Rashtriya Vayoshri Yojana : नमस्कार मित्रांनो , आपल्याला माहीतच आहे कि भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे . जगामध्ये भारताचा लोकसंखेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो . ज्याप्रमाणे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणे वृद्ध लोकसंख्या देखील वाढत आहे . साधारणतः आता ( 2024 ) भारतात वृद्ध लोकसंख्या 15 कोटी 30 लाख एवढी आहे . ज्यांचे वय हे 60 आणि त्यापेक्षा जास्त आहे .
वृद्ध लोकसंख्येमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात . यामध्ये श्रीमंत , गरीब , एकटे राहणारे , कुटुंबासोबत राहणारे वृद्ध इत्यादी प्रकार यात येत असतात . यामधील मुख्यतः गरीब असलेल्या वृद्धांना खूप कष्ट सोसावे लागतात . उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसल्यामुळे त्यांना गरजेच्या वस्तू देखील विकत घेता येत नाहीत . वृद्धांना उतरत्या वयात चष्मा , वॉकर , चालण्याची काठी , दात बसवणे , व्हील चेअर , श्रवण यंत्र इत्यादी गोष्टींची गरज भासते . पण ते खरेदी करता येत नाही .
केंद्र सरकारने ( भारत ) वृद्धांच्या या सर्व समस्या लक्षात घेऊन Rashtriya Vayoshri Yojana आणली आहे . सदर योजनेची सुरुवात 2017 साली करण्यात आली आहे . Rashtriya Vayoshri Yojana काय आहे ? , याची पात्रता काय आहे ? , या योजनेचे उद्देश काय आहेत ? , फायदे काय आहेत ? , अर्ज कोठे करावा तसेच कसा करावा इत्यादी सर्व माहिती या लेखात सविस्तरपणे दिली आहे . तरी वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचा . जेणे करून तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल .
राष्ट्रीय वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 काय आहे ?
Rashtriya Vayoshri Yojana हि केंद्र सरकारची एक योजना आहे . या योजनेची सुरुवात्त 2017 साली झाली . सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने हि योजना सुरु केली आहे . या योजनेसाठी 100 % वित्तपुरवठा केंद्र सरकार करते . सदर योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना त्यांच्या आजारपण आणि वयामुळे जे काही अपंगत्व आलेले असते त्याला सहाय्य म्हणून अपंगत्वावर मात करण्यासाठी विविध उपकरणे या योजने अंतर्गत मोफत दिली जातात . आणि जेष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंददायी करण्याचा प्रयत्न केला जातो .
Rashtriya Vayoshri Yojana In Short
योजनेचे संपूर्ण नांव | राष्ट्रीय वयोश्री योजना |
योजना कधी सुरु झाली | सन 2017 |
योजना कोणी सुरु केली | केंद्र सरकार , भारत . |
लाभार्थी कोण | भारतातील दारिद्र्य रेषेखालील 60 वर्षाच्या वरील वृध्द आणि अपंग व्यक्ती . |
लाभ | जेष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणे प्रदान करणे . |
अर्जप्रक्रिया | ऑनलाईन |
वयोश्री योजनेची उद्दिष्टे
वयोश्री योजना चालू करण्याच्या मागील उद्देश खाली दिलेले आहेत :
1 ) अवलंबित्व कमी करणे
राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत जेष्ठ नागरिकांना विविध प्रकारची उपकरणे पुरवली जातात . त्यामुळे जेष्ठ नागरिकांना उठणे , बसने , चालणे , पायऱ्या चढणे इत्यादी कामे अतिशय सोपी होतात . आणि या गोष्टींसाठी त्यांना दुसऱ्या कुणावर अवलंबून राहावे लागत नाही .
2 ) आत्मनिर्भर बनवणे
जेष्ठ नागरिक बऱ्याच वेळा एकटे आयुष्य जगत असतात .त्यातच त्यांना हालचाल करता येत नसेल तर त्यांचे आयुष्य अवघड होते . त्यामुळे हि योजना अशा जेष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर होण्यासाठी हातभार लावते .
3 ) वय , आजार आणि अपंगत्व संबंधित उपकरणे प्रदान करणे
जेष्ठ नागरिक त्यांचे वय ,आजार आणि त्यांचे अपंगत्व यांच्याशी लढत असतात . अशा जेष्ठ नागरिकांना हि योजना एक वरदान आहे . Rashtriya Vayoshri Yojana जेष्ठ नागरिकाना विविध प्रकारची उपकरणे आणि तेही अगदी मोफत प्रदान करते .
