Ssc Mts Recruitment 2024
Ssc Mts Recruitment 2024 : कर्मचारी चयन आयोग , भारत सरकार अंतर्गत भरतीची सुचना जारी करण्यात आली आहे . या आयोगाच्या अंतर्गत 8326 पदांची भरती करण्यात येत आहे . या भरतीसाठीची सर्व अर्जप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे . मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांची भरती करण्याची अधिसूचना कर्मचारी चायन आयोगाने काढली आहे . सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे .
जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत आणि इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज 31 जुलै 2024 च्या आत लवकरात लवकर भरून घावे . यासाठी लागणारी सर्व माहिती या लेखात देण्यात आली आहे . पदभरती कोण करणार आहे , पदसंख्या किती आहे , एकूण पदे किती आहेत , कोणकोणती पदे या भरतीत भरण्यात येणार आहेत , यासाठी अर्ज कसा करायचा आहे , अर्जप्रक्रिया कधीपासून सुरु होईल , तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत किती असेल इत्यादी सर्व माहिती या लेखात देण्यात आलेली आहे .तरी उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . तसेच सोबत दिलेली PDF पहावी . आणि मगच आपला अर्ज भरावा .
ssc mts recruitment 2024 vacancy
Staff Selection Commission has currently announced the recruitment of ‘ Multi Tasking Staff and hawaldar ‘. There are 8326 vacancies in this recruitment . Those candidate’s which are eligible for these post can apply online . The last date for applying for these post is 31 july 2024. the candide’s which are eligible and interested for these post can apply . For more information like total post , post types , who is recruiting posts , how can we apply for these vacancies , the date of starting applications , the last date of appling for these posts is given in the PDF .
Staff selection commission
ssc mts recruitment 2024 notification
एकूण पदे | 8326 |
पदांची नावे | 1 ) मल्टी टास्किंग स्टाफ 2 ) हवालदार |
पदे कोण भरत आहे ? | स्टाफ सिलेक्शन कमिशन , भारत सरकार . |
अर्ज कसा करावा ? | ऑनलाईन |
अर्जप्रक्रिया कधी सुरु होईल ? | 27 जून 2024 |
अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत काय असेल ? | 31 जुलै 2024 |
वय मर्यादा काय असेल ? | 18 ते 25 वर्षे |
नोकरी ठिकाण | मुंबई |
Ssc Mts Recruitment 2024 Vacancy
पदाचे नांव | पदांची संख्या |
मल्टी टास्किंग स्टाफ | 4887 |
हवालदार | 3439 |
आरक्षण
Ssc Mts Recruitment 2024 या भरतीमध्ये उमेदवार आरक्षण पद्धतीने भरण्यात येणार आहेत . यामध्ये SC , ST , OBC, EWS , EMS ,PwBD इत्यादी कॅटेगरी मधल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार आरक्षण देण्यात येणार आहे . यामध्ये पदसंख्या कमी जास्त होऊ शकतात . स्टाफ सिलेक्शन कमिशनचा यामध्ये कोणताही रोल नाही . याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
नागरिकता
या भरतीमध्ये भाग घेणारा उमेदवार हा भारत , नेपाल , भूतान या नागरीकातेचा असावा . तसेच जे उमेदवार मुलाचे भारतीय असून पाकिस्तान , श्रीलंका , बर्मा , मालावी , झाम्बिया , टांझानिया येथून स्थलांतरित होऊन येऊन भारतात कायमस्वरूपी वास्तव्यास आले असतील तरी ते उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील .
Ssc Mts Recruitment 2024 Age Limit
मल्टी टास्किंग स्टाफ : ज्या उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1999 ते 1 ऑगस्ट 2006 दरम्यान झाला आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत . म्हणजेच उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे या दरम्यान असेल ते उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील .
हवालदार : हवालदार या पदासाठी ज्या उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1997 ते 1 ऑगस्ट 2006 या दरम्यान झाला असेल ते उमेदवार या पदासाठी पात्र असतील . म्हणजेच उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे या दरम्यान असावे .
वयामधील सुट
श्रेणी | Ex – Serviceman | SC /ST | OBC | PwBD | Widows / Divourced |
वयोमर्यादेतील सूट | 3 वर्षे | 5 वर्षे | 3 वर्षे | 10 ते 15 वर्षे | 35 ते 40 वर्षे |
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी पास केलेली असावी .
अर्जाची फी
1 ) सदर भरतीसाठीची अर्जप्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन करायची असून यासाठी रुपये 100 एवढी फी आकारण्यात येईल .
2 ) SC , ST , OBC , WOMEN , PwBD , Ex – Serviceman यांना या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नसेल .
3 ) अर्ज फी हि ऑनलाईन भरायची आहे . यासाठी पेमेंट मोड हा BHIM UPI , RUPAY DEBIT CARD , NET BANKING इत्यादी द्वारे उमेदवार आपली फी भरू शकतात .
4 ) 1 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवार त्यांची फी ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे भरू शकतात .
5 ) एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
अर्जातील दुरुस्ती
उमेदवारांना आपल्या अर्जात काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची सोय करून देण्यात आली आहे . यासाठी उमेदवार आपले अर्ज 16 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 या काळात दुरुस्त करू शकतात . म्हणजेच उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या 2 दिवसात दुरुस्त करणे गरजेचे आहे .
अर्जामध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यासाठी रुपये 200 एवढी फी घेतली जाईल . तर जर उमेदवाराला आपल्या अर्जात दुसऱ्या वेळेस जर दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी रुपये 500 एवढी फी आकारण्यात येईल .
शारीरिक क्षमता हवालदार पदासाठी
पुरुष : पुरुषांची उंची कमीत कमी 157 .5 CM असावी तर छाती न फुगवता 81 CM आणि फुगवल्यानंतर 5 CM ने त्यात वाढ व्हावी .
महिला : महिलांची उंची 152 CM कमीत कमी असावी तर महिलांचे वजन कमीत कमी 48 KG असावे .
आवश्यक कागदपत्रे
1 ) उमेदवाराचे Pancard .
2 ) उमेदवाराचे आधारकार्ड .
3 ) मतदान कार्ड .
4 ) उमेदवाराचा वाहन परवाना .
5 ) शाळा , कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी कडून मिळालेले ओळखपत्र .
6 ) संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेले Ex – Serviceman ला मिळालेले discharge Book .
मुलाखत
परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल . आणि अंतिम यादी हि मुलाखती नंतर लावण्यात येईल .
Ssc Mts Recruitment 2024 Salary
उमेदवारांना पगार हा शासनाच्या नियमानुसार सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात येणार आहे .
परीक्षा
सदर पदांच्या भरतीसाठी एक computer based Test ( CBT ) घेण्यात येईल . यासाठी 45 – 45 मिनिटांच्या 2 सेशन मध्ये परीक्षा घेण्यात येईल .
Session – 1 : हा Session 45 मिनिटांचा असेल ज्यात 2 पेपर घेतले जातील . प्रत्येक पेपर 60 मार्कांचा असेल . आणि प्रत्येकी 20 प्रश्न विचारले जातील . यामध्ये numerical and Mathematical ability आणि Reasoning ability and Problem solving याचे 2 पेपर घेण्यात येतील .
Session – 2 : दुसऱ्या Session मध्ये देखील 45 मिनिटांमध्ये 2 पेपर घेण्यात येतील . तसेच प्रत्येक पेपर हा 60 मार्कांचा असेल . आणि त्यासाठी प्रत्येकी 20 प्रश्न विचारण्यात येतील . English Language and comprehension आणि General awareness असे 2 पेपर घेण्यात येतील .
Ssc Mts Recruitment 2024 Syllabus
1 ) संख्यात्मक आणि गणितीय क्षमता : या पेपरमध्ये उमेदवाराची गणितीय तसेच संख्यात्मक क्षमता तपासण्यात येईल . काम – काल – वेग , व्यस्त प्रमाण , नफा – तोटा ,अपूर्णांक , समस्या सोडवणे इत्यादी ज्ञान तपासले जाईल .
2 ) तार्किक क्षमता आणि समस्या सोडवणे : यामध्ये उमेदवाराची तर्क करण्याची क्षमता तसेच एखादी समस्या उमेदवार कशा पद्धतीने सोडू शकतो याची चाचणी केली जाते . कोडींग – डिकोडिंग , दिशा , समानता , वेगळेपणा इत्यादी वर चाचणी घेतली जाते .
3) सामान्य जाणीव / जागरूकता : इतिहास , भूगोल , नागरिकशास्त्र , अर्थशास्त्र , कला आणि संस्कृती , पर्यावरण अभ्यास यावर हा परपार घेतला जाईल .
4 ) इंग्रजी भाषा आणि आकलन : उमेदवाराला इंग्रजी भाषेचे किती ज्ञान आहे तसेच त्याची आकलन क्षमता कशी आहे हे या पेपरमध्ये तपासले जाईल .
Ssc Mts Recruitment 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
1) सर्वात प्रथम उमेदवाराने कर्मचारी चयन आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे . ( अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिली आहे .)
2 ) अधिकृत वेबसाईटवर लॉगिन केल्यावर तुम्ही वेबसाईटच्या मुखपृष्ठावर याल .
3 ) आता इथे तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित रीत्या भरून घ्यायचा आहे . सर्व माहिती अचूक आणि खरी असावी याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
4 ) संपूर्ण अचूक माहिती भरल्यावर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे भरायची आहेत .
5 ) जर उमेदवाराने कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची भरली असेल तर तो उमेदवार या भरतीमध्ये अपात्र ठरेल . याची उमेदवाराने नोंद घ्यावी .
6 ) माहिती भरलेला अर्ज ‘ SUBMIT ‘ करायचा आहे .
7 ) उमेदवाराने आपले अर्ज 31 जुलै 2024 पूर्वी भरायचे आहेत . या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही .
Ssc Mts Recruitment 2024 Apply Online Date
उमेदवारांनी आपला अर्ज 31 जुलै 2024 पूर्वी भरायचा आहे . यासाठी खाली Ssc Mts Recruitment 2024 ची अधिकृत वेबसाईट , नोटीफिकेशन PDF आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे . याचा वापर उमेदवार करू शकतात .
ssc mts recruitment 2024 notification pdf
ssc mts recruitment 2024 apply online link
Ssc Mts Recruitment 2024 Website
मित्रांनो , आजच्या लेखात Ssc Mts Recruitment 2024 ची माहिती सविस्तरपणे दिली आहे . दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा तसेच सोबत दिलेली PDF देखील वाचा आणि माहितीची खातरजमा करून अर्ज भरा . तसेच सदर भरती विषयी तुम्हाला काही शंका असतील तरी कमेंट करून सांगा . हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रीणीना शेअर करा . आणि अशीच माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमचा whatsapp Group जॉईन करा .