Antarjatiya Vivah Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील जनतेसाठी शासन वेळोवेळी विविध योजना राबवते . आणि त्या माध्यमातून लोकांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करते . महिला , गरीब तसेच इतर वंचित समाजातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत . तसेच समाजातील जाती भेद दूर करण्याचा देखील शासन प्रयत्न करते . यासाठी देखील विविध योजना राबवत असते .
समाजातील जाती व्यवस्था दूर करण्यासाठी अशीच एक योजना शासनाने राबवली आहे . ‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ असे त्या योजनेचे नांव आहे . आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्या समाजातील जाती व्यवस्था दूर करण्याचा प्रयत्न केला जातो . त्यासाठी अंतर जातीय विवाह करण्याला जोडप्याला प्रोत्साहन पर आर्थिक मदत केली जाते .
‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ ही योजना काय आहे ? , या योजनेचे उद्देश काय आहेत , फायदे काय आहेत , या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असावी , अर्ज कसा करावा , कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत इत्यादी माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .
आंतरजातीय विवाह म्हणजे काय?
जेव्हा दोन वेगवेगळ्या जातीतील वधू आणि वराचा विवाह केला जातो म्हणजेच वधू किंवा वर यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती व जमाती किंवा भटक्या जमाती यामधील असेल आणि दुसरी व्यक्ती हिंदू , शीख , जैन , लिंगायत यापैकी असेल तर अशा वर आणि वधूचा विवाह आंतरजातीय विवाह मानला जातो .
अंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र काय आहे ?
‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ ही एक महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्रातील जाती भेद दूर करण्यासाठी आणलेली योजना आहे . या योजने अंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला महाराष्ट्र सरकार द्वारे रुपये 50,000 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन तर्फे प्रोत्साहन म्हणून रुपये 2.5 लाख रुपये दिले जातात . अशी संपूर्ण मिळून रुपये 3 लाख एवढी रक्कम विवाहित जोडप्याला दिली जाते . या योजनेमध्ये केंद्र सरकारचा 50 % तर राज्य सरकारचा 50 % एवढा वाटा आहे .
Antarjatiya Vivah Yojana In Marathi
योजनेचे नांव | आंतरजातीय विवाह योजना |
योजनेची सुरुवात | सन 1959 |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
कोणत्या विभागा अंतर्गत | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण | हिंदू , जैन , लिंगायत , शीख आणि अनुसूचित जाती व जमाती तसेच भटक्या जमाती |
काय लाभ मिळेल ? | रुपये 3 लाख |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
आंतरजातीय विवाह योजनेची उद्दिष्टे
अंतरजातीय विवाह योजना हि महाराष्ट्रातील जातीभेद मिटवण्यासाठी बनवलेली एक अमृत योजना आहे . या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे :
1 ) जातीभेद निर्मुलन
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra या योजने अंतर्गत जाती भेदाचे निर्मुलन करणे हा या योजनेचा उद्देश आहे .
2 ) चुकीचे समज दूर करणे
सदर योजना राबवून समाजातील आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे . आणि त्याच्या माध्यमातून समाजातील आंतरजातीय विवाहा बद्दलचे चुकीचे समाज दूर करणे .
3 ) समाजात एकोपा प्रस्थापित करणे
जातीय व्यवस्था नष्ट करून समाजात एकता प्रस्थापित करणे हा या योजनेचा उद्देश आहे .
4 ) आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे
सदर योजनेच्या माध्यमातून जोडप्याला आर्थिक मदत करून आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन देणे .
5 ) समाज कल्याण
या योजनेच्या माध्यमातून समाजातील जातीय व्यवस्था दूर करणे आणि त्यातून समाजाचे कल्याण साधने .
6 ) 3 लाख आर्थिक लाभ
जोडप्याला 3 लाख आर्थिक लाभ देऊन त्यांना त्यांचे जीवन जगण्यासाठी आधार देणे .
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra फायदे
‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ या योजनेचे अनेक फायदे आहेत . ते फायदे पुढील प्रमाणे :
1 ) जातीय भेदभाव कमी होतो
आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजातील जातींमधील भेदभाव कमी होण्यास मदत होईल .
2 ) 3 लाख आर्थिक लाभ
आंतरजातीय विवाह केला तर जोडप्याला रुपये 3 लाखांचा आर्थिक लाभ देण्यात येतो .
3 ) योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट नाही
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची कोणतीही अट नाही . म्हणजे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कितीही असुद्या तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल .
4 ) लाभाची रक्कम DBT द्वारे बँकेत जमा
लाभाची रक्कम direct benefit transfer ( DBT ) द्वारे खात्यात जमा होते .
5 ) अर्ज प्रक्रिया सोपी
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे . तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज भरू शकता .
6 ) राहणीमानाचा दर्जा उंचावतो
सदर योजने अंतर्गत रुपये 3 लाख मिळत असल्यामुळे जोडप्याच्या रहाणीमानाचा दर्जा उंचावला जातो .
7 ) स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो
योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून जोडपे एखादा व्यवसाय सुरू करू शकते .
8 ) रोजगार निर्मिती
या योजनेच्या माध्यमातून जी रक्कम मिळते त्यातून जोडप्याने व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसायातून रोजगार निर्मितीला चालना मिळते .