4 ) सर्वांगीण विकास
Rashtriya Vayoshri Yojana जेष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे . जेष्ठ नागरिकाना मोफत उपकरणे देऊन हि योजना त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावते .
5 ) सामाजिक उपक्रमात सहभाग वाढवणे
जेष्ठ नागरिक चालायला , फिरायला , विविध प्रकारच्या हालचाली करायला सक्षम असतील तर ते विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतील आणि आत्मसन्मानाने सर्वत्र फिरतील .
6 ) एकटेपणा कमी करणे
विविध प्रकारची उपकरणे वापरल्यामुळे जेष्ठ नागरिक त्याची हालचाल सुलभ करतील आणि परिणामी ते कुठेही फिरू शकतात आणि आपला एकटेपणा कमी करू शकतील .
7 ) जीवनमान सुधारणे
जेष्ठ नागरिकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी हि योजना सहाय्य प्रदान करते .
Rashtriya Vayoshri Yojana फायदे
Rashtriya Vayoshri Yojana जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय फायदेमंद आहे . या योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे :
1 ) मोफत उपकरणे
जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वयामुळे जे अपंगत्व येते ते अपंगत्व दूर करण्यासाठी सरकार विविध प्रकारची उपकरणे मोफत देते . या उपकरणांचा वापर करून जेष्ठ नागरिक स्वतः आत्मनिभर होऊ शकतात .
2 ) सामाजिक सहभाग
उपकरणांच्या माध्यमातून हालचाल मुक्त झाल्यामुळे जेष्ठ नागरिक विविध सामाजिक घटना , प्रसंग , उत्सव इत्यादी मध्ये भाग घेऊ शकतात . त्यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळेल .
3 ) जेष्ठ नागरिकांना मदत
केंद्र सरकार Rashtriya Vayoshri Yojana या योजनेच्या माध्यमातून विविध उपकरणे मोफत देऊन त्यांना एक स्वतंत्रपणे जगण्याची संधी देत आहे . आणि यामुळे त्यांना आपले आयुष्य अधिक सुखकरपणे जगण्याची संधी मिळते .
4 ) एकटेपणापासून सुटका
Rashtriya Vayoshri Yojana जेष्ठ नागरिकांना एकटेपणामुक्त आयुष्य जगण्याची एक चांगली संधी देते . कारण विविध उपकरणांच्या वापरामुळे जेष्ठ नागरिक अधिक स्वातंत्र्य अनुभवातील आणि घराच्या बाहेर विविध लोकांमध्ये जाऊ शकतील . आणि आपला एकटेपणा दूर करू शकतील .
5 ) गतिशीलता वाढवणे
काही जेष्ठ नागरिकांना वयमानाने अपंगत्व येते . त्यांना जागेवरून उठता देखील येत नाही . अशा लोकांची गतिशीलता विविध उपकरणांच्या वापराने वाढते . त्यामुळे ते विविध सामाजीक कार्यक्रमात भाग घेऊ शकतात .
6 ) स्वातंत्र्याची भावना वाढवणे
विविध उपकरणांच्या वापरामुळे बऱ्याच जेष्ठ नागरिकांचे हालचाल , चालणे , फिरणे बंद झालेले असते . अशा जेष्ठ नागरिकांसाठी हि योजना एक आशेचा किरण आहे . यात विविध उपकरणांचा वापर करून नागरिक आपली हालचाल सुलभ करू शकतात . त्यामुळे त्यांच्यात एक स्वातंत्र्याची भावना निर्माण होते .
7 ) आर्थिक भार कमी करणे
एखाद्या कुटुंबात आखाडा जेष्ठ नागरीकात वृद्धत्वामुळे अपंगत्व आलेले असते . आणि ते कुटुंब जर ते अपंगत्व घालवण्यासाठी आखादे उपकरण घेण्यासाठी सक्षम नसेल तर अशा लोकांना अहि योजना मदत करते . कारण या योजनेचा लाभ घेऊन त्या जेष्ठ नागरिकाला ते उपकरण अगदी मोफत मिळू शकते .
Rashtriya Vayoshri Yojana अंतर्गत देण्यात येणारी उपकरणे
1 ) चष्मा
जेष्ठ नागरिकांना Rashtriya Vayoshri Yojana त्यांच्या कमी दृष्टीचा दोष दूर करण्यासाठी चष्मा प्रदान करते . ज्यामुळे जेष्ठ नागरिक व्यवस्थित पाहू शकेल आणि त्याची जी काही दैनंदिन कामे चागल्या प्रकारे करू शकेल .
