ACTREC Mumbai Bharti 2024
ACTREC Mumbai Bharti 2024 : ACTREC ( Advance centre for treatment , research and education in cancer ) अंतर्गत नवीन पदाची जाहिरात प्रसिध्द झाली आहे . सदर भरती अंतर्गत ‘ संशोधन परिचारिका ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . ही भरती थेट मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार आहे . सदर भरतीसाठी जे कुणी उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी थेट मुलाखतीला जायचे आहे . ही मुलाखत दिनांक 13 सप्टेंबर 2024 या दिवशी असेल .
ACTREC Mumbai Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि ; नोकरी करण्याचे ठिकाण , पगार , मुलाखतीचा पत्ता इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तरपणे दिल्या आहेत . जाहिरातीची pdf देखील खाली दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
ACTREC Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव : संशोधन परिचारिका
आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता : B.Sc ( नर्सिंग ) किंवा Diploma in General Nursing and Midwifery ( MNC / NIC registered ) .
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र .
पगार : रुपये 28,000/-
निवड करण्याची पद्धत : मुलाखत
मुलाखतीला जाण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2024
मुलाखतीला जाण्याचा पत्ता : बैठक खोली नं .- 2 , तिसरा मजला , खानोलकर शोधीका , ACTREC , खारघर , नवी मुंबई – 410 210 .
How To Apply For ACTREC Mumbai Bharti 2024 ?
1 ) उमेदवाराने 13 सप्टेंबर 2024 ( शुक्रवार ) या दिवशी थेट मुलाखतीला वर दिलेल्या पत्त्यावर जायचे आहे .
2 ) उमेदवाराने जाताना सोबत आपला CV , ओरिजिनल आणि झेरॉक्स कागदपत्रे , पासपोर्ट साईज फोटो , आपला ID Proof ( आधार कार्ड ) इत्यादी गोष्टी सोबत घेऊन जायचे आहे .
3 ) मुलाखतीचा Reporting time हा 1:45 pm ते 2:15 pm हा आहे . तरी उमेदवारांनी वेळेत हजार राहावे .
महत्वाच्या लिंक