आंतरजातीय विवाह योजने अंतर्गत अर्ज करण्यास पात्र असणार्या व्यक्ती
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra या योजने अंतर्गत पुढील व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहेत :
अनुसूचित जमाती |
अनुसूचित जाती |
भटक्या जमाती |
विमुक्त जाती |
विशेष मागास प्रवर्ग |
आंतरजातीय विवाह योजना पात्रता
महाराष्ट्र शासनाकडून ‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ ही योजना राबवली जाते . या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुढील पात्रता धारण करणे आवश्यक आहे :
1 ) महाराष्ट्राचा रहिवासी असलेला व्यक्तीच या योजनेसाठी पात्र आहे .
2 ) नवरा आणि नवरी यापैकी एकजण हा अनुसूचित जाती जमाती , भटक्या जमाती मधील असावा .
3 ) ‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला लग्न झाल्यापासून 3 वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे .
4 ) जोडप्याचा विवाह विशेष विवाह अधिनियम 1954 किंवा हिंदू विवाह अधिनियम 1955 अंतर्गत होणे आवश्यक आहे .
5 ) लग्न करते वेळी नवर्याचे वय 21 आणि नवरीचे वय 18 असणे आवश्यक आहे .
6 ) जोडप्याने कोर्टात लग्न करणे गरजेचे आहे .
7 ) आंतरजातीय विवाह संबंधित केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा अर्जदाराने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा .
8 ) ज्या व्यक्तींनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले आहे अशा व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत .
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे :
आवश्यक कागदपत्रे |
1 ) आधारकार्ड |
2 ) वधू आणि वराचा जातीचा दाखला |
3 ) कोर्टात लग्न केल्याचे प्रमाणपत्र |
4 ) वर आणि वधू यांच्या एकत्रित बँक खाते असलेल्या बँकेच्या खात्याचे पासबुक |
5 ) शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला |
6 ) 2 कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र |
7 ) एक लग्नाचा फोटो आणि वर आवी वधू यांचे पासपोर्ट साईज फोटो |
8 ) अर्जदाराचा मोबाईल नंबर |
अंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra अंतर्गत ऑफलाईन अर्ज करता येतो . यासाठी पुढील प्रक्रिया पार पाडावी लागते :
1 ) सर्वात प्रथम आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण ऑफिसमध्ये ( सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग ) जा .
2 ) या कार्यालयात गेल्यावर तिथे आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज मागा .
3 ) अर्ज घेतल्यावर तो पूर्ण भरा . आणि त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा .
4 ) आता तो अर्ज तेथील आंतरजातीय विवाह योजना संबंधित अधिकारी ( जिल्हा समाज कल्याण अधिकारी ) यांच्याकडे जमा करा .
Antarjatiya Vivah Yojana Maharashtra Online Form
आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता . त्यासाठी पुढील पायर्यांचा वापर करता येईल .
1 ) सर्वात प्रथम आंतरजातीय विवाह योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला लॉगिन करावे लागेल .
2 ) आता तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर याल .
3 ) होमपेजवर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजना या बटनावर क्लिक करायचे आहे .
4 ) आता इथे तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा आहे आणि सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडायची आहेत .
5 ) आता तुमचा अर्ज सबमिट करा .
आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
1 ) जर अर्जदाराने या योजनेच्या अटींची पूर्तता केली नसेल तर त्याचा अर्ज रद्द होऊ शकतो .
2 ) जर अर्जात माहिती चुकीची किंवा खोटी दिली असेल तर त्याचा अर्ज रद्द होऊ शकतो .
3 ) जर अर्जासोबत योग्य कागदपत्रे जोडली नसतील तर अर्ज रद्द होऊ शकतो .
4 ) जर अर्ज योग्य कालावधीत भरला नसेल तर तो अर्ज रद्द होऊ शकतो .
5 ) जर अर्जासोबत खोटी कागदपत्रे जोडली असतील तर अर्ज रद्द होईल .
6 ) अर्ज करणार्या व्यक्तीचे लग्नच झालेले नसेल तर त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो .
7 ) जर दोन्ही जोडीदार घटस्फोट घेण्याच्या प्रोसेस मध्ये असतील तर त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो .
8 ) जर जोडपे एकमेकांपासून वेगळे राहत असेल तर त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो .
9 ) जोडप्यांपैकी कुणीही भारताचे नागरिक नसतील तर त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो .
10 ) जर जोडप्याच्या विवाहाची नोंद केलेली नसेल तर त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो .
11 ) शासनाजावळचा निधी संपला असेल किंवा योजना बंद झाली असेल तर अर्ज रद्द होऊ शकतो .
निष्कर्ष
महाराष्ट्र सरकारची ‘ Antarjatiya Vivah Yojana Maharashtra ‘ ही अतिशय कल्याणकारी योजना आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्याला शासना कडून रुपये 3 लाखांची प्रोत्साहन पर रक्कम देण्यात येणार आहे . आणि त्या माध्यमातून ते जोडपे आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकते . आणि आपले जीवन जगू शकते . या योजनेच्या माध्यमातून समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी देखील मदत होणार आहे . त्यामुळे पात्र असणार्या व्यक्तींनी या योजनेचा लाभ जरूर घावा .
आम्ही आशा करतो कि हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल . तुमचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी ज्यांना या योजनेची गरज आहे अशा लोकांना हा लेख शेअर करा .आणि सदर योजने बाबत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट करून विचारू शकता . आणि अशीच माहिती रोज पाहण्यासाठी mahajobyojana.in ला रोज व्हिजीट करा .