Magel Tyala Vihir Yojana : नमस्कार मंडळी , आजच्या लेखात आपण ‘ मागेल त्याला विहीर योजना ‘ विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहे . अख्ख्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संपूर्ण जगासाठी राबत असतो . शेतामध्ये त्याला बरीच कामे करावी लागतात . नांगरी , पेरणी , सिंचन , भांगलनी , कीटक नाशक फवारणी , कापणी , मळणी इत्यादी कामे त्याला करावी लागतात .
शेतीतील कामे करत असताना देखील विविध अडचणींचा सामना त्याला करावा लागतो . शेतकऱ्याला शेती अवजारे घेणे परवडत नाही , शेती जर पावसावर अवलंबून असेल तर शेती करणे अवघड होऊन बसते . तसेच पैशाच्या अभावी बियाणे , खते देखील घेता येत नाही . पाऊस नसेल तर शेतीला पाणी मिळत नाही . पावसाअभावी शेती करणे अवघड होऊन बसते .
शेतीला सिंचनाची पर्यायी व्यवस्था म्हणून विहीर , तळे , पाटबंदारे , नदी इत्यादी स्त्रोत वापरले जातात . पण जर जमीन कोरडवाहू असेल तर हे पर्यायही वापरता येत नाहीत . कारण विहीर , तळे इत्यादी खोदण्यासाठी खूप पैसा लागतो . आणि शेतकरी राजाकडे पैसे उपलब्ध नसतात . त्यामुळे शेती करणे अवघड होते .
दुष्काळ हि एक खूप मोठी समस्या शेतकरी राजाला सतावत असते . यामुळे शेतकरी एकदम हताश होऊन जातो . पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही . कमी पाण्यामुळे शेतीचे उत्पन्न घटते . या शेतकऱ्याच्या सर्व समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने Magel Tyala Vihir Yojana सुरु केली आहे . या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतात विहीर खोदू शकतो .यासाठी शासन त्या शेतकऱ्याला 4 लाखांपर्यंत अनुदान देईल .
Magel Tyala Vihir Yojana चा लाभ कसा घेता येईल , नेमकी हि योजना आहे तरी काय ? , पात्रता काय आहे , लाभार्थी कोण , फायदे काय होतील , योजना सुरु करण्यामागे उद्देश काय आहे ? , अर्ज कसा करावा ? इत्यादी सर्व माहिती आम्ही आज या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत . सर्व माहिती सविस्तर समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचत रहा .
मागेल त्याला विहीर योजना काय आहे ?
पाण्याची कमतरता , सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा त्यातच दुष्काळ अशा भीषण परिस्थितीचा सामना महाराष्ट्रातील ज्या भागातील शेतकऱ्यांना करावा लागतो . अशा शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी सदर योजनेच्या माध्यमातून 4 लाखांपर्यंत मदत केली जाते .
अपुऱ्या जलसिंचन सुविधांमुळे शेतकऱ्याचे शेतीतील उत्पन्न घटते . पाण्याचा एक चांगला स्त्रोत असेल तर शेतीतील उत्पन्नात वाढ होऊ शकते .महाराष्ट्र शासनाने Magel Tyala Vihir Yojana हि योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे . या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी विहीर खोदून आपल्या शेतीतील उत्पन्न वाढू शकतो .
Magel Tyala Vihir Yojana In Short
योजनेचे नांव | मागेल त्याला विहीर योजना |
योजना कधी सुरु झाली | सन 2015 |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण असेल ? | महाराष्ट्रातील शेतकरी |
काय लाभ मिळेल ? | 4 लाखांपर्यंत अनुदान |
पात्रता | 0.6 हेक्टर पेक्षा कमी जमीन |
अर्जप्रक्रिया | ऑनलाईन / ऑफलाईन |
Magel Tyala Vihir Yojana उद्दिष्टे
Magel Tyala Vihir Yojana अंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखांपर्यंत अनुदान देणार आहे . यामुळे शेतकऱ्याला कमी पर्जन्य , दुष्काळ सारख्या परिस्थितीवर मात करता येईल . आणि त्यामुळे शेतकऱ्याचे शेतीतील उत्पादन वाढेल . असेच उद्दिष्ट समोर ठेऊन शासनाने सदर योजना काढली आहे . याशिवाय या योजनेची विविध उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :
1 ) शेती उत्पादनात वाढ
Magel Tyala Vihir Yojana अंतर्गत शेतकऱ्याला 4 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे . त्यामुळे शेतकरी विहीर काढून त्या पाण्याचा वापर करून शेती करेल . आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होईल .
