Shravan Bal Yojana : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शासन नेहमी नवीन नवीन योजना आणत असते . या योजना विद्यार्थी , महिला , शेतकरी , अपंग , अनाथ , जेष्ठ नागरिक इत्यादी लोकांसाठी या योजना राबवल्या जातात . आणि त्या माध्यमातून लोकांचे कल्याण केले जाते . आज आपण अशाच एका नवीन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत . त्या योजनेचे नाव ‘ श्रावण बाळ निराधार योजना ‘ आहे . महाराष्ट्र राज्यात वृध्द आणि निराधार लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत . त्यापैकीच एक श्रावण बाळ निराधार योजना आहे .
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून Shravan Bal Yojana सुरू करण्यात आली आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्याही पेक्षा जास्त आहे . अशा जेष्ठ नागरिकांना राज्य सरकार मार्फत ‘ श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना ‘ अंतर्गत दर महिन्याला निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे . आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील निराधार जेष्ठ नागरीकांना मानाने जगता यावे यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे .
महाराष्ट्रातील निराधार जेष्ठ नागरिकांना आपल्या वृद्धापकाळात सन्मानाने आणि कुणावरही अवलंबून राहून जगावे लागू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे . याच योजनेच्या माध्यमातून आज आपण आज श्रावण बाळ योजना काय आहे , योजनेची उद्दिष्टे , फायदे , पात्रता , अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे , अर्ज कसा करावा इत्यादी माहिती आपण आज सविस्तरपणे या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत .
श्रावण बाळ योजना काय आहे
Shravan Bal Yojana ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजने अंतर्गत 65 वर्षांवरील निराधार जेष्ठ नागरिकांना दरमहा 1,500 आर्थिक मदत केली जाणार आहे . त्यामुळे जेष्ठ नागरिकांना आपल्या वृद्धापकाळात कुणावरही अवलंबून रहायची गरज राहणार नाही . आणि त्यांना आपला खर्च स्वत: भागवता येईल . तसेच आपले जीवन आनंदाने जगता येईल .
Shravan Bal Yojana Maharashtra : श्रावण बाळ योजना माहिती
योजनेचे संपूर्ण नाव | श्रावण बाळ योजना |
योजना कोणी सुरु केली ? | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण ? | महाराष्ट्र राज्यातील गरीब घरातील 65 वर्षांवरील वृध्द नागरिक |
लाभ काय मिळेल ? | दरमहा रुपये 1,500/- निवृत्ती वेतन |
योजनेचा उद्देश | गरीब घरातील वृद्धांना दरमहा निवृत्ती वेतन देणे . |
अर्ज कसा करावा ? | ऑनलाईन / ऑफलाईन |
श्रावण बाळ योजना अनुदान
‘ श्रावण बाळ निराधार योजना ‘ या योजने अंतर्गत 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक कि जे निराधार आहेत . अशा जेष्ठ नागरिकांना दरमहा रुपये 1500 इतकी आर्थिक मदत केली जाते .
60 वर्षावरील पेन्शन योजना
महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या योजनांपैकी ‘ श्रावण बाळ निराधार योजना ‘ ही एक योजना आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांच्या वरील जे निराधार नागरिक आहेत . त्यांना या योजने अंतर्गत दरमहा रुपये 1500 आर्थिक मदत केली जाते . ज्यामुळे या जेष्ठ नागरिकांना त्यांचे आयुष्य जगणे आणि आपल्या आयुष्याचा आनंद घेणे सोपे होईल .
श्रावण बाळ निराधार योजनेची उद्दिष्टे
Shravan Bal Yojana या योजनेची उद्दिष्टे आपणास पुढीलप्रमाणे सांगता येतील :
1 ) गरीब घरातील 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे .
2 ) महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे .
3 ) जेष्ठ नागरिकांचा आर्थिक विकास करणे .
4 ) आर्थिक स्वातंत्र्य देऊन जेष्ठ नागरिकांचा सामाजिक विकास घडवून आणणे .
5 ) जेष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे .
6 ) महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवणे .
7 ) सदर योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे .
8 ) Shravan Bal Yojana या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देणे .
श्रवण बाळ निराधार योजनेचे फायदे
Shravan Bal Yojana या योजनेचे खूप सगळे फायदे आहेत . ते फायदे पुढीलप्रमाणे :
1 ) जेष्ठ नागरिकांना सन्मानाचे जीवन या योजनेच्या माध्यमातून जगता येते .
2 ) अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे . त्यामुळे या योजनेचा अर्ज कुणीही भरू शकतो .
3 ) दरमहा रुपये 1,500 निवृत्ती वेतन निराधार जेष्ठ नागरिकांना दिले जाते .
4 ) या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना आत्मनिर्भरता प्राप्त होते .
5 ) स्वावलंबन जपणे या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना सोपे होणार आहे .
6 ) निराधार जेष्ठ नागरिकांना जीवन जगणे सोपे होणार असल्यामुळे ही योजना खूप महत्वाची आहे .
