेक तीर्थक्षेत्रे आहेत . आणि त्या तीर्थ क्षेत्रांना आपला आपला इतिहास आहे . आणि तो इतिहास म्हणजे आपल्या भारताच्या खजिन्यात असलेले पवित्र दान आहे .
जेष्ठ नागरिकांना अशा पवित्र स्थळी भेट देण्याची खूप इच्छा असते . पण बऱ्याच वेळा त्यांच्याकडे अशा तीर्थ क्षेत्राला दर्शन घ्यायला जाण्यासाठी पैसे नसतात . त्यामुळे जेष्ठ नागरिकांची इच्छा अपूर्ण राहते . हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 हि योजना आणली आहे .
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत आता महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना संपूर्ण भारतात आता कुठेही तीर्थदर्शनासाठी जाता येणार आहे . आणि तेही अगदी मोफत ! या तीर्थ दर्शनामध्ये अनेक ठिकाणांचा समावेश आहे . या योजनेसाठी अर्ज भरल्यानंतर तीर्थक्षेत्र दर्शनाचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे .
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 योजना काय आहे , लाभ कसा घेता येईल , अर्ज कसा करावा , पात्रता काय , आवश्यक कागदपत्रे , योजनेचा उद्देश काय आहे इत्यादी विषयी माहिती आजच्या लेखात आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत . त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा .
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना काय आहे ?
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना हि महाराष्ट्र शासनाचे 100 % अनुदान असलेली योजना आहे . या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने काही विशेष गाड्या आणि बसमधून मोफत प्रवास तिकिटे घेऊन प्रवास करता येईल अशी सुविधा केली आहे . तसेच लाभार्थ्यांना तीर्थ क्षेत्रावर मोफत पाणी , मोफत निवास , मोफत नाष्टा आणि जेवण इत्यादी सुवधा उपलब्ध करून देणार आहेत .
आपल्या भारत देशात विविध तीर्थक्षेत्र आहेत . आणि त्या तीर्थ क्षेत्रांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात . पण जेष्ठ नागरिक जे दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना इच्छा असूनही अशा ठिकाणी जाता येत नाही . त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हि योजना जेष्ठ नागरिकांसाठी आणली आहे . त्यामुळे कित्येक जेष्ठ नागरिकांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत .
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 In Short
योजनेचे नांव | मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजना कधी सुरु झाली ? | 29 जून 2024 |
योजना कोणी सुरु केली ? | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण ? | महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक |
काय लाभ मिळेल ? | भारतात कुठेही मोफत तीर्थ दर्शन |
अर्जप्रक्रिया | ऑनलाईन |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 उद्दिष्टे
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवण्यात येणार आहे . हे मोफत तीर्थ दर्शन घडवण्यामागील उद्दिष्टे पुढील प्रमाणे :
1 ) मोफत तीर्थ दर्शन
महाराष्ट्रातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिकांना भारतातील विविध तीर्थ क्षेत्रांचे मोफत दर्शन करवणे हा Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेचा मुख्य उद्देश आहे . या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकाना संपूर्ण भारतातील तीर्थ क्षेत्रे अगदी मोफत फिरता येणार आहेत .
2 ) सामाजिक भावनेत वाढ
तीर्थ दर्शनाला गेल्यावर जेष्ठ नागरिक आपल्या सोबत असलेल्या लोकांशी मदतीच्या तसेच मैत्रीच्या भावनेने वागतात . त्यामेले जेष्ठ नागरिकांमधील सामाजिक भावना वाढीस लागते . त्यांचे मन रमते . आणि एकटेपणा दूर होतो .
3 ) संस्कृतीचे रक्षण
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी फिरायला मिळते . यातून आपल्या संस्कृतीचे रक्षण होते . तसेच आपल्या संस्कृतीचे जतन होते .
4 ) हवाबदल
आर्थिक कारणांमुळे बऱ्याच जेष्ठ नागरिकांना कुठेही बाहेर जाता येत नाही . तसेच शारीरिक अपंगत्वामुळे ते घरात ते अडकून पडलेले असतात . Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते . त्यामुळे त्यांचा हवाबदल सुधा होतो . जीवनातील तोचतोचपणा निघून जातो .
5 ) मानसिक आरोग्याचे रक्षण
बरेच जेष्ठ नागरिक घरात एकटे असल्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवतो . आणि त्यातच त्यांचे मानसिक आरोग्य ढासळायला सुरुवात होते . जर ते घरातून बाहेर निघाले आणि समाजात मिसळले तर त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील . या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली आहे .
6 ) धार्मिक वारशाचे रक्षण
जर लोक आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशाला भेट द्यायला लागले तर आपल्या संस्कृतीचे रक्षण होईल . पुढच्या पिढीला आपण आपला धार्मिक वारसा जसाच्या तसा देऊ शकतो .
7 ) एकटेपणाच्या भावनेतून सुटका
बऱ्जेयाच जेष्ठ नागरिकांना घरात कुणी बोलायला नसल्यामुळे एकटेपणाची भावना मनात येते . जर ते अशा तीर्थ यात्रेला गेले तर तिथे त्यांना बरेच मित्र मैत्रिणी मिळतील आणि त्यांचा एकटेपणा दूर होईल .
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 फायदे
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 सुरु करण्यामागे अनेक फायदे आहेत . ते फायदे पुढीप्रमाणे :
1 ) मोफत तीर्थ दर्शन
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना भारतात कुठेही मोफत तीर्थदर्शन करवणार आहेत . प्रवास , पिण्याचे पाणी , नाश्ता , जेवण इत्यादी सुविधा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देणार आहेत .