2 ) पाण्याची उपलब्धता
विहीर खोदल्यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी तसेच वैयक्तिक वापरासाठी पाणी उपलब्ध होईल . आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढेल . आणि पाणी वापरासाठी वणवण फिरावे लागणार नाही .
3 ) रोजगार निर्मिती
शेतीमध्ये पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीमध्ये विविध पिके घेता येतात . त्यामुळे शेतकऱ्याला शेतीत रोजगार उपलब्ध होतो . त्यामुळे शेतकरी दुसऱ्याला रोजगार पुरवू शकतो . म्हणजेच रोजगारात वाढ होते .
4 ) शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास
Magel Tyala Vihir Yojana च्या माध्यमातून शेतकऱ्याला विहीर अनुदान मिळते . त्यातून तो विहीर बंधू शकतो . त्यातून त्याचे शेती उत्पादन वाढेल . पर्यायाने त्याच्याकडे पैसे येतील . यातून त्याचा आर्थिक , सामाजिक विकास होईल . आणि पर्यायाने त्याचा सर्वांगीण विकास होईल .
Magel Tyala Vihir Yojana फायदे
Magel Tyala Vihir Yojana अंतर्गत शेतकऱ्याला या योजनेचे अनेक फायदे आहेत . ते फायदे पुढीप्रमाणे :
1 ) विहीर बांधणी अनुदान
Magel Tyala Vihir Yojana अंतर्गत शासनाकडून शेतकऱ्याला विहीर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते . त्यामुळे शेतकऱ्याला विहीर बांधणीत अडचण येत नाही .
2 ) रोजगार निर्मिती
विहीर बांधताना मजूर लागतात . त्यामुळे मजुरांना रोजगार पुरवठा होतो . तसेच शेतीला पाणी मिळाल्यामुळे शेतीत विविध कामांसाठी मजूर लागतात . यातून त्या मजुरांना देखील रोजगार पुरवठा होतो .
3 ) आर्थिक विकास
शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पादन मिळू लागल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होईल . आणि शेतकरी राजा सुखी होईल .
4 ) टिकाऊ पाण्याचा स्त्रोत
एकाच ठिकाणी आणि निश्चित पाणी मिळू लागल्यामुळे शेतकऱ्याला पाण्याचा एक टिकाऊ स्त्रोत मिळेल . त्यामुळे शेतकऱ्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही .
5 ) उत्पादनात वाढ
शेतीमध्ये टिकाऊ पाण्याचा स्त्रोत मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीच्या उत्पादनात वाढ होते . पर्यायी त्याचा आर्थिक विकास होतो .
Magel Tyala Vihir Yojana पात्रता
Magel Tyala Vihir Yojana साठी काही पात्रता आणि निकष आहेत . ते पूर्ण करणारा शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतो . या योजनेचे पात्रता आणि निकष पुढीलप्रमाणे :
1 ) अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची कमीत कमी 0.6 हेक्टर एवढी जमीन असावी . जास्तीत जास्त कितीही जमीन असली तरी चालेल . जर शेतकऱ्याकडे कमी जमीन असेल तर शेजारील 2 ते 3 शेतकरी या योजनेचा सामुदायिक रीत्या लाभ घेऊ शकतील . 2-3 शेतकरी एकत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतील .
2 ) जो अर्जदार शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहे तो या योजनेसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असला पाहिजे .
3 ) अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी सामुदायिक शेतातळे , शेततळे , भात खाचरे अथवा विहीर यासाठी शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
Magel Tyala Vihir Yojana आवश्यक कागदपत्रे
Magel Tyala Vihir Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्जप्रक्रिया करावी लागते . अर्ज भरताना काही कागदपत्रे असणे गरजेचे असते ती पुढीलप्रमाणे :
1 ) विहीर सामुदायिक बांधायची असेल तर सर्व मालकांचे संमती पत्र आवश्यक आहे .
2 ) अर्जदाराचे आधारकार्ड .
3 ) कृषी अधिकारी किंवा तलाठी यांचेकडून घेतलेले विहीर तांत्रिक स्वीकृती पत्र .
4 ) उत्पन्नाचा दाखला .
5 ) जातीचा दाखला .
6 ) बँक खात्याचे पासबुक .
7 ) शेतकऱ्याच्या जमिनीचा नकाशा .