2 ) श्रवण यंत्र
ज्या जेष्ठ नागरिकाना कमी ऐकू येते . अशा जेष्ठ नागरिकांना ‘ Rashtriya Vayoshri Yojana ‘ या योजनेअंतर्गत श्रवण यंत्र प्रदान केले जाते . त्यामुळे ते चांगल्या प्रकारे ऐकू शकतील . आणि त्यांना आत्यांची रोजची कामे निट करता येतील .
3 ) व्हील चेअर
काही जेष्ठ नागरिकांना पायाचा त्रास असतो . काही कारणांमुळे त्यांना चालता देखील येत नाही . त्यामुळे त्यांना व्हील चेअरची गरज असते . परंतु त्यांना व्हील चेअर घेणे परवडत नाही . अशा जेष्ठ नागरिकांना या योजने अंतर्गत व्हील चेअर दिली जाते . आणि तेही अगदी मोफत दिली जाते .
4 ) वॉकर
ज्या जेष्ठ नागरिकांना चालण्याचा त्रास असतो आणि वॉकरची आवश्यकता असते . अशा जेष्ठ नागरिकांना Rashtriya Vayoshri Yojana अंतर्गत मोफत वॉकर दिला जातो . ज्यामुळे त्यांचे आयुष्य सुखकर होते .
5 ) चालण्याची काठी
जेष्ठ नागरिकांना वायोमानानुसार चालता येत नाही आणि चालान्याची काठी देखील विकत घेता येत नाही . त्यांना या योजने अंतर्गत चालण्याची काठी दिली जाते .
6 ) कृत्रिम दात
वायोमानानुसार वृद्ध लोकांचे दात पडतात . त्यामुळे त्यांना निट खाता देखील येत नाही . त्या जेष्ठ नागरिकांना या योजने अंतर्गत कृत्रिम दात बसवले जातात .
7 ) ट्रायपोड्स
ज्या जेष्ठ नागरिकांना शरीराच्या वरच्या कमजोरी आहे अशांना ट्रायपोड्स उपयोगी ठरतात . हि उपकरणे शरीराच्या खालच्या अंगास आधार देतात .
8 ) एल्बोक्रचेस
शरीराच्या खालच्या बाजूस कमजोरी असेल तर हे उपकरण शरीराच्या खालच्या भागास आधार देते .
Vayoshri Yojana Maharashtra पात्रता
Rashtriya Vayoshri Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुढील पात्रता धारण करणे गरजेचे आहे :
1 ) व्यक्तीचे वय हे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे .
2 ) लाभ घेऊ इच्छिणारी व्यक्ती हि दारिद्र्य रेषेखालील असावी .
3 ) दृष्टीदोष असणारी जेष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहे .
4 ) श्रवणदोष असणारी जेष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे .
5 ) ज्या जेष्ठ नागरिकांचे दात गाळलेले आहेत असे जेष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत .
6 ) ज्या जेष्ठ नागरिकांना वयाच्या संबंधित अपंगत्व आले आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत .
राष्ट्रीय वयोश्री योजना कागदपत्रे
1 ) आधार कार्ड
2 ) अपंगत्वाचे प्रमाणपत्र
3 ) BPL कार्डची साक्षांकित प्रत .
4 ) भरलेला अर्ज
Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online | How To Apply For Rashtriya Vayoshri Yojana
जेष्ठ नागरिकांनी ‘ Rashtriya Vayoshri Yojana ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो . त्यासाठी खालील पायऱ्याचा वापर करावा :
1 ) सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर ‘ ALIMCO Mitra ‘ हे app डाउनलोड करा . ( अधिकृत वेबसाईट )
2 ) आता हे app ओपन करून घ्या .
3 ) आता इथे ‘ New Registration ‘ हा option निवडा .
4 ) इथे तुमचा अर्ज ( vayoshri yojana form ) भरा आणि आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा .
5 ) आता तुमचा अर्ज ‘ Submit ‘ करा .
निष्कर्ष
केंद्र सरकारने Rashtriya Vayoshri Yojana गरीब घरातील जेष्ठ नागरिकांसाठी आणली आहे . या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जेष्ठ नागरिकांना वायोमानानुसार जे अपंगत्व आलेले असते .अशा जेष्ठ नागरिकांना या योजने अंतर्गत विविध उपकरणे प्रदान केली जातात . त्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक नवी अशा , आनंद येतो . त्यांची गतिशीलता वाढते आणि सामाजिक विकास होतो . पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा नक्की फायदा घ्या . मित्रांनो , हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र – मैत्रिणी आणि नातेवाईकांशी नक्की शेअर करा . आणि अशीच माहिती रोज पाहण्यासाठी आपल्या mahajoyojana.in या वेबसाईटला भेट द्या .