2 ) हवाबदल
जेष्ठ नागारीक सारखे एकाच ठिकाणी राहून त्यांच्या आयुष्यातील आनंद निघून गेलेला असतो .त्यामुळे एक बदल म्हणून जेष्ठ नागरिक या तीर्थ यात्रेला जाऊ शकतात .
3 ) सामाजीकरण
जेष्ठ नागरिक या महाराष्ट्र सरकारच्या स्तुत्य उपक्रमामध्ये सामील झाले तर ते समाजात चांगल्या प्रकारे मिसळतील आणि त्यांचे सामाजीकरण होईल .
4 ) धार्मिक वारसा
विविध धार्मिक स्थळांना भेट दिल्यामुळे आपला धार्मिक वारसा जपला जाईल . आणि हा वारसा जेष्ठ नागरिकांमुळे जपला जाईल .
5 ) इच्छा पूर्ण होते
जेष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्राला भेट द्यायची खूप इच्छा असते पण त्यांना आर्थिक कारणांमुळे जाता येत नाही . पण आता Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेमुळे आता जेष्ठ नागरिकांची तीर्थ क्षेत्राला भेट द्यायची इच्छा पूर्ण होणार आहे .
6 ) मैत्री
तीर्थ यात्रा करत असताना जेष्ठ नागरिकांना अनेक मित्र मैत्रिणी भेटतील . आणि विरंगुळ्याचे क्षण शोधता येतील .
7 ) आनंदात वाढ
तीर्थ क्षेत्राच्या भेटीला गेल्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या आनंदात वाढ होणार आहे कारण त्यांची बऱ्याच दिवसांपासून तीर्थ क्षेत्राला भेट द्यायची इच्छा असते .
8 ) तीर्थ दर्शनात सर्व सुविधा मोफत
जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनाला गेल्यावर तिथे त्यांचे राहणे , पिण्याचे पाणी , नाष्टा , जेवण इत्यादी खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे . म्हणजेच सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत .
9 ) जगण्यात एक नवा उत्साह येतो
जेष्ठ नागरिक फिरायला गेल्यामुळे वातावरण बदल होतो . आणि त्यामुळे त्यांच्या जगण्यात एक नवा उत्साह येतो .
10 ) सामाजिक विकास
जेष्ठ नागरिक समाजात रुळल्यावर त्यांचा सामाजिक विकास होतो . समाजातील कार्यक्रम तसेच सण समारंभात गेल्यामुळे ते सामाजिक होतात .
11 ) सर्व धर्मातील जेष्ठ नागरिकांना लाभ
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिकांना घेता येणार आहे .
12 ) सुलभ अर्जप्रक्रिया
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे . त्यामुळे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांनी घ्यावा .
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 पात्रता
भारतातील तीर्थ दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांना काही अति किंवा पात्रता पूर्ण कराव्या लागतात . मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पात्रता पुढीलप्रमाणे :
1 ) वय
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेसाठी 60 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिक पात्र असतील .
2 ) रहिवास
अर्जदार जेष्ठ नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा .
3 ) आर्थिक स्थिती
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जेष्ठ नागरिक पात्र राहतील .
4 ) धर्म
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 या योजनेसाठी सर्व जाती धर्मातील जेष्ठ नागरिक पात्र राहतील .
मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना लिस्ट 2024 अंतर्गत समाविष्ठ असलेली ठिकाणे
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 अंतर्गत विविध ठिकाणांचा समावेश यात करण्यात आलेला आहे . काही महत्वाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्त्रोतांमध्ये काही ठिकाणांचा उल्लेख केला आहे . ती काही ठिकाणे पुढीलप्रमाणे :
1 ) तिरुपती
तिरुपती बालाजी हे एक हिंदू मंदिर असून हिंदू धर्माचे एक श्रद्धा स्थान आहे .
2 ) वेलंकन्नी
तामिळनाडू या राज्यातील हे एक खूप प्रसिध्द आणि सुंदर असे तीर्थ क्षेत्र आहे .
3 ) शिर्डी
शिर्डी हे महाराष्ट्रातील एक प्रसिध्द तीर्थ क्षेत्र आहे .
4 ) वाराणसी
वाराणसी हे उत्तर प्रदेश मधील एक सुंदर , प्रसिध्द असे हिंदूंचे तीर्थ क्षेत्र आहे .
तीर्थ दर्शन पोर्टल Online Registration
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी अजून महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही अधिकृत वेबसाईट जारी करण्यात आली नाही . लवकरच यासाठी अधिकृत वेबसाईट जारी करण्यात येईल . जेव्हा पण वेबसाईट जारी करण्यात येईल तेव्हा या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सूचित करू .
महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाईट जारी केल्यानंतर तुम्ही खालील पायऱ्याचा वापर करून तुम्ही अर्ज करू शकता :
1 ) सर्वांत प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या .
2 ) त्यानंतर तुम्ही आता वेबसाईटच्या मुखपृष्ठावर याल .
3 ) आता इथे तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे .
4 ) त्यानंतर तुमची कागदपत्रे जोडा .
5 ) आता तुमचा अर्ज सबमिट करा .
निष्कर्ष
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 हि महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना मिळालेली एक नवसंजीवनी आहे . या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक भारतात कोणत्याही तीर्थ क्षेत्र मोफत फिरू शकतात . तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी त्यांना मोफत निवास , पिण्याचे पाणी , जेवण , नाष्टा इत्यादी सुवधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . तरी महाराष्ट्रातील पात्र जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा .