Maharashtra Pink E Rickshaw Yojana : महाराष्ट्र सरकारने जून 2024 रोजी ‘ महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना ‘ या नवीन योजनेची घोषणा केली . आज स्त्रिया बऱ्याच क्षेत्रात पुढे गेल्या आहेत . पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन स्त्रिया पुढे जात आहेत . स्त्रिया आपले कुटुंब सांभाळत आहेत आणि सोबत आपल्या देशाच्या विकासात हातभार लावत आहेत .
महिला आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना घरातील कामे करतात , मुले सांभाळतात तसेच याहि पलीकडे जाऊन बाहेर जाऊन काही काम मिळाले तर तेही करतात आणि पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात . पण प्रत्येक वेळी त्या महिलेला काम मिळेलच असे नाही . आणि मग पैसे कमावण्यात अडचणी येतात .
महाराष्ट्र सरकारने या गोष्टी लक्षात घेऊन महिलांसाठी Maharashtra Pink E Rickshaw Yojana हि योजना आणली आहे . यामुळे महाराष्ट्रातील महिलांना आता आपली स्वतःची पिंक इ रिक्षा घेता येणार आहे . आणि हि रिक्षा घेण्यासाठी शासन यासाठी सबसिडी पण देणार आहे . त्यामुळे आता महिलांना रोजगार मिळवणे सोपे होणार आहे .
‘ महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना ‘ काय आहे ? , या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ? , लाभ काय मिळेल ? , पात्रता काय ? , अर्ज कसा करावा ? इत्यादी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना काय आहे ?
Maharashtra Pink E Rickshaw Yojana हि महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजनेच्या मुख्य उद्देशामध्ये पर्यावरण आणि महिला या दोन गोष्टी लक्षात घेतल्या आहेत . पर्यावरणाचे रक्षण व्हावे तसेच महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हि योजना आणली आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना पिंक इ रिक्षा घेण्यासाठी 20 % अनुदान दिले जाते .
पिंक इ रिक्षा घेण्यासाठी बँक 70 % कर्ज देते . म्हणजेच महिलेला फक्त 10 % रक्कम भरायची आहे . या पिंक रिक्षाच्या माध्यमातून महिलांना रोजगार प्रदान करणे हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे . आणि या रिक्षाच्या माध्यमातून प्रदूषण न होता पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा या योजनेच्या मागील उद्देश आहे .
सुरुवातीच्या टप्प्यात सदर योजना महाराष्ट्रातील 10 राज्यात राबवण्यात येणार आहे . यामध्ये पुणे , पिंपरी चिंचवड , मुंबई शहर , मुंबई उपनगर , नागपूर , नाशिक , छत्रपती संभाजीनगर , मुंबई , ठाणे , पनवेल इत्यादी शहरात हि योजना राबवण्यात येणार आहे . आणि नंतर या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे .
Pink Rickshaw Yojana In Short
योजनेचे नांव | महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना |
योजना केव्हा सुरु झाली ? | जून 2024 |
योजना कोणी सुरु केली ? | महाराष्ट्र शासन |
योजना कोणत्या विभागाअंतर्गत सुरु झाली ? | महिला व बालविकास मंत्रालय , महाराष्ट्र |
लाभार्थी कोण | महाराष्ट्रातील महिला |
लाभ | पिंक इ रिक्षा घेण्यासाठी 20 % अनुदान मिळेल . |
योजना सुरु करण्याचा उद्देश | पर्यावरण संरक्षण आणि महिलांना रोजगार मिळून देणे . |
अर्जप्रक्रिया | अर्जप्रक्रिया अद्याप घोषित केली गेली नाही . |
Pink Rickshaw Yojana Maharashtra In Marathi चे उद्देश
पिंक इ रिक्षा योजना चालू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पुढील उद्देश आहेत :
1 ) महिला रोजगार
Maharashtra Pink E Rickshaw Yojana सुरु करण्या मागील महत्वाचा उद्देश हा महिलांना रोजगार मिळून देणे हा आहे . महिलांना रोजगार मिळवणे खूप अवघड झाले आहे . पिंक इ रिक्षा 20 % अनुदानासह उपलब्ध करून दिल्या तर महिला रिक्षा चालून आर्थिक उत्पन्न मिळवतील आणि आपले कुटुंब चालवतील .
2 ) महिला सक्षमीकरण
पिंक इ रिक्षाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा उद्देश हि योजना सुरु करण्याच्या पाठीमागे आहे . आणि त्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे . महिलाना रोजगार मिळाला तर महिला कुटुंब चालवण्यासाठी सक्षम होतील . आणि बेरोजगारी दर कमी होईल .
3 ) पर्यावरण संरक्षण
पिंक इ रिक्षा हवा प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण करत नाहीत त्यामुळे या पिंक इ रिक्शामुळे पारंपारिक इंधन वापरले जात नाही त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते . आणि महिलांना रोजगार मिळतो आणि पर्यायाने महिलांचा आर्थिक आणि सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागतो .
4 ) आर्थिक विकास
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘ Maharashtra Pink E Rickshaw Yojana ‘ महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे . महिलांना पिंक इ रिक्षाच्या माध्यमातून स्वतःला रोजगार मिळवता येईल . महिला त्याच्पिंक इ रिक्षा स्वतः चालू शकतात . आणि आर्थिक उत्पन्न मिळू शकतात .
5 ) सर्वांगीण विकास
महाराष्ट्रातील महिलांना पिंक इ रिक्षाच्या माध्यमातून पैसे कमावण्याची एक नवीन संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे . या संधीचे महाराष्ट्रातील महिलांनी जर सोने केले , या संधीचा लाभ घेतला तर त्या प्रत्येक महिलेचा विकास कोणीही थांबू शकत नाही .
Maharashtra Pink E Rickshaw Yojana चे फायदे
Maharashtra Pink E Rickshaw Yojana चे अनेक फायदे आहेत . ते फायदे पुढीप्रमाणे :
1 ) सबसिडी
Maharashtra Pink E Rickshaw Yojana हि महिलांना रोजगाराची एक नवीन संधी घेऊन आली आहे . जर महिलेने पिंक इ रिक्षा खरेदी केली तर महाराष्ट्र शासन पिंक इ रिक्षा घेण्यासाठी 20 % एवढे सबसिडी देणार आहे . तसेच 70 % एवढे बँक कर्ज देणार आहे . आणि महिलेला फक्त 10 % रक्कम भरायची आहे . आणि महिला पिंक इ रिक्षा आपल्या घरी घेऊन येणार आहे .
2 ) बँक कर्ज
पिंक इ रिक्षाच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय सुरु करू शकतात . पिंक इ रिक्षा घेण्यासाठी शासन 20 % अस्ब्सिडी देणार आहे . आणि बँक 70 % एवढे कर्ज देणार आहे . त्यामुळे महिलेला पिंक इ रिक्षा सहज घेता येणार आहे .
3 ) प्रशिक्षण
पिंक इ रिक्षा चालवण्यासाठी महाराष्ट्र शासन महिलाना प्रशिक्षण देऊ शकेल . यासाठी शासन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी हातमिळवणी करू शकते. आणि त्या माध्यमातून प्रशिक्षण देऊ शकते . आणि त्यामुळे महिलांना प्रशिक्षण मोफत मिळण्याची शक्यता आहे .
4) परवाना
महाराष्ट्र शासन पिंक इ रिक्षा चालवण्यासाठी परवाना सुलभ रीतीने उपलब्ध करून देऊ शकते . त्यामुळे महिलांना या व्यवसायात प्रवेश करणे सुकर होणार आहे .
5 ) प्रक्रिया सुलभ
Maharashtra Pink E Rickshaw Yojana अंतर्गत परवाने किंवा परवानग्या मिळवणे सुकर केले जाईल .
Pink Rickshaw Yojana Maharashtra या शहरात सध्या सुरु करण्यात आली आहे
1 ) पुणे
2 ) पिंपरी चिंचवड
3 ) नवी मुंबई
4 ) पनवेल
5 ) ठाणे
6 ) नागपूर
7 ) नाशिक
8 ) छत्रपती संभाजीनगर
9 ) मुंबई शहर
10 ) मुंबई उपनगर
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना पात्रता
Maharashtra Pink E Rickshaw Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुधिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे :
1 ) अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असावी .
2 ) अर्जदार व्यक्ती महिला असावी .
3 ) अर्जदार महिला वर नमूद केलेल्या शहरातील रहिवासी असावी .
Pink E Rickshaw Yojana Apply Online अर्जप्रक्रिया
‘ Maharashtra Pink E Rickshaw Yojana ‘ महिलांना रोजगार मिळवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे . याची अर्जप्रक्रिया आज दिनांक 14 जुलै 2024 पर्यंत सुरु करण्यात आलेली नाही . जेव्हा कधी महाराष्ट्र शासन ‘Maharashtra Pink E Rickshaw Yojana‘ या योजनेच्या अर्ज प्रक्रीयेविषयी माहिती जाहीर करेल तेव्हा आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सूचित करू .
निष्कर्ष
Maharashtra Pink E Rickshaw Yojana महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अधिक कारीगर सिद्ध होऊ शकते . पण जर या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांनी मोठ्या परमाणात घेतला तर महाराष्ट्रातील महिला बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हायला नक्की मदत होईल . आणि महिला स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील . आणि आपले कुटुंब सक्षम करण्याचा प्रयत्न करतील . त्यातून त्यांचा सामाजिक , आर्थिक आणि पर्यायाने सर्वांगीण विकास होईल .
FAQ – Maharashtra Pink E Rickshaw Yojana
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना काय आहे ?
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना हि महाराष्ट्र शासनाने नुकतीच 29 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात जाहीर केली . या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना पिंक इ रिक्षा घेताना 20 % सबसिडी महाराष्ट्र शासन देणार आहे . 70 % बँक कर्ज देईल आणि फक्त 10 % रक्कम महिलेला भरावी लागणार आहे . आणि या माध्यमातून महिलेला रोजगार उपलब्ध होणार आहे .
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना कोणी सुरु केली आहे ?
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा महाराष्ट्र शासनाने सुरु केली असून याची अंमलबजावणी महिला व बालविकास मंत्रालय अंतर्गत केली जाणार आहे .
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजनेचा काय लाभ महिलांना मिळेल ?
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजने अंतर्गत महिलांना पिंक इ रिक्षा घेत असताना 20 % सबसिडी महाराष्ट्र शासनातर्फे दिली जाईल .
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजनेच्या लाभार्थी या महाराष्ट्रातील शासनाने निर्गमित केलेल्या शहरातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजनेचा उद्देश काय आहे ?
महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजने अंतर्गत पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे .
Maharashtra Pink E Rickshaw Yojana साठी अर्जप्रक्रिया कधी सुरु होईल ?
महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन 29 जून 2024 रोजी सुरु असताना ‘Maharashtra Pink E Rickshaw Yojana‘ हि योजना जाहीर करण्यात आली . याची अर्जप्रक्रिया अजून महाराष्ट्र शासानाने जाहीर केली नाही .
महिलांना पिंक इ रिक्षा घेण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील ?
‘Maharashtra Pink E Rickshaw Yojana ‘ या योजने अंतर्गत जर महिला पिंक इ रिक्षा घेत असेल तर महिलेला 20 % सबसिडी महाराष्ट्र शासन देईल . आणि 70 % कर्ज बँक देणार आहे त्यामुळे महिलेला फक्त 10 % रक्कम भरावी लागेल .