Kanyadan Yojana : नमस्कार मंडळी , लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा सोहळा आहे . प्रत्येक वधू आणि वरांच्या आई -वडिलांची इच्छा असते कि त्यांनी आपल्या मुलांचे लग्न अगदी धुमधडाक्यात लाऊन द्यावे . पण प्रत्येक आई – वडील हा खर्च करू शकत नाहीत . कारण प्रत्येक आई – वडिलांची घराची परिस्थिती चांगली नसते . आणि आई – वडिलांची खूप इच्छा असूनही ते आपल्या मुलांचे लग्न चांगल्या पद्धतीने लावून देण्यास असमर्थ ठरतात .
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने सन 2003 पासून Kanyadan Yojana आपल्या राज्यात लागू केली . परंतु कोरोना काळात जेव्हा एकत्र जमण्यास बंदी घातली होती . त्यामुळे जोडप्यांना या योजनेचा लाभ घेण्यास अडचणी यायला लागल्या .पण आता हि योजना महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे .यापूर्वी या योजनेच्या अंतर्गत मागास प्रवर्गातील वधूला एक 6 हजारांचे मंगळसूत्र दिले जायचे आणि 4 हजार किमतीचे संसार उपयोगी साहित्य दिले जायचे . पण आता हीच योजना शासन एका नव्या स्वरूपात घेऊन आले आहे .
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे .तेव्हा टी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते . या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय लागते , या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ,कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात , अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ,लाभ कसा व कोणत्या स्वरूपात मिळेल इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत .
कन्यादान योजना काय आहे ? | Kanyadan Yojana 2024
मुख्यमंत्री कन्यादान योजना हि महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे . या योजनेच्या अंतर्गत आता वर – वधू जे सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत सामुहिक सोहळ्याच्या अंतर्गत विवाह करत असतील तर अशा जोडप्याच्या आई वडिलांना आता Kanyadan Yojana महाराष्ट्र सरकार अंतर्गत रुपये 20,000 /- पर्यंत मदत मिळणार आहे . परंतु असे वर आणि वधू हे विमुक्त जमाती , अनुसूचित जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातून असावेत .
कन्यादान योजना सुरु करण्याचा उद्देश
ग्रामीण भागात आजही माता पित्यांना आपल्या मुलांचे लग्न करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो . यासाठी बऱ्याच वेळा यासाठी कर्ज घेतले जाते . पण नंतर ते कर्ज फेडू शकत नाही आणि कर्जबाजारी होतात .आणि याचे बरेच वाईट परिणाम होतात . हे सर्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने कन्यादान योजना सुरु केली आहे. हि योजना सुरु करण्याचे उद्देश पुढीलप्रमाणे सांगता येतील :
1 ) महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती , इतर मागासवर्ग , विशेष मागासवर्ग या समाजातील लोकांचा आर्थक मागासलेपणा कमी करण्याचा प्रयत्न करणे .
2 ) या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे .
3 ) आई वडिलांच्या डोक्यावरील मुलांच्या लग्नाचा खर्च कमी करणे .
4 ) लग्न समारंभात अतिरिक्त होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणणे .
Kanyadan Yojana Overview
योजनेचे नाव | कन्यादान योजना |
योजना कधी सुरु झाली | सर्वात प्रथम 2003 साली सुरु झाली . |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी कोण असेल | या योजनेचा लाभ अनुसूचित जाती ( नवबौद्ध ) ,भटक्या जमाती , विमुक्त जमाती , इतर मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्ग यामधील जोडप्यांसाठी हि योजना लागू राहील . |
योजने अंतर्गत दिले जाणारे लाभाचे स्वरूप | लाभाच्या स्वरूपात प्रती जोडपे रुपये 20,000 /- एवढी रक्कम जोडप्यांना देण्यात येईल . तसेच ज्या स्वयंसेवी संस्थेने अर्ज दाखल केला आहे त्या संस्थेला प्रती जोडपे रुपये 40,000 /- एवढी रक्कम देण्यात येईल . |
अर्ज करण्याची पद्धत | जी स्वयंसेवी संस्था अर्ज करणार आहे त्या संस्थेने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ( आपल्या जिल्ह्यातील ) यांच्याकाडे संबंधित प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे . |
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कार्यालयात संपर्क साधावा | समाज कल्याण अधिकारी ( आपल्या जिल्यातील ) / संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त . |
कन्यादान योजनेसाठी पात्रता
कन्यादान योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील लोकांना व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने काही निकष या योजनेसाठी लावलेले आहेत . या निकषांना पूर्ण करणारी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते . सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे .
1 ) अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा .
2 ) अर्जदार हा वर किंवा वधू यांचे पालक असणे आवश्यक आहे .
3 ) वराचे वय 21 वर्ष असावे तर वधूचे वय 18 वर्ष असावे .
4 ) एखाद्या कुटुंबात जर दोन मुली असतील तर त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल .
5 ) वर तसेच वधू हे इतर मागास प्रवर्ग , विशेष मागास प्रवर्ग , अनुसूचित जाती ,भटक्या जमाती , विमुक्त जमाती या प्रवर्गातून असावेत .
6 ) आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात . परंतु यासाठी काही अति लावण्यात आल्या आहेत .या अटी पुढीलप्रमाणे आहेत :
- ज्या स्त्रीचा नवरा मरण पावला आहे आणि तिने पुन्हा लग्न केले नाही अशी स्त्री या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल .
- त्या विधवेचे प्रत्येक स्त्रोतातून मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न हे रुपये 50,000 /- पेक्षा जास्त नसावे .
- विधवा महिलेच्या घरात वय वर्ष 25 पेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती कमावणारी नसावी .
7 ) ज्या मुलीचे आई वडील मरण पावले आहेत आणि तिचा सांभाळ करते अशी विधवा महिला या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकते .परंतु पालकाचे सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 50,000 /- पेक्षा जास्त नसावे .
8 ) एखादी विवाहयोग्य मुलगी जिचे आई वडील मरण पावले आहेत परंतु घरातील इतर सदस्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षी उत्पन्न रुपये 50,000 /- पेक्षा जास्त नाही .अशी मुलगी या योजनेसाठी पात्र आहे .
9 ) ज्या व्यक्तीने या योजनेचा यापूर्वी कोणत्याही प्रकारे लाभ घेतलेला नाही फक्त अशीच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते .
10 ) आस्था कार्डधारक असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल .
11 ) अंत्योदय कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत .
12 ) वधू आणि वरच्या पहिल्या विवाहासाठी हि योजना लागू राहील .
13 ) अर्ज स्वयंसेवी संस्था दाखल करेल . आणि लग्न सोहळ्यासाठी किमान 10 दाम्पत्ये आवश्यक राहतील .
कन्यादान योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
| Kanyadan Yojana Documents
Kanyadan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरताना काही कागदपत्रे सोबत जोडावी लागतात .सोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली देण्यात आली आहे :
1 ) आधार कार्ड .
2 ) रेशन कार्ड .
3 ) उत्पन्नाचा दाखला .
4 ) आई किंवा वडील मरण पावले असतील तर त्यांच्या मृत्यूचा दाखला .
5 ) जर अर्जदाराला विधवा पेन्शन मिळत असेल तर त्याचा PPO नंबर .
6 ) मतदान कार्ड .
7 ) महाराष्ट्राचा रहिवासी दाखला .
8 ) जातीचा दाखला .
9 ) BPL कार्ड .
कन्यादान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा
करावा ? | Kanyadan Yojana Online Form
कन्यादान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्याचा वापर करा .
1 ) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या जिल्ह्याच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या अधिकृत ऑफिशियल वेबसाईट वर लॉगिन करावे .
2 ) तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यामुळे सर्वात प्रथम तुमची नोंदणी करून घ्या आणि आता तुम्ही तुमचा अर्ज येथे भरून घ्या .
3 ) आता तुमचा अर्ज सबमिट करा .
4 ) तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्या .
कन्यादान योजना प्रक्रिया कशी काम करते ? | Mukhyamantri Kanyadan Yojana
1 ) मुख्यमंत्री कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्ज करावा . जी जोडपी या जोजानेचा लाभ घेणार आहेत ते दोघे वर – वधू अनुसूचित जाती ( नवबौद्ध ) ,अनुसूचित जमाती ,इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक राहील .
2 ) सबंधित अधिकारी आलेल्या अर्जाची छाननी करतील .
3 ) संबंधित अर्ज एक महिन्यात मंजूर करण्यात येईल .
4 ) त्यानंतर त्या योजनेचा लाभ अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केला जाईल .
Mukhyamantri Kanyadan Yojana Form Pdf
मुख्यमंत्री कन्यादान योजने अंतर्गत अर्ज फक्त स्वयंसेवी संस्था दाखल करू शकते . याचा कोणताही pdf फॉर्म नाही .तर या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन भरायचा असतो . आपण राहत असलेल्या जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तेथे अर्ज भरायचा असतो . ते जोडपे ज्या जिल्ह्यात राहते तेथील कोणत्याही स्वयंसेवी संस्थेत लग्नासाठी नाव नोंदणी करू शकतात .
Kanyadan Yojana Online Form
स्वयंसेवी संस्थेने त्यांचा अर्ज आपल्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन मुख्यमंत्री कन्यादान योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे . यासाठी सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये कमीत कमी 10 जोडपी असावीत असा नियम आहे .
Mukhyamantri Kanyadan Yojana Status
मुख्यमंत्री कन्यादान योजनेसाठी अर्ज केल्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर अर्जदार आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकतो .एकतर अर्जदार आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन चेक करू शकतो .किंवा अर्जदार आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागात जाऊन अर्जाचे स्टेटस चेक करू शकतो .
कन्यादान योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
कन्यादान योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे आपणास खालील प्रमाणे सांगता येतील :
1 ) अर्जदाराने अर्जात चुकीची माहिती भरली तर अर्ज रद्द होऊ शकतो .
2 ) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसेल तर सदर अर्ज रद्द होऊ शकतो .
3 ) वरचे वय 21 आणि वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर अर्ज रद्द होऊ शकतो .
4 ) एखाद्या व्यक्तीने या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला असेल तर त्याचा अर्ज रद्द होऊ शकतो .
5 ) वर किंवा वधूचा पहिला विवाह नसेल तर त्याचा अर्ज रद्द होऊ शकतो .
6 ) वधू किंवा वर यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असेल तर त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो .
7 ) लग्न सोहळ्यासाठी किमान 10 दाम्पत्यांची नोंदणी झालेली नसेल तर त्याचा अर्ज रद्द होऊ शकतो .
Kanyadan Yojana Gr Pdf
कन्यादान योजना शासन निर्णय |
FAQ – Kanyadan Yojana
कन्यादान योजना काय आहे ?
कन्यादान योजना हि महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे . ज्या गरीब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 50,000 /- पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलामुलींना त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार कडून रुपये 20,000 /- दिले जातात .
कन्यादान योजनेसाठी अर्ज कसा भरावा ?
कन्यादान योजने अंतर्गत अर्जदार आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरू शकतो .