8 ) जमिनीचा 7 / 12 उतारा .
9 ) जमिनीचा 8 ( अ ) उतारा .
10 ) बंधपत्र .
Magel Tyala Vihir Yojana Online Application
Magel Tyala Vihir Yojana चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया करणे गरजेचे आहे . ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील पायऱ्याचा वापर करा :
1 ) Magel Tyala Vihir Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करा.
2 ) आता या ठिकाणी तुम्हाला Magel Tyala Vihir Yojana या योजनेचा फॉर्म मिळेल . तो फॉर्म डाउनलोड करा .
3 ) आता हा फॉर्म भरून घ्या . आणि त्याला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून घ्या.
4 ) त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे स्कॅन करा .
5 ) आता अर्जदाराने पुन्हा ‘ आपले सरकार ‘ या वेबसाईटला भेट द्यावी .
6 ) ‘ Magel Tyala Vihir Yojana ‘ हा पर्याय निवडा . आणि या वेबसाईटवर आपल्या खात्यासाठी नोंदणी करा .
7 ) आपला अर्ज आणि स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा .
8 ) आता या अर्जाची पोचपावती तुम्हाला मिळेल . ती डाउनलोड करा .आणि जपून ठेवा.
Magel Tyala Vihir Yojana साठी ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
Magel Tyala Vihir Yojana शेतकऱ्यासाठी वरदान आहे . यासाठी ऑफलाईन अर्ज देखील करता येतो .
1 ) सर्वात प्रथम तुमच्या जवळ असलेल्या कृषी कार्यालयात जा .
2 ) इथे तुम्हाला ‘ Magel Tyala Vihir Yojana ‘ अर्ज मिळेल तो घ्या . आणि तो अचूकपणे भरून घ्या .
3 ) या अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा .
4 ) अर्ज भरण्यासाठी असलेले शुल्क भरा .
5 ) आता तुमचा भरलेला अर्ज कृषी अधिकाऱ्याकडे जमा करा .
अर्ज अस्वीकार होण्याची कारणे
Magel Tyala Vihir Yojana अर्ज रद्द होण्याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात :
1 ) जर एखाद्या शेतकऱ्याने योजनेच्या अटी पूर्ण केलेल्या नसतील तर असा अर्ज अस्वीकार होऊ शकतो .
2 ) जर अर्जदाराने अर्जामध्ये चुकीची माहिती भरली असेल तरी त्याचा अर्ज अस्वीकार होऊ शकतो .
3 ) जर काही कारणास्तव योजनेसाठी निधी उपलब्ध नसेल तर त्या शेतकर्याचा अर्ज अस्वीकार होऊ शकतो .
4 ) जर अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे सादर केली नसतील तर त्याचा अर्ज अस्वीकार होऊ शकतो .
5 ) जर विहीर खोदण्यासाठी जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसेल तर त्या शेतकऱ्याचा अर्ज अस्वीकार केला जाऊ शकतो .
6 ) शेतकऱ्याकडे कमीत कमी जमीन मालकी नसेल तरी त्या शेतकऱ्याचा अर्ज अस्वीकार होऊ शकतो .
7 ) जर पूर्वी शेतकऱ्याने विहीर किंवा शेततळ्यासाठी अनुदान घेतले असेल तर त्या शेतकऱ्याचा अर्ज अस्वीकार होऊ शकतो .
Vihir Yojana अर्ज अस्वीकार केल्यावर काय कराल ?
जर एखाद्या शेतकऱ्याचा अर्ज अस्वीकार झाला तर सर्वात प्रथम अर्ज रद्द का झाला याचे कारण शोधून काढा . आता फॉर्म मध्ये सुधारणा करा . आणि पुन्हा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता .
निष्कर्ष
‘ Magel Tyala Vihir Yojana ‘ शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे . कारण या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे . आणि त्यामुळे शेतकर्याला त्याच्या शेतीला सिंचन करणे शक्य होणार आहे . आणि परिणामी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढून त्याची आर्थिक उन्नती होईल . त्यामुळे महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा .
मित्रांनो , तुम्हाला हा लेख आवडला असेल तर या योजनेचा लाभ घ्या . आणि हा लेख गरजूंपर्यंत पोचवा . आणि तुमच्या मनात या योजनेविषयी काही शंका असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा . आणि अशीच माहिती रोज मिळवण्यासाठी mahajobyojana.in ला भेट द्या .