7 ) जेष्ठ नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास या योजनेच्या माध्यमातून होतो . त्यामुळे या योजनेला विशेष महत्व आहे .
श्रावण बाळ निराधार योजना पात्रता
Shravan Bal Yojana या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराला काही अटींची पूर्तता करावी लागते . त्या अटी पुढीलप्रमाणे :
1 ) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
2 ) जे अर्जदार महाराष्ट्राच्या बाहेर राहतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
3 ) अर्जदाराचे वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त असावे .
4 ) रुपये 21,000/- पेक्षा अर्जदार कुटुंबाचे उत्पन्न जास्त नसावे .
5 ) अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये नोकरीला नसावी .
6 ) ज्या व्यक्तीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे ती व्यक्ती किमान 15 वर्षे तरी महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी .
7 ) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे .
8 ) या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी अपत्य संख्येची कोणतीही अट नाही .
श्रावण बाळ योजना कागदपत्रे
Shravan Bal Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जादाराजवळ खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे .
1 ) मतदान कार्ड
2 ) आधार कार्ड
3 ) पॅन कार्ड
4 ) अर्जदाराचे रेशन कार्ड
5 ) अर्जदाराचे जेष्ठ नागरिक कार्ड
6 ) अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
7 ) अर्जदाराच्या जन्माचे प्रमाणपत्र
8 ) अर्जदाराच उत्पान्नाचे प्रमाणपत्र
9 ) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
10 ) अर्जदाराचा मोबाईल नंबर
श्रावण बाळ योजना फॉर्म
‘ Shravan Bal Yojana ‘ या योजनेचा अर्ज आपणास 2 प्रकारे भरता येतो . हा अर्ज तुम्ही खाली दिलेल्या दोन्ही पद्धतीने भरू शकता :
श्रावण बाळ योजना ऑफलाईन अर्ज कसा भरावा ?
1 ) ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालय / तहसील कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागेल .
2 ) तिथे गेल्यावर तिथून ‘ Shravan Bal Yojana ‘ योजनेचा अर्ज घ्या .
3 ) आता तो अर्ज व्यवस्थित न चुकता भरायचा आहे . आणि सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत .
4 ) आता हा अर्ज त्या कार्यालयात सादर करायचा आहे .
श्रावण बाळ योजना online form
1 ) सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर लॉगीन करायचे आहे .
2 ) आता या वेबसाईट वर लॉगीन केल्यावर तुमच्या समोर होमपेज दिसेल .
3 ) इथे ‘ Register Here ‘ या पर्यायावर क्लिक करा .
4 ) आता इथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील . यातील कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता .
5 ) पर्याय क्रमांक 1 निवडला तर तुम्हाला तिथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल . मग तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल .
6 ) जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 निवडला तर तिथे तुम्हाला एक अर्ज दिसेल . या अर्जात तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल . जसे अर्जदाराचे नाव , अर्जदाराचा पत्ता , मोबाईल नंबर , पत्त्याचा फोटो , युजर नेम इत्यादी माहिती तुम्हाला तिथे भरावी लागेल .
7 ) यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल . तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे .
8 ) यानंतर तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल . आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा .
9 ) आता तुम्हाला Shravan Bal Yojana साठी अर्ज भारता येईल .
10 ) आता डाव्या बाजूला साईड बारमधून तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना निवडा . म्हणजेच Shravan Bal Yojana या योजनेवर क्लिक करा .
11 ) आता तुमच्यासमोर लॉग इन फॉर्म उघडेल . तो फॉर्म भरा . आणि सबमिट या बटनावर क्लिक करा .
12 ) आता तुमच्यासमोर Shravan Bal Yojana या योजनेचा अर्ज उघडेल तो अर्ज व्यवस्थित भरा . आणि त्यासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडा . तसेच सोबत बँक खात्याचा योग्य तो अचूक तपशील भरा .
13 ) आता तुमचा अर्ज सबमिट करा .
14 ) आता यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक मिळेल . तो अर्ज क्रमांक तुमच्याकडे नोंद करून ठेवा . अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता .
श्रावण बाळ निराधार योजना हेल्पलाईन नंबर – 1800 120 8040
वारंवार विचारले जाणारे प्रश्न – Shravan Bal Yojana
श्रावण बाळ योजना काय आहे ?
श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजने अंतर्गत 65 वर्षांवरील निराधार जेष्ठ नागरिकांना दरमहा रुपये 1500 ची आर्थिक मदत केली जाते .
श्रावण बाळ योजना ही कोणत्या राज्यासाठी सुरू करण्यात आली आहे ?
श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आली आहे .
श्रावण बाळ योजने अंतर्गत किती रुपयांचा लाभ मिळतो ?
श्रावण बाळ योजने अंतर्गत दरमहा रुपये 1500 चा लाभ मिळतो .
श्रावण बाळ योजने अंतर्गत कोणाला लाभ मिळतो ?
महाराष्ट्र राज्यातील निराधार जेष्ठ नागरिक कि ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो .
श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता धारक